Home » Tips Information in Marathi » Sitar Information in Marathi | Sitar Instrument, सतार वाद्य मराठी माहिती

Sitar Information in Marathi | Sitar Instrument, सतार वाद्य मराठी माहिती

Sitar Mahiti Marathi

Sitar Information in Marathi

संगीत वाद्य – सतार

परिचय / Introduction:

 • सतार किंवा सितार अशी ओळख असणारे हे एक तंतू वाद्य आहे. साधारणपणे हे दिसायला आपल्या तंबोऱ्यासारखे असते. ताणलेल्या तारांच्या माध्यमातून मधुर संगीत निर्मिती करणारे हे वाद्य अतिशय आकर्षक आहे.
 • भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये या वाद्याचे विशेष स्थान आहे. या वाद्याची सर्वात प्रथम निर्मिती ही भारतामध्येच करण्यात आली. अतिशय मधूर स्वर निर्माण करणारे हे वाद्य वाजवण्यासाठी सोपे असेल अशी कल्पना जर आपण करत असाल तर ते अगदीच चूक आहे. जेवढे मधुर स्वर, तेवढे ते निर्माण करण्यासाठी लागणारे कौशल्य हे किचकट आणि कठीण असते.

इतिहास / History :

 • सतार हे नाव त्याला त्याच्या रचनेमुळेच मिळालेले आहे. सतार हा शब्द पर्शियन भाषेमधील सेहतर या शब्दाची प्रेरणा घेऊन दिला गेलेला आहे ज्याचा अर्थ तीन तारा असलेला असा आहे. वीणा या प्राचीन वाद्यांचे सतार हे आधुनिक रूप आहे असे म्हणता येईल.
 • साधारणपणे तेराव्या शतकात सुफी कवी अमीर खुसरोह यांनी वीणा या वाद्यांपासून या सतार चा विकास केला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तेव्हापासून भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये याचे स्थान टिकून आहे.
 • त्यानंतर साधारणपणे १६ व्या आणि १७ व्या शतकामध्ये हे वाद्य भरभराटीस आले आणि प्रसिद्धी मिळवू लागले.
 • १९५० ते १९६० च्या दशकामध्ये प्रसिद्ध सतार वादक पंडित रविशंकर यांच्याद्वारे संपूर्ण जगभरामध्ये हे वाद्य लोकप्रिय झाले आणि अगदी पॉप च्या चाहत्यांना देखील या वाद्यांच्या मधुर स्वरांनी मोहिनी घातली.

वर्णन / Description :

 • सितार ही एक लांब मान असणारे आणि अर्धगोल आकार पोकळ बूड असणारे असे वाद्य आहे ज्यामध्ये तारा ताणून त्यांची अशा प्रकारे रचना केलेली असते ज्यामधून मधुर ध्वनी निर्माण केला जातो.
 • याची लांबी हि साधारणपणे ३ ते ४ फूटपर्यंत असते. सितार मध्ये १८ किंवा त्यापेक्षा अनेक तारा असू शकतात. त्यामधील ५ ते ६ एका वेळेस वापरल्या जातात.
 • या तारा धातू पासून बनवल्या जातात आणि बाकीचा ढाचा हा लाकडापासून बनवला जातो. सागवानी लाकूड हे या रचनेसाठी अत्यंत उपयुक्त मानले गेलेले आहे.
 • प्रत्येक तारेला एक विशिष्ट जवाबदारी असते. साधारणपणे ५ तारा या मेलडी वाजवतात. १ किंवा २ लय ठरवतात तर बाकीच्या संगीताला जोड देण्यासाठी वाजवल्या जातात.
 • तारण आधार देण्यासाठी पट्ट्या जोडल्या जातात, या पट्ट्या मेटल किंवा वूडन असू शकतात शौकीन लोक तर हस्तिदंताच्या पट्ट्या देखील वापरतात.
 • सतारच्या बुडाला असणारा गोलाकार भाग हा भोपळ्यापासून बनवला जातो हे ऐकून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. हे असे बोधले आहेत जे खास वाद्य तयार करण्यासाठी लागवड केली जातात.

सितार घराणं / Sitar families :

 • भारतामध्ये शास्त्रीय संगीत आणि वाद्य यांच्या गायनाच्या आणि वादनाच्या पद्धतीनुसार आणि विविध शैली नुसार काही घराणे आहेत. त्याच प्रमाणे सितार वादनामध्ये देखील अनेक महान कलाकार वादक होऊन गेले आहेत ते देखील या घराण्यामधीलच आहे. भारतामध्ये सितार वादनाची काही प्रसिद्ध घराणे आहेत जसे इंदूर घराणं, जयपूर घराणं, सेनिया घराणं इत्यादी.
 • भारतात सर्वात नावाजलेले सतार वादक म्हणजे पंडित रवी शंकर. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची कन्या अनुष्का शंकर हिने हि परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

Information about Sitar in Marathi – Wikipedia Language

Lessons : Learn Sitar Notations & Notes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *