Skip to content

Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Nibandh आरसा नसता तर निबंध

Aarsa Nasta Tar Essay in Marathi

आरसा नसता तर …

 • आरसा नसता तर? छे! कल्पनाच सहन होत नाही. आपले प्रतिबिंब पाहता न येणे ही गोष्टच कुणी मान्य करणार नाही.
 • पुरातन काळापासून जेंव्हा मनुष्य गुहेमध्ये राहत होता तेंव्हा आपण इतर प्राण्यापेक्षा वेगळे का आहोत ह्या प्रश्नाचे उत्तर त्याला जेंव्हा त्याने नदीच्या पाण्यात आपले प्रतिबिंब पाहिले तेंव्हाच कळले असेल.
 • आरसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रोज चे जीवन, कथा कादंबर्‍या, परीकथा, गाणे सगळीकडे हा महत्त्वाची भूमिका बजावतो.
 • त्याला रूपक करून कितीतरी विचार मांडले गेले आहेत. ही नुसतीच एक वस्तू नाही तर तिला अर्थ आहे ,एक व्यक्तिमत्व आहे.

आरसा, सच्चा सखा :

 • “तोरा मन दर्पण कहलाये, भले बुरे सारे कर्मों को देखें और दिखाएं”| “सांग दर्पणा कशी मी दिसते?” “मिरर मिरर ऑन द वॉल.” “दर्पन झूठ न बोले|” या आणि अशा अनेक गाण्यातून आरशाची रुपके आणि महत्व वर्णन केले गेले आहे. बायकांना अगदी लहान मुलीला सुद्धा आरसा नसला तर चैन पडत नाही.
 • स्त्री वर्ग तर आरशा शिवाय जगूच शकणार नाही. अगदी छोटी मुलगी सुद्धा नटून झाले की कुठे आपला गोड अवतार बघणार? स्वत: वरच कशी खुष होणार? आणि ती मोठी झाली की,तऱ्हे तर्हेची वेषभूषा,केशभूषा करून “मी कशी दिसते” असे कोणाला विचारणार? मनातले गोड गुपित कुणाला सांगणार?
 • लग्नाच्या वेळी पिवळ्या हळदीने सजलेली वधू आपले लाजलेले मुख कसे बघणार? आणि डोहाळे जेवणाच्या वेळी विशेष सजल्यावर आपले ते रूप ती कसे बघणार? घरात सर्वांनी जरी सांगितले तरी आपले प्रतिबिंब पाहील्या शिवाय तिला कसे खरे वाटणार?

कथांमधून आरशा चे महत्व :

 • आपले प्रतिबिंब पाहणे ही सर्वांची सर्वात महत्त्वाची गरज आहे. पण ती प्रमाणापेक्षा जास्त पण होते. जसे नार्सिसस ह्याचे स्वत:वर इतके प्रेम होते की तो तासन तास पाण्यातील आपली प्रतिबिंब बघत बसायचा.
 • आरशाचा शोध लागला नसला तरी संकल्पना तीच होती. जर ही संकल्पनाच नसती तर नार्सिससला शाप मिळाला नसता आणि त्याचे फुल झाले नसते.
 • आरसा नसता तर अलाउद्दीन खिलजीला पद्मिनी दिसलीच नसती आणि पुढचा सर्व अनर्थ टळला असता.

आरशाचा शोध :

 • आरसा नसता तर शहाजहानला मरताना ताजमहाल दिसला नसता आणि त्याला किती दु:ख झाले असते? आरसा नसता तर “मिरर मिरर ऑन द वॉल” ही गोष्टच झाली नसती.
 • अलीस इन वंडरलॅन्ड, हॅरीपॉटर, द ट्रॅप,मिरर थीफ, रीपर्स इमेज, लेडी ऑफ शेलोट अशा कित्येक सिनेमामध्ये आरशाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 • लॉर्ड टेनीसन, लिओनार्डो दा विन्सी ह्यांनी पण आरशाची महती गायली आहे. जरी ख्रिस्तपूर्व ६०० वर्षापासून आरसा उपयोगात आणला गेला तरी आजच्या आरशाचा शोध १८३५ मध्ये एका जर्मन केमिस्ट ने लावला.
 • त्याने काचेला चांदीचा पातळ थर देऊन आरसा तयार केला. त्यानंतर त्याच्या प्रकाश किरणांच्या परावर्तन प्रक्रियेवरून शास्त्रात खूप उत्क्रांती झाली.

शास्त्रात आरशाचे उपयोग :

 • आरसा नसता तर पाणबुडीतील सैनिकांना पृष्ठभागावरच्या शत्रूच्या हालचाली कळल्या नसत्या. पेरीस्कोप मध्य आरशांचा उपयोग केला गेला आहे.
 • आरसे नसते तर आज सोलर वीज निर्मिती करता आली नसती. टेलेस्कोपमध्ये, लेसर मध्ये, ग्रीन हाउस मध्ये 3D कॅलिडोस्कोप मध्ये, तसेच सर्व प्रकारच्या दुर्बिणी मध्ये आरशाचा उपयोग केला जातो.
 • आरसे वापरून प्रकाशाचे सिद्धांत आणि नियमांचे शोध लावले गेले आहेत. त्यावरून खगोलशास्त्रात अतुलनीय शोध लागले आहेत. आरसा नसता तर हे शक्य होते का?

मनोरंजन :

 • एस्सेल वर्ल्ड किंव्हा डिस्नेलॅन्डला गेल्यावर आरसे मॅजिक मिरर खोलीत आपली वेगवेगळी रूपे पाहताना किती मजा येते नाही? आरसेच फक्त तुम्हाला जाड, बारीक, वाकड्या तोंडाचे, लांब नाकाचे, अशी कितीतरी गमतीदार रूपे दाखवतात.
 • एका खोलीत निरनिराळ्या आकाराचे, अंतर्गोल, बहिर्गोल, चपटे असे खूप आरसे भोवती ठेवून तुम्हाला मध्ये उभे केले जाते आणि त्यात तुम्ही अशी मजेशीर रूपे बघतात. आरसे नसते तर ही मजा कुठे अनुभवायला मिळाली असती?
 • आणि आरसे नसते तर खूप अपघात झाले असते. कारण मोटार सायकल किंवा मोटार ह्यांच्या ड्रायव्हरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे बहिर्गोल आरसे बसवले असतात त्यातून त्यांना मागून गाडी येते आहे किंवा वळून जाते आहे हे दिसते आणि वळताना होऊ शकणारे अपघात टळतात. त्यामुळे चेहरा बघायला नाही तर मागची गाडी बघायला आरशांची खूप मदत होते.
 • हल्ली कित्येक इमारतींना दर्शनी भागावर आरसे किंवा काचा बसविल्या असतात. त्याने प्रकाश परावर्तीत होऊन इमारतींचे उन्हापासून रक्षण होते.
 • बॅटरी, सर्च लाईट, दीपस्तंभावरील प्रकाश झोत ह्या सर्वांमध्ये आरशांचा उपयोग केला जातो.
 • आरसा नसता तर ही प्रगती झाली नसतीच त्यापेक्षा सुद्धा मनुष्याला त्याचे प्रतिबिंब कुठे पाहायला मिळाले असते? दुसर्‍याने कितीही सांगितले तरी आपले रूप आपणच बघितल्या शिवाय कसे कळणार?
 • आपली प्रतिमा भलेही डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी झाली तरी आपल्याच डोळ्याने बघून विश्वास ठेवायचा असतो. मग तो आरसा बाह्य रूपाचा असो किंवा मनाचा!

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Aarsa Nasta Tar in Marathi Language / Wikipedia

1 thought on “Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Nibandh आरसा नसता तर निबंध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *