Skip to content

Nitin Gadkari Biography, Wiki, Caste, Wife, Contact, BJP, Height

nitin gadkari marathi politician
Name Nitin Gadkari (नितिन गडकरी) (Full name: Nitin Jairam Gadkari)

Birth date / Age / How old 27th May 1957. As of 2024, he is around 67 years old.

Marital Status / Marriage / Wife Married to Kanchan Gadkari

Current Political Party Bhartiya Janata Party (BJP) (भाजप)

Nitin Gadkari Address
Nagpur
Gadkari Wada, Upadhye Road,
Mahal, Nagpur 440 002. M. S. (India)

Mumbai
1201-A, 12th Floor,
Sukhada Co-Op. Hsg. Soc. Ltd.,
Sir Pochkhanwala Marg,
Worli, Mumbai 400030

Delhi
13, Teen Murti Lane
New Delhi – 110011

Biography / Wiki
Early Years and Education : जन्म आणि शिक्षण
नितीन गडकरी महाराष्ट्रातले आज भाजपचे क्रमांक एकचे नेते आहेत. गोपीनाथ मुंडेंनंतर नितीन गडकरी आज महाराष्ट्रातले,दिल्लीतले सर्वांत महत्वाचे नेते ठरलेत. नागपूर ते दिल्ली असा नितीन गडकरींचा प्रवास सोपा नव्हता. नितीन गडकरींनी देखील आपली राजकीय कारकिर्द घडवली ती संघर्षातून आणि स्वकर्तृत्वाने. गडकरी यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण संयोगानं त्यांचा जन्म झाला तो नागपूरमध्ये. नागपूर ही राष्ट्रीय स्वयमसेवक संघाची जन्मभूमी आहे. त्यामुळे गडकरींच्या राजकीय जडणघडणीत नागपूरची आणि संघाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. जयराम आणि भानुताई गडकरी यांच्या घरी नितीन गडकरींचा जन्म झाला. ब्राम्हण कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांच्या घरी सुरवातीपासून शैक्षणिक वातावरण होतं. पण घरची परिस्थिती फारसी चांगली नव्हती. त्यामुळे गडकरींना शिक्षणासाठीही संघर्ष करावा लागला. फक्त शिक्षण घेऊन चालणार नव्हतं, तर त्यांना कुटुंबाचा आधारही व्हावं लागणार होतं. त्यामुळे नितीन गडकरींनी खूप आधीच आयुष्यातला संघर्ष बघितला. त्याची झलक आपल्याला त्यांच्या राजकीय आयुष्यात बघायला मिळते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, नितीन गडकरींनी पहिले एम.कॉम आणि त्यानंतर कायद्याचं शिक्षण घेतलं. नितीन गडकरींचा हा शिक्षणाचा कालखंड हा खऱ्या अर्थानं त्यांना घडवणारा आणि पुढच्या राजकीय वाटचालीसाठी तयार करणारा ठरला.

Political Journey : राजकीय प्रवास –

नितीन गडकरींचं महाविद्यालयीन शिक्षण हे खरंतर राजकारणाचं शिक्षण होत असं म्हटलं तर गैर ठरू नये.
गडकरी हे कट्टर स्वंयमसेवक आहेत. संघाचे कट्टर कार्यकर्ते, गडकरींवर पहिलेपासून संघाचा प्रभाव होता. संघाचे संस्कार आणि संघाची शिकवण गडकरींमध्ये पक्की भिनली आहे. दत्ताजी आणि यशवंत केळकर यांच्यापासून प्रेरीत होऊन नितीन गडकरींनी विद्यार्थी चळवळीत उडी घेतली. नितीन गडकरींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. आणि वेगवेगळे लढे त्यांनी द्यायला सुरवात केली. शैक्षणिक शुल्क वाढ, शैक्षणिक क्षेत्रात सरकारचा वाढता हस्तक्षेप, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर नितीन गडकरी आंदोलन करू लागले. विद्यार्थ्यांमध्ये त्याचं नेतृत्व लोकप्रिय होऊ लागलं होतं.ही त्यांच्या पुढच्या वाटचालीची ही झलक होती. पुढे येणाऱ्या मोठ्या राजकीय जबाबदारीसाठी नितीन गडकरी तयार होत होते. आणिबाणि विरोधातल्या लढ्यात नितीन गडकरीही सक्रीय होते. आणिबाणिला विरोध केल्यामुळे नितीन गडकरींना तुरुंगाची हवाही खावी लागली होती.

पण नितीन गडकरींच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात झाली, ती आणिबाणीनंतर वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी, 1983मध्ये नितीनजी भारतीय युवा मोर्च्याचे अध्यक्ष बनले. आणि त्यांच्या नेतृत्वाला दिशा मिळाली. जनसंघाचे वरिष्ठ नेते, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात ते राजकारणाचे धडे गिरवत होते. 1985मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. पण 1989मध्ये पदवीधर मतदार संघातून, गडकरी विधानपरिषदेवर निवडून गेले. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. तब्बल पाचवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत धरण्याचं काम त्यांनी केलं.विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच वाखाण्याजोगी होती. 1995मध्ये राज्यात युतीच सरकार आलं. आणि नितीन गडकरींना सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. आतापर्यंत ज्या विकासाच्या योजाना त्यांच्या मनात होत्या, त्या योजना प्रत्यक्षात आणण्याची मोठी संधी त्यांना मिळाली होती.

मंत्रिपदाचा कार्यकाळ – ‘रोडकरी’

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकामंत्री म्हणून नितीन गडकरींनी आपला वेगळा ठसा उमटवला. जेव्हा राजकीय महत्वकांक्षा असते आणि काम करण्याची प्रामाणिक तळमळ असते तेंव्हा, नेते काय करू शकतात हे नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकाळात दाखवून दिलं. सार्वजनिक खात्याचा कामकाज हाती घेताच त्यांनी एमएसआरडीसी या शंभर टक्के सरकारी कंपनीची स्थापना केली. आणि शेअर बाजारातून या कंपनीनं जवळपास 1180 कोटी रुपये उभे केले. या कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारनं विविध रस्त्याची कामं हाती घेतली. मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधण्यात आले. मुंबईमधली ट्राफीकची कोंडी फोडायची असेलं तर उड्डाणपूलाला पर्याय नाही, हे गडकरींनी ओळखलं होतं. त्यातूनचं त्यांनी मुंबईत उड्डाणपूलांचं जाळं विणलं. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे हा नितीन गडकरींचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. खासगी मदतीतून रस्ता बांधण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. त्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पावर सुरवातीला टीका झाली. पण आज मात्र त्यांच्या या कामाचं सगळे कौतुक करतात. 1500 कोटी खर्च करून त्यांनी हा महामार्ग बांधला.

त्यानंतर या काळात त्यांची आणखी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे, जे सीव्हील इंजिनिअर्स बेरोजगार होते.त्यांना कंत्राटदार होण्यासाठी गडकरींनी प्रोत्साहन दिलं. बेरोजगार सीव्हिल इंजिनिअर्सना त्यांनी पंधरा लाखापर्यंतचे कंत्राटं दिली. महाराष्ट्रातली गावं-शहरं रस्तानं जोडण्याचा त्यांनी सपाटाचं लावला. त्यामुळेच या काळात त्यांना ‘रोडकरी’ हे नाव पडलं होतं. पण राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा हव्या. आणि त्यासाठी रस्ते उत्तम हवेत. हे नितीन गडकरींना ठावूक होतं. त्यामुळे त्यांनी रस्ते-जोडणीला सर्वाधिक महत्व दिलं. त्याच्या कामाच्या रेट्यामुळेच आज मुंबईतलं ट्राफिक अवाक्याबाहेर गेलेलं नाही.

प्रदेशाध्यक्षपद –
नितीन गडकरींच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा उलटफेर म्हणजे, त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणे. दिल्लीतल्या भाजपच्या राजकारणावर तोपर्यंत उत्तरभारतीय नेत्यांची पकड होती. राजनाथसिंह सारख्या तगड्या नेत्याला बाजूला सारुन, नितीन गडकरींना 2009मध्ये भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. यामध्ये संघाची महत्वाची भूमिका होती. नितीन गडकरींचे संघाशी असलेल्या संबंधातून त्यांना एवढी मोठी जबाबदारी मिळाली होती. पण हा कार्यकाळ नितीन गडकरींसाठी वादग्रस्त ठरला. गडकरींच्या जवळचे संजय जोशी यांना नरेंद्र मोदींचा विरोध होता. उत्तरप्रदेशमधल्या निवडणुकांची जबाबदारी गडकरींनी संजय जोशींना सोपवली. आणि मोदी उत्तरप्रदेशमध्ये फिरकलेही नाही. त्या पराभवानंतर नरेंद्र मोदींनी संजय जोशींना हटवण्याचा आग्रह धरला. आणि गडकरींना त्यांच्यापुढे झुकावं लागलं. त्यानंतर नितीन गडकरी यांच्याविरोधात ‘पूर्ती’ घोटाळा प्रकरण आलं. या प्रकरणाला मीडियानं चांगलीच हवा दिली. हे प्रकरण नितीन गडकरी यांच्या एवढं अंगाशी आलं की त्यांना आपलं अध्यक्षपद गमवावं लागलं.

2013 मध्ये ते दुसऱ्यांदा अध्यक्ष होऊ शकले असते. पण त्यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. भाजपच्या अध्यक्षपदी निवड झालेले ते कुशाभाऊ ठाकरे यांच्यानंतर दुसरे मराठी नेते होते. पण आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्या धक्क्यातून बाहेर येत पुन्हा एकदा ते नव्या जोमानं कामाला लागले. राष्ट्रीय अध्यक्षपद गमावलं. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत. केंद्रात कॅबिनेट मंत्री बनलेत. भूपृष्ट वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय. पुन्हा एकदा गडकरी या खात्यावर आपली मोहर उमटवतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आहे.

मुंडे-गडकरी वाद –
गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातला वाद हा कायम चर्चेचा विषय राहीला.या दोघांमध्ये कायम स्पर्धा होती. पण गोपिनाथ मुंडे हे जनसामान्याचे नेते म्हणून ओळखल्या गेले. तर गडकरी कायम संघसमर्थक म्हणून, दोघांच्या वादामुळेच काही काळानंतर दोघांनाही दिल्लीत बोलावण्यात आलं. खासकरुन गडकरी प्रदेशाध्यक्ष असतांना, मुंडे-गडकरी वाद वाढला होता.पण पुढे दोघांनीही हा वाद पक्षाच्या प्रगती आड येणार नाही, याची काळजी घेतली.

Conclusion : शेवट-
नितीन गडकरी 2014 मध्ये थेट जनतेतून निवडून आले. त्यामुळे आपल्या जनतेच समर्थन नाही. हा समज त्यांनी खोडून काढला. आज महाराष्ट्रातला दिल्लीमधला सर्वाधिक सक्षम नेता म्हणून गडकरींकडे बघितल्या जातंय. मुंडे,विलासराव यांचं निधन झालंय. तर शरद पवार हे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडलेत. त्यामुळे नितीन गडकरींवरची जबाबदारी वाढलीये. नागपूर ते दिल्ली अंतर पार करणारे गडकरी आता आपल्या कर्तृत्वानं दिल्ली जिंकतात का हे बघावं लागेलं.

थोडक्यात राजकीय आढावा –
1980 – विधानपरिषदेवर आमदार
1995 – सार्वजनिक बांधकाममंत्री
2004 – प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र
2006 – प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र
2009 – राष्ट्रीय अध्यक्ष भाजप
2014 – भूपृष्ट वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री

1 thought on “Nitin Gadkari Biography, Wiki, Caste, Wife, Contact, BJP, Height”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *