Skip to content
Home » Essay in Marathi Language » Mi Principal Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी मुख्याध्यापक झालो तर

Mi Principal Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी मुख्याध्यापक झालो तर

mi principal jhalo tar images_1

Mi Principal Zalo Tar Essay in Marathi Langauge

Me Mukhyadhyapak Zalo Tar : मी मुख्याध्यापक झालो तर

त्या दिवशी आमच्या वर्गात नोटीस आली की आमच्या पैकी कांही मुलांना मुख्याध्यापकांनी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलाविले आहे. माझे नाव पण त्यामध्ये होते. आमची अक्षरश: गाळण उडाली. आणि एकमेकांचा हाथ पकडून आम्ही दबकत दबकत ऑफिस बाहेर पोहोचलो. ते सुसज्ज ऑफिस आणि जमिनीवर रेड कार्पेट पाहून आमचे डोळे विस्फारले.शिपायाने आम्हाला आत जायला सांगितले आणि आम्ही आत गेल्यावर पहिले की, आमचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर आमच्या कडे बघून मंद स्मित करीत होते. आम्ही इतके घाबरलो होतो. पण स्कॉलरशिप मध्ये वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल, आम्हाला आमच्या एव्हड्या करारी आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापकांनी शाबासकी दिली. मी भारावून गेलो होतो आणि कल्पना करू लागलो की, खरच किती रुबाब असतो एका संपूर्ण शाळेचा मुख्याध्यापक झाले की? मला वाटले खरंच मी मुख्याध्यापक झालो तर माझा पण असाच रुबाब असेल का?

मला पुढे मी कोण होणार असे विचारले तर मी नक्की सांगेन की मी मुख्याध्यापक होईन.कारण शाळेचे नांव हे त्या शाळेचे मुख्याध्यापक कोण यावर अवलंबून असते. पालक आपल्या मुलाला शाळेत शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नावलौकीकाकडे बघून घालतात. मला पहिल्यापासून शिक्षक पेशाचे आकर्षण आहे. त्यात आमच्या मुख्याध्यापकांना भेटल्यापासून मला वाटते मी मुख्याध्यापक व्हावे. मग मी कल्पना रंगवू लागलो की, मी मुख्याध्यापक झालो तर मी काय काय करीन.

आधीच आमच्या मुख्याध्यापकांचा आदर्श आहेच. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांशी खेळीमेळीने वागेन. तरीही माझ्या भारदस्त व्यक्तित्वाने मी अंतर राखून दरारा ठेवीन. माझ्या शिकविण्याच्या कसबाने मी त्यांना आदर्श शिक्षक कसा असतो ते दाखवीन. मुले नेहमी ज्ञानी शिक्षक असेल तरच त्याचे ऐकतात. त्यामुळे मी माझे ज्ञान कायम अद्ययावत ठेवीन. आणि शिकवितांना त्यांना जगाची माहिती पण होईल असे सामान्यज्ञान देईन.सर्वप्रथम मी काही शिक्षकांचा एक ग्रुप करीन.त्यात मानसशास्त्र शिकलेले, थोडी वैद्यकीची माहिती असलेले आणि मुलांशी चांगला संवाद साधू शकणारे असे शिक्षक निवडीन. नंतर शाळेतील सर्व मुलांना एक प्रश्नावली देऊन त्यांची माहिती, नातेवाईक, आईवडिलांचा व्यवसाय, आणि भविष्याबद्दल त्यांचे स्वप्न हे सर्व फॉर्म मध्ये भरून घेईन आणि तो डेटा कॉम्युटर मध्ये भरून ठेवीन. त्यामुळे मला शाळेतील सर्व मुलांची माहिती आणि पार्श्वभूमी कळेल. ह्याचा उपयोग असा होईल की एखादा मुलगा रोज उशिरा का येतो म्हणून त्याला शिक्षा करण्यापेक्षा मी त्याची माहिती बघेन आणि जर त्याला घरी काही अडचण असेल तर ती निवारण होई पर्यंत त्याला सुट देईन. तसेच कुणा मुलाला फी भरता येत नसेल तर समुपदेशक शिक्षकाकडून त्याची अडचण समजून घेऊन त्याला काही सरकारी मदत ,स्कॉलरशिप मिळवून देण्याची व्यवस्थ करीन.

मुलांच्या ह्या माहितीमध्ये मी त्यांची आवड, धैय्य आणि त्यांच्या महत्वाकांक्षा हा सुद्धा कलम ठेवीन. त्याप्रमाणे मी मुलांचे ग्रुप करून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी लागणार तयारी इयत्ता पाचवीपासून सुरु अतिरिक्त तास घेववून करवून घेईन .कारण UPSC/ MPSC तसेच सैन्यातील कमिशन मिळण्यासाठी NDA ह्या परीक्षांसाठी अगदी लहानपणा पासून तयारी करून घ्यावी लागते. प्रत्येक पालकाला हे जमतेच असे नाही.तसेच श्रीमंत पालक मोठे महागडे क्लासेस लावून त्यांच्या पाल्यांना हि संधी मिळवून देतील ,पण गरिबांच्या मुलांना इच्छा असून संधीला मुकावे लागेल. ह्यामुळे देशाला कदाचित मिळणारा चांगला उमेदवार देश पण गमावेल. मुलांच्या पुढील आयुष्यासाठी काय योजना आहे हे पालकांना प्रश्नावली देऊन माहिती करून घेईन. त्यांची आणि पाल्यांची इच्छा यांची सांगड घालून पालकांना व मुलांना योग्य ते करिअर घडविण्यास मदत करीन.

आमच्या शाळेकडून पण माझ्या सहकाऱ्यांकडून मदत घेऊन मी नवनवीन खेळ, नाटके, गाण्याच्या स्पर्धा, खोखो, क्रिकेट, फुटबॉल सारख्या खेळांच्या स्पर्धा घेऊन त्यामधील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना निवडण्यास शिक्षकांना सांगेन आणि मोठ्या क्लब मधील प्रशिक्षित खेळाडूंना बोलावून मुलांना मार्गदर्शन करण्यास विनंती करीन. कारण मोठी माणसे अशा कामाला नाही म्हणत नाही. अशा तर्हेने माझ्या शाळेतील विद्यार्थी त्यांच्या आवडीप्रमाणे ज्या क्षेत्रात जातील तिथे शाळेचे नाव मोठे करतील. त्यातही मुलींना सौंदर्यस्पर्धा व मुलामुलींना ऑलिम्पिकच्या जिम्नॅस्टिक्सच्या कसरती शिकविण्यास अर्धवेळ प्रशिक्षकाची नेमणूक करीन. कारण आपल्याकडे दहीहंडी आणि मल्लखांब येणारे खूप मुले असतात. त्यांच्या कौशल्याचा उपयोग मी अशा तऱ्हेने करून घेऊन आपल्या शाळेतील ,गावातील आणि राज्यातील मुळे ऑलिम्पिक ला गेली तर ते आपले नाव रोशन करतील.

एक्स्ट्रा करिक्युलर कौशल्य विकसित करणे हे जरी गरजेचे असले तरी त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून मी ज्यांना अभ्यासातच जास्त गति आहे अशा मुलामुलींना वेगळे वर्ग घेऊन त्यांच्या उद्दिष्टाप्रमाणे त्या त्या विषयात त्यांना निपुण करायला लावीन. त्यानुसार राष्ट्रीय प्रज्ञा शोध तसेच BARC च्या बाल वैज्ञानिक परीक्षांना बसवून त्यांना शास्त्रज्ञ, इंजिनिअर, डॉक्टर आणि आर्किटेक्ट म्हणून घडण्यास मदत करीन माझ्या शाळेतील मुळे देशाचे भूषण ठरून देशाच्या विकासाला हातभार लावतील. त्यांच्यापैकी कोणी खगोलशास्त्रात करिअर करू इच्छित असेल तर त्यांचा नासाशी संपर्क घडवून आणीन.

मला माझ्या शाळेतील मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी असे मला वाटते. नुसते अभ्यास करणारे, [पुस्तकी किडा], नुसते खेळाडू किंवा फक्त कलाकार असे न होता ते सर्व क्षेत्रांमध्ये प्रवीण व्हावे असे मला वाटते. सध्या आयएएस किंवा सीडीएस [सैनिकी पेशा ] ह्या परीक्षांना मुलांचे सामान्य ज्ञान, व्यवहार, एखादी कला, शारीरिक क्षमता ,निर्णय क्षमता एकत्र काम करण्याची क्षमता हे सर्व कठोर रित्या पारखले जाते.त्यांसाठी मुलांची पाचवीपासून तयारी करून घ्यावी लागते. ऑलिंपिक मध्ये कोरिया, रशिया येथील खेळाडू पदके मिळवतात त्या पाठीमागे चवथ्या /पाचव्या वर्षांपासून केलेली मेहनत असते. आमच्या शाळेत मुलांचा कल कळल्यानंतर लगेच त्यांचा ग्रुप करून मी त्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करीन. गरीब पण गुणवंत आणि हुशार मुलांसाठी वेगळी लायब्ररी सुरू करीन ज्यात त्यांना रेन एंड मार्टिन, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, कथा, वेगवेगळ्या खेळांची माहिती, अशी पुस्तके ठेवीन. तसेच गुगल वर शोधून मोफत डाउनलोड करण्याची सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग च्या सीडी उपलभ करून देईन.

खरच मी मुख्याध्यापक झालो तर?……

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Essay on मी मुख्याध्यापक झालो तर

Marathi Nibandh – Mee Principal Zalo Tar :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *