Skip to content
Home » Essay in Marathi Language » Importance of Trees Essay in Marathi | Zade Lava Zade Jagva, Tree Friend

Importance of Trees Essay in Marathi | Zade Lava Zade Jagva, Tree Friend

jhade lava jhade jagva essay

Save Trees Essay in Marathi | Essay on Importance of Trees Our Best Friend in Marathi

झाडे लावा झाडे जगवा

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी” “ कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी.” संतानी किती आत्मीयतेने निसर्गाबद्दल, वृक्ष वल्लीबद्दल लिहिले आहे. बहरलेला निसर्ग कोणाला आवडत नाही? पानांची सळसळ,पक्षांचे मधुर गीत, झऱ्याची खळखळ, धबधब्याचा घन गंभीर नाद,समुद्राच्या लाटांची गाज, निसर्गाचे हे अद्भुत रम्य रूप आपले सगळे दु:ख विसरायला लावते. कुठे कुठे उपयोगी पडतो हा निसर्ग व झाडे ?

सृष्टीशी नाते :

सृष्टीच्या चक्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे अतूट नाते आहे.दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ओक्साइड सोडतात तर झाडे कार्बन डाय ओक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. अशा तर्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व जीव सुखाने राहतात. क्षमा करा राहत होते असे म्हणायला हवे, कारण आता परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीचा समतोल राहतो बिघडला आहे. निसर्ग चक्र उलटे फिरू लागले आहे.वातावरणात ऑक्सिजन चे प्रमाण घटून प्रदूषण वाढले आहे. त्यायोगे साथीचे रोग वाढले आहेत.

कृतघ्न मानव :

आता पृथ्वीवर प्रचंड लोकसंख्या झाली आहे. आणि अस्तित्वाच्या लढाईत एक प्रजाती दुसर्या प्रजातीवर हल्ला चढवीत आहेत. आणि बळी तो कान पिळी ह्या न्यायाने मनुष्य जात सगळ्यांवर पुरून उरते आहे. मनुष्य हा असा एकाच प्राणी आहे जो गरज नसतांना दुसऱ्या प्राण्याचा जीव घेतो. मग झाडे तर बिचारी मुकी असतात. त्यांना जीव असतो हे तरी आपल्याला ठाऊक आहे का? आपल्या स्वार्थासाठी दुसर्याचा जीव घेणे ही आता अगदी सहज प्रवृत्ती झाली आहे. आता पर्यंत आपण झाडांना पाने फुले व फळांसाठी ओरबाडत होतो. आता प्रत्येकाला स्वत:चे घर हवे आहे. त्यामुळे घरांचे प्रचंड बांधकाम होत आहे. त्यासाठी कृतघ्न मानव बेसुमार जंगलतोड करीत आहे.

माणसाचा आत्मघातकी अदूरदर्शीपणा :

स्वार्थाने मानव इतका आंधळा झाला आहे की ही झाडे तोडताना आपणच आपल्या पाया वर कुऱ्हाड मारून घेत आहोत हे त्याला काळात नाही.
आज सगळीकडची हिरवळ नष्ट होऊन सीमेंटचे जंगल उभे राहिले आहे.

त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन विरळ झाला आहे. त्यातून २०/२५ मजली टोलेजंग इमारतींमुळे मोकळी हवा राहिली नाही आहे. बिल्डर बांधकामासाठी आणि रस्त्यांसाठी मोठी मोठी झाडे तोडतात. त्यामुळे रस्त्यांवरची सावली देणारी झाडे नामशेष झाली आहेत. रणरण उन्हा मध्ये आता सावलीचा कवडसा पण राहिला नाही. शंभर दोनशे वर्षांची झाडे ही अभिमानाची गोष्ट असते. अमेरिकेत अशा एका हमरस्त्यावरील ३०० वर्षे जुन्या झाडामधून बोगदा काढला आहे आणि त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण मात्र ही मोठी मोठी झाडे निर्दयतेने तोडीत आहोत. ह्याची आपल्याला भविष्यात काय किमत द्यावी लागेल ह्याचा कोणीही विचार करीत नाही.

घोर परिणाम :

ह्याचे घोर परिणाम आता हळूहळू दिसायला लागले आहेत. गेले चार पाच वर्षे आपल्याला दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि शेती पावसावरच अवलंबून आहे. मग पाऊस पडला नाही तर काय परिणाम होतात? शेतीत धान्य उगवणार कसे? प्यायला पाणी कुठून आणणार ? कारखाने कुठून वीज मिळवणार? पाणी हे जीवन आहे तेच नष्ट होणार? कशामुळे झाले हे? आपली घोडचूक ह्या अवस्थेला कारणीभूत आहे. दिसेल त्या जमिनीवर घरे बांधून आपण झाडे नष्ट केली. आपणास हे माहित नाही की झाडांचा आणि पावसाचा संबंध आहे.

परोपकाराय फलन्ति वृक्ष :

झाडे ही आपल्यासाठी परमेश्वर आहेत, असायला हवीत. झाडे फळे भाजी, लाकूड आणि सावली तर देतातच त्याच बरोबर त्यांची मुळे जमिनीत घट्ट पकडून राहतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. पर्वत राशींवर असलेल्या झाडांमुळे ढगांना अटकाव होऊन पाऊस पडतो समुद्र किनाऱ्या लगतची तिवरांची झाडे खाडीच्या भरतीच्या पाण्याला अटकाव करतात. ती हटवून खाडीवर उंच इमारती बांधतात आहेत. पण तिवरांचे जंगल नष्ट केले तर खाडीतील भरतीच्या पाण्याला अटकाव होणार नाही आणि ते वस्तीत शिरेल. ह्याचे प्रत्यंतर गेल्या काही वर्षात आलेल्या पुरांवरून समजायला हवे. निसर्ग आपणास धोक्याची जाणीव करून देत आहे, पण एकदा आपण ती पातळी ओलांडली की आपणास कोणीच वाचवू शकणार नाही. आणि जग बुडी होईल. हे काही विचारवन्तास आणि वैज्ञानिकास समजले आणि वेळीच त्यांनी जागृती सुरु केली.

वृक्ष संवर्धन मोहीम :

अशा काही विचारवंतानी सरकार आणि समाजसेवी संघटनाना सामील करून घेऊन जनजागृती सुरु केली. सरकारनेही त्यांना साथ दिली. ठिकठिकाणी पोस्टर, TV वर जाहिराती, शाळांमध्ये प्रचार अशा सर्व तर्हेने जनजागृती केली. परिणामी लोकांना वृक्ष संवर्धनाचे महत्व पटले आहे. आता सर्व जण आपली परिसरात झाडे लावीत आहेत.

सरकार पण सामाजिक कार्याची सुरुवात वृक्षारोपणाने करीत आहेत आणि ती झाडे जगवण्याचे कंत्राट दिले जात आहे. काही निष्ठावंत लोक स्वत: पाण्याच्या बाटल्या घेऊन डोंगरांवर झाडे लावून ती वाढवित आहेत. सगळे आपल्या परीने ह्या जगन्नाथाच्या रथाला हातभार लावीत आहेत. हे एक आशादायी चित्र आहे. आता सरकार पण बांधकामाची परवानगी देताना झाडे लावण्याची सक्ती तसेच आहे त्या झाडांचे नुकसान होणार नाही हे बघून परवानगी देते.

चला तर मग आपण पण शपथ घेऊया ,झाडे लावूया, झाडे जगवूया. आणि आपली सुजलाम सुफलाम सश्य श्यामला भारत भूमीला तिचे जुने वैभव प्राप्त करवून देऊया.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Importance of Trees in Marathi Wikipedia

Slogans, Autobiography Tree & Zadache Mahatva Essay in Marathi

3 thoughts on “Importance of Trees Essay in Marathi | Zade Lava Zade Jagva, Tree Friend”

  1. Mala nisrg ha vishay khup avdato & mala asha ekhdya fild madhe kam karayla bhetla tr nakki mi Karen I hope 1 na 1 divasto yeil but vishy ha purna manapsun asla pahije

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *