Skip to content
Home » Essay in Marathi Language » Republic Day Information in Marathi | 26 January Prajasattak Din Essay

Republic Day Information in Marathi | 26 January Prajasattak Din Essay

republic day speech in marathi pdf

Republic Day Information in Marathi

प्रजासत्ताक दिन :

आपण २६ जानेवारीला संविधान किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस आपण गणतंत्र किंवा प्रजासत्ताक किंवा संविधान दिवस का म्हणतो ह्याचे कारण आहे. २६ जानेवारी १९३० ला लाहोर मध्ये काँग्रेसच्या सभेत आपण संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि स्वातंत्र्यानंतर डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्षे परिश्रम घेऊन आपल्या देशाची घटना लिहिली आणि २६ जानेवारी १९५० ला देशाला अर्पण केली. त्या घटनेचा आपण वर्धापन दिन साजरा करतो. आपण सगळ्या जगाला त्या दिवशी आपली ताकद दाखवतो. त्या दिवसाची महिनों महिने आधी तयारी चालू असते. एक महिनाभर रंगीत तालीम असते. त्या दिवशी दुसऱ्या देशातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रण दिले जाते. तेही आनंदाने हा सोहळा पाहण्यास येतात.

त्या दिवशी आपले राष्ट्रपती प्रमुख असतात आणि प्रथम ते इंडिया गेट वरील अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र अर्पण करतात २ मिनिटे स्तब्धता पळून धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतात. नंतर ते दुसऱ्या देशातून आलेल्या राजपथावर पाहुण्यांचे स्वागत करतात. त्यानंतर राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि राष्ट्रगीताने सुरुवात होते. प्रथम सगळी महत्वाची शोर्यपदके दिली जातात. यामध्ये अशोक चक्र आणि कीर्तिचक्र तसेच लहान मुलांना राष्ट्रीय शौर्य पदके दिली जातात आणि नंतर परेड सुरु होते. ही अत्यंत दिमाखदार परेड आणि खूप लांब परेड असते. परेड रायसीना हिल राष्ट्रपती भवन वरून निघते आणि राजपथावरून इंडिया गेट पर्यंत जाते.

ह्या परेडमध्ये आपल्या देशाची संरक्षण क्षमता, मोठे मोठे रणगाडे, तोफा, अग्निबाण नौकांचे प्रतिकृती असतात. मग एक एक सैन्य दले आपापल्या बॅण्ड सहित परेड करतात. आर्मी, नेवी आणि एयर फोर्स सगळे मार्च पास करतात. प्रत्येक पलटण चा कमांडर राष्ट्रपतींसमोर आला की कडक सलाम ठोकतो त्यानंतर NCC, होमगार्ड ,स्त्रियांची वेगळी पलटण असते. राष्ट्रपती उभे राहून ह्या सर्व परेडची मानवंदना स्वीकारतात. खरोखर नयनरम्य असतो हा सोहळा! TV वर ह्याचे प्रक्षेपण बघताना आपलाही ऊर राष्ट्रभक्तीने भरून येतो.

त्यानंतर, आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता दाखवली जाते. एक एका राज्याचे चित्ररथ येतात आणि त्यांच्याबरोबर कलाकार नाचगाणी करीत त्या त्या राज्याचे महत्व दाखवतात. विविधतेत एकता ह्याचे सुंदर देखावे दिसतात. नंतर विविध राज्यातील कलाकार त्यांची कला दाखवतात. त्यानंतर घोडदल, हत्तीदल आणि उंट दल ह्यांची परेड होते. शेवटी मिलिटरीचे जवान चित्तथरारक मोटारसायकलचे खेळ दाखवतात.

असा हा ४ ते ५ तासांचा रोमहर्षक कार्यक्रम आपण २६ जानेवारीला पाहतो. तिसरे दिवशी बिटिंग रीत्रीट म्हणजे तिन्ही वाद्यवृंदाची परेड होते. अशा तऱ्हेने तो सोहळा संपतो. राजधानी प्रमाणेच प्रत्येक राज्यात पण कार्यक्रम होतात. सगळा भारत हा प्रजासात्तक दिन साजरा करतो.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

26 January Information in Marathi Bhashan / Speech

Republic Day Essay in Marathi Language Nibandh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *