Geographical India Information in Marathi | भौगोलिक भारत माहिती / निबंध

Geographical India Information in Marathi

भौगोलिक भारत : वैशिष्ठे

आओ बच्चो तुम्हें दिखाये झांकी हिंदुस्तानी की |
इस मिट्टीसे तिलक करो ये धरती है बलिदानकी ||

शाळेत बरेच वेळा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला हे कवी प्रदीप यांनी लिहिलेले गाणे आपण ऐकले असेलच. त्यामध्ये आपल्या देशाच्या विविधतेचे आणि महत्वाचे वर्णन आहे. भारत जगाच्या नकाशावर एक महत्वाचे स्थान असलेला व्दिपकल्प आहे. सगळ्या जगाचे हवामान, जमीन, वनस्पती, प्राणी, निसर्ग, मनुष्य जाती इथे पाहायला मिळतात. आसेतुहिमाचल आणि कच्छ पासून बंगाल पर्यंत हा विविधतेने नटलेला देश साऱ्या जगाचे आकर्षण आहे.

Geology of India / भारत भूगोल :

  • भारत हा प्रत्यक्षात इंडो ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. कारण असे म्हणतात की पूर्वी सुमारे साडेसात कोटी वर्षापूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, दक्षिण अमेरिका हे सर्व मिळून एक मोठे गोंडवन खंड होते.
  • पृष्ठीय बदल, भूकंप, समुद्रातील जमिनी अंतर्गत प्रवाहांच्या परिणामामुळे गोंडवन खंडाचे तुकडे झाले आणि एक एक पृष्ठ दूर दूर सरकू लागले त्याचबरोबर त्याचा परिणाम होऊन समूळ भूस्तरीय संरचना बदलली आणि आज दिसत आहे तसे भू खंड उदयाला आले.
  • भारत उपखंड सुटे झाल्यावर ईशान्येकडे सरकू लागले आणि आशियाई पृष्ठाला धडकले त्यामुळे मधला भाग वर येऊन हिमालय निर्माण झाला, मध्ये असलेल्या दलदलीच्या समुद्रात गाळ जमा होऊन त्याचे गंगेचे खोरे झाले.
  • भारताचे दिशांवरून आठ भाग पडतात आणि आश्चर्य असे की ते आठही भाग कुठेही एकमेकांशी जुळणारे नाही. पण आत्मा भारतीय आहे हे नक्की.
  • हिमालयाला जोडून आणि मध्य भारतापर्यंत पसरलेले गंगेचे खोरे.
  • आरवली पर्वताने वेगळा केलेला गुजरात आणि कच्छचा पश्चिम भारत.
  • विन्ध्य आणि सातपुडा ह्या पर्वतांनी वेगळे केलेले दख्खनचे पठार.
  • सह्याद्रीमुळे वेगळे झालेली पश्चिमेची सागरी किनारपट्टी.
  • पूर्वेला बंगाल आणि ईशान्येला सात उत्तर पूर्वेची राज्ये.
  • भारताचे हवामान उष्ण राहण्यास कच्छचे रण आणि हिमालय कारणीभूत आहे. त्यांच्यामुळे मोसमी पाऊस [नैऋत्य मान्सून] पडतो.
  • विषुववृत्तीय हवामान असले तरी त्याचे चार प्रकार आढळतात. आर्द्र, शुष्क, सम विषुववृत्तीय आर्द्र आणि विषुववृत्तीय असे ते प्रकार होय.

Geographic Structure / भौगोलिक संरचना:

  • भारत विषुववृत्ताचे उत्तरेस ८अंश ४ मिनिट ते ३७ अंश ६ मिनिट अक्षांशावर असून ६८ अंश ७ मिनिट ते ९७ अंश २५ मिनिट पूर्व रेखांशावर आहे.
  • भारताचे क्षेत्रफळ ३२८७४६९ चौ. किलोमीटर असून जगात सातव्या क्रमांकावर आहे.
  • उत्तर-दक्षिण लांबी ३२१४ किलोमीटर असून पूर्व-पश्चिम २९३३ किलोमीटर आहे.
  • भारताच्या दक्षिणेला ७५१६ किमी लांबीचा अरबी समुद्र आणि हिंदी महासागराचा समुद्र किनारा आहे.
  • दक्षिण टोकाला पाल्कची सामुद्रधुनी असून पुढे श्रीलंका हा देश आहे. जवळच लक्षद्वीप हा बेटांचा समूह आहे. तसेच अंदमान आणि निकोबार हि बेटे आहेत.
  • उत्तरेला हिमालयीन पर्वत रांगा आहेत त्यापुढे चीन आणि भूतान आणि नेपाळ हे देश आहेत.
  • अति पश्चिमेला काराकोरम पर्वत रांगा आहेत त्यापुढे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे.
  • पूर्वला खासी आणि मिझो पर्वतांपुढे बांगला देश आहे.

Northern Region / उत्तर भाग:

  • ह्याला गंगेचे खोरे असे म्हणतात. हा पठाराचा भाग असून हिमालयामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत आणि पाणी भरपूर आहे हिमालयात उगम पावलेल्या गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, चंबळ, गोमती, कोसी, रावी, इत्यादी.
  • . ह्या सर्व नद्या आजूबाजूचा प्रदेश सुपीक करून बंगालच्या उपसागरास मिळतात. येथील जमीन सुपीक असून पाणी मुबलक असल्याने गहू, मका, मोहरी अशी पिके येतात.
  • थंडीत अति थंड आणि उन्हाळ्यात उष्ण हवामान अशा विषम परिस्थितीला तोंड द्यावे लागल्यामुळे लोक धिप्पाड, दणकट आणि गोरे आहेत.

Southern Region / दक्षिण भाग:

  • अरवली आणि विन्ध्य पर्वतांमुळे पठार तयार होते आणि सह्याद्रीमुळे डोंगराळ किनारपट्टी असा दक्षिण भाग होतो.
  • पाण्यासाठी नैऋत्य मान्सूनवर अवलंबून राहावे लागते. येथे गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी ह्या नद्यापण बंगालच्या उपसागराला मिळतात.
  • डोंगराळ भाग असल्याने ज्वारी, बाजरी, भात, नाचणी, असे पिक काढले जाते.
  • खूप कष्टाने शेती करावी लागते तसेच हवा पण उष्ण असते म्हणून येथील लोक काटक आणि कष्टाळू असतात आणि शक्यतो काळे किंवा गहुवर्णीय आणि आडव्या बांध्याचे असतात.

Western Region / पश्चिम भाग:

  • पश्चिमचा बराच भाग वाळवंटी असल्याने येथे हवा उष्ण आणि वाळूची जमीन असते.
  • येथे लुनी, साबरमती, तापी ह्या नद्या वाहतात.
  • हा प्रदेश अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतो, म्हणून लोक उद्यमी आहेत.
  • गहुवर्णीय आणि गोरे आहेत. राजस्थानी लोक काटक आणि धिप्पाड आहेत. येथे डाळी, तेलबिया आणि नागली अशी पिके काढतात.

Eastern Region / पूर्व भाग:

  • हा बंगाल, आसाम, मणिपुर, त्रिपुरा, नागालैंड, सिक्किम, मिझोरम, अरूणाचल प्रदेश ह्यांनी बनलेला आहे. गंगा आणि ब्रहमपुत्रा ह्या नद्यांमुळे आसाम आणि बंगाल कायम पुराच्या छायेखाली असतात.
  • तेंव्हा इथे भात जास्त असतो, अत्यंत लहरी हवामानामुळे इथले लोक काटक आणि कष्टाळू असतात. बंगाल आणि सात बहि‍णी हि सर्व विशिष्ट मंगोल चेहरेपट्टीचे असतात.
  • येथे भात हे मुख्य पिक आहे बाकी फळे पिकवली जातात.

अशा तऱ्हेने जगातील सर्व प्रकारचे हवामान आणि भोगौलिक परिस्थिती असलेला भारत हा एकमेव देश आहे. त्यात एकूण ३२ राज्ये आहेत आणि अठरा भाषा आहेत. पण शेवटी सर्व भारतीय आहेत.

Geography of India in Marathi Language / Essay Wikipedia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *