Sant Namdev Information in Marathi

संत नामदेव माहिती

 • विठ्ठलाचा परम भक्त कोण म्हंटले तर नामदेवांचेच नाव तोंडावर येते.
 • विठ्ठल नामदेवांचा सखा, देव, पाठीराखा सर्व काही होता.
 • बाराव्या शतकात बरीच संत मंडळी महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वर, निवृत्ति नाथ, मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, विसोबा खेचर, चांगदेव इत्यादी.
 • त्यांनी धर्माची मरगळ झटकून पुन्हा टवटवीत केला.
 • नामदेव ह्यांनी मात्र आपला वेगळा ठसा उमटविला.
 • नव विधा भक्ती म्हणजे काय हे त्याचा अर्थ माहित नव्हता तेव्हापासून त्यांनी प्रत्यक्ष दाखवले.

लहानपणापासून विठ्ठल भक्ती :

 • नामदेवांचा जन्म १२७० साली कृष्णा काठी नरसी बामणी जिल्हा कराड येथे झाला.
 • आई गोनाई आणि वडील दादुशेठ.
 • वडील पंढरपूर ला नियमित वारीला जात पुढे त्यांनी पंढरपूरलाच राहायला जायचे ठरवले.
 • त्यामुळे लहान नाम्याला विठ्ठलाचा लळा लागला. वडीलांना त्याने नीट राहून सामान्य लोकांसारखे राहावे असे वाटे.
 • पण नामदेवांना विठ्ठलाच्या पुढे काहीही सुचत नव्हते. त्यांची विठ्ठलावर एव्हडी निरागस भक्ती होती की त्यांना विठ्ठल कुणी मूर्ती नसून चालता बोलता माणूस आहे असे वाटे.

विठ्ठलाने बाळ हट्ट पुरविला :

 • पंढरपूरला आल्यानंतर गोनाई आई रोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवित असे. एकदा तिने छोट्या नामदेवाला नेवैद्य दाखवायला सांगितला.
 • नामदेव नैवेद्य विठ्ठलापुढे ठेवून उभे राहिले विठ्ठल नैवेद्य खातो का ते बघायला.
 • जेंव्हा काहीच घडले नाही तेंव्हा त्याने विठ्ठलाकडे हट्टच धरला खाण्यासाठी. जोपर्यंत विठ्ठल नैवेद्य खात नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहीन असे त्याने विठ्ठलाला सांगितले.
 • शेवटी विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला. अशी आख्यायिका आहे. असे एक नाही तर विठ्ठलावरील अपार भक्तीने त्यांनी अनेक चमत्कार केले.
 • एकदा वडीलांनी त्यांना कापड विकण्यास पाठवले तर ते विठ्ठलाचे भजन करीत बसले आणि कापड विकण्याचे विसरले.
 • घरी ओरडतील म्हणून कापडावर धोंडा राखण म्हणून ठेवला आणि घरी गेले. दुसरी दिवशी धोंडा कपाटात ठेवला.
 • जेंव्हा वडीलांनी विचारले की कुठे आहेत पैसे? कोण जिम्मेदार? तेंव्हा त्यांनी धोंडा काढून दिला तर तो सोन्याचा झालेला होता.

ज्ञानेश्वरांबरोबर तीर्थयात्रा :

 • २०व्या वर्षी नामदेव ज्ञानेश्वरांना भेटले आणि त्यांनी भारतभर यात्रा केली. ह्या यात्रेत त्यांना खूप संत भेटले
 • दृष्टी व्यापक झाली. मारवाड मध्ये बीकानेर जवळ त्यांना तहान लागली असता त्यांनी रुक्मिणीचा धावा केला आणि ती विहीर तुडुंब भरली. आजही ती विहीर तशीच आहे.

कच्चे मडके :

 • सर्व संत मंडळी बसली असता निवृतीनाथानी गोरा कुंभार ह्यांना कोणते मडके कच्चे आहे ते विचारले.
 • त्यांना नामदेवांनी ब्रह्म जाणून घ्यावे असे वाटत होते. गोरा कुंभार ह्यांनी सर्वांना काठीने ठोकले. कोणी हुं की चू केले नाही पण नामदेव ओरडले.
 • तेंव्हा सर्व म्हणाले हे कच्चे मडके आहे. त्यावर त्यांना विसोबा खेचर ह्यांना गुरु करून ब्रह्म जाणून घेण्यास सांगितले. नामदेवांनी रसाळ भाषेत किर्तन केले.
 • त्यांचे किर्तन ऐकण्यास देवाने देखील आपली दिशा बदलली. नामदेव आणि विठ्ठल ह्यांच्यामध्ये असे अद्वैत होते.

घुमान वारी :

 • नामदेव भारत भर रसाळ वाणीने विठ्ठलाची किर्तने करीत.
 • त्यांनी हिंदीत देखील कवने रचली.
 • पंजाबात घुमान येथे त्यांनी बराच काळ घालविला .त्यांची किर्तने शिखांचा पाचवा गुरु अर्जुन देव ह्यांनी गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट केली, ही महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब आहे.

घुमान वारी :

 • विठ्ठलच्या भक्तीपुढे नामदेवांनी संसाराकडे दुर्लक्ष केले, पण त्यांची पत्नी राधाबाई हिने नीट संसार केला.
 • त्यांच्या मुलाच्या बारशाला पण विठ्ठल आले होते. त्यांच्या घरातील सात्विक वातावरणाने प्रभावित होऊन त्यांच्याकडे काम करणारी जनाबाई हिने देखील अभंग रचले पण कृतज्ञता एव्हडी की अभंगाच्या शेवटी नामदेवांची दासी, नामयाची जनी असे म्हंटले.
 • असा हा निर्मल भक्त संत १३ व्या शतकात वैकुंठाला गेला.

Sant Namdeo / Sant Namdev Information in Marathi Language Wikipedia : Biography