Skip to content

Amit Shah Information in Marathi : Essay, Biography, Nibandh

Amit Shah Information in Marathi

अमित शाह माहिती

 • भारतात 2014 ची लोकसभेची निवडणूक घोषित झाली आणि राजकीय मंचावर एकत्र उदयाला आले “नरेंद्र मोदी” आणि “अमित शाह” – त्याने पहिले आणि त्याने जिंकले” अशा तऱ्हेने मोदी पंतप्रधान झाले.
 • मरगळलेल्या तरुणाईत चैतन्य आले आणि लोकांनी नव्या अपेक्षेने भाजप ला निर्विवाद बहुमताने निवडून दिले. गुजराथी मोदी वाराणसी मधून निवडून आले. ह्या सगळ्या चमत्कारामागे एक अतिशय कुशल राजकारणी माणसाचा हात होता तो म्हणजे अमित शाह ह्यांचा!
 • 2014 साली झालेल्या निवडणुकीने एक आश्चर्यचकित होणारी गोष्ट दाखवली. आतापर्यंत लोकसभा निवडणुकींमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळत नव्हते. अकरा धान्यांची कडबोळी बांधून कॉंग्रेस राज्य करीत होते आणि असंतोष, भ्रष्टाचार, हिंसा यांचे अराजक माजले होते.
 • कोणाच्याच पायात कोणाचाच पायपोस नव्हता. परकीय शक्ती ह्याचा फायदा घेत होत्या. अशा वेळी साऱ्या हिंदुस्तानाला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते.
 • भाजपचा सर्वात मोठा विरोधक म्हणजे कॉंग्रेस. म्हणूच शाहांनी प्रथम प्रादेशिक पक्षांबरोबर समझोता केला त्यामुळे तेथे राजवट असलेल्या मोठ्या पक्षांना हरविणे सोपे गेले. ह्याच नीतिने त्यांनी बंगाल आणि सात उत्तर पूर्व च्या राज्यात प्रथमच भाजपाला विजय मिळवून दिला आणि दक्षिणे कडे कॉंग्रेसला धक्का दिला. म्हणूच त्यांना उत्तम “आपत्ती व्यवस्थापक” आणि “आधुनिक चाणक्य” हे नाव शोभून दिसते.

आधुनिक चाणक्य

 • राजकारण दोन प्रकारचे असते विधायक आणि विघातक! दोन्हीमध्ये शत्रूचा पाडाव करण्यासाठी कुशल डावपेच असतात आणि शत्रूला चारी मुंड्या चीत करण्याचे सामर्थ्य असते. फरक एव्हढाच असतो की, विघातक कारस्थानात शत्रूबरोबर त्या घराचा, त्या कुटुंबाचा, त्या गावाचा,त्या राज्याचा आणि त्या देशाचा नायनाट होतो.
 • कितीतरी राजवटी आणि घराणी अशा पायी उध्वस्त झाली आहेत हे इतिहास सांगतो. तेंव्हा भारतात हेच चालू होते आणि सामान्य माणूस हवालदिल झाला होता.
 • अशीच अवस्था जेंव्हा मगधाच्या राज्यात नंद राजाच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते तेंव्हा झाली होती आणि आर्य चाणक्यांनी प्रतिज्ञा केली की, “जो पर्यंत नंद कुळाचा नाश होत नाही तोपर्यंत मी शेंडीची गाठ बांधणार नाही “ आणि चंद्रगुप्त मौर्य ह्याच्या मदतीने त्यांनी ती प्रतिज्ञा पूर्ण केली आणि त्यानंतर चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली मगधाचे अफाट साम्राज्य उभे राहिले.
 • ह्याला विधायक राजकारण म्हणतात. साम्राज्याचा नाश न होता फक्त वाईट प्रवृत्तीचा नाश झाला ,नवीन साम्राज्याचा पाया रचला गेला.
  हे सर्व पडद्यामागे कुशलतेने हाताळणारे आर्य चाणक्य आणि आता भारतात कार्यरत असणारे अमित शाह ह्यांच्यामध्ये हेच साधर्म्य आहे. म्हणून त्यांना आधुनिक चाणक्य म्हणतात.

अमित शाह यांचा जन्म, कुटुंब आणि शिक्षण

 • अमित शाह यांचा जन्म मुंबईत एका व्यापारी पित्याच्या पोटी सुनील चंद्र शाह ह्यांच्या पोटी 22 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. पुढचे आयष्य त्यांचे गुजरातेत गेले.
 • शिक्षण मेहसाना येथे आणि बायोकेमिस्ट्रीची पदवी सी.यु. शाह कॉलेज अहमदाबाद येथून घेतली.
 • थोडे दिवस बाबांच्या धंद्याला हातभार लावल्यानंतर त्यांनी शेयर मार्केट आणि को-ओपरेतिव्ह बँकेत काम केले. मुंबईतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू मिळाले आणि ते संघाच्या युवा वर्गाचे अभाविपचे नेतृत्व करू लागले. हळूहळू सेक्रेटरी, तालुका सेक्रेटरी, राज्य सेक्रेटरी आणि शेवटी जनरल सेक्रेटरी झाले.
 • सोनल शाह ह्या अमित शाह यांची पत्नी आहेत. जय शाह हे अमित आणि सोनल शाह यांचे पुत्र आहेत.

सहकारी बँकेचे वळण :

 • अमित शाह यांना 2000 मध्ये अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक (एडीसीबी) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
 • एडीसीबी संकटात होती आणि दूरदर्शी नेतृत्व आवश्यक होते. बँकेला सुमारे रु. 36 कोटी कर्ज होते आणि बँक बंद होण्याच्या वाट्यावर होती .
 • ती बँक डबघाईला आलेली असताना त्यांनी कुशल अर्थकारण करून तिला दुसऱ्या वर्षी 27 कोटींचा नफा मिळवून दिला. अशा तऱ्हेने शाह हे बिगडी बनानेवाले म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कार्यात कुशल असल्याचे सिद्ध झाल्याने संघाच्या बुजुर्गांचे त्यांच्याकडे लक्ष गेले.

गुजरातमध्ये अमित शहा यांची राजकीय भूमिका:

 • ते संघाच्या युवा वर्गाचे अभाविपचे नेतृत्व करू लागले. हळूहळू सेक्रेटरी, तालुका सेक्रेटरी, राज्य सेक्रेटरी आणि शेवटी जनरल सेक्रेटरी झाले.
 • अमित शाह यांनी लालकृष्ण अडवानींचा 1991 लोकसभेसाठी मध्ये प्रचार केला होता. 1995 मध्ये जेंव्हा गुजरात मध्ये निवडणूक झाली तेंव्हा त्यांनी पाहिले होते की कॉंग्रेसचा खेडोपाडी खूप बोलबाला आहे.
 • गांधीच्या नावाचा तिथे खूप प्रभाव आहे तेंव्हा त्यांनी मुत्सद्देगिरीने असंतुष्ट काँग्रेसजनांना हेरले आणि खेड्यांवर लक्ष केंद्रित केले. अशा लोकांचा उपयोग करून त्यांच्या पाठीमागे उभे रहाणाऱ्या लोकांची मते मिळवत त्यांनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि प्रथमच गुजरात मध्ये भाजपाचे राज्य आले.
 • मोदींच्या शिफारसीवर त्यांना सरखेज मध्ये निवडणूक लढवून गुजरात विधानसभेत ते मंत्री झाले. ह्याच मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले.
 • 2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तर ते 1,60,000 मतांच्या फरकाने निवडून येऊन प्रचंड विजय मिळविला.
 • मोदींच्या बरोबर राहून दोघांनी गुजरात मध्ये सर्व विरोधकांचे पाळेमुळे खणून त्यांना बाजूला सारून वर्चस्व प्रस्थापित केले. मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकि‍र्दीत शाह एक सामर्थ्थवान व्यक्ती म्हणून उदयास आली. एकाच वेळी त्यांनी 12 खाती सांभाळली!
 • गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन अॅक्टच्या उत्तीर्ण होण्यामध्ये अमित शहा यांनीही एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे धार्मिक रूपांतरणे कठीण होऊ शकतात. या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध आला पण शाहने यशस्वीरित्या त्याचे रक्षण केले.
 • त्या काळामध्ये कॉंग्रेस कडून त्यांच्यावर खोट्या एन्काउन्टर केस बद्दल खूप आरोप झाले. त्यांना अटक पण झाली, गुजरात मधून बाहेर पण जावे लागले, ते दिल्लीला येऊन राहिले. नंतर त्यांना परत गुजरातला येण्याची परवानगी मिळाली आणि 2012 ची विधानसभा निवडणूक पुन्हा शहा जिंकले.

राष्ट्रीय राजकारणात अमित शहा यांची भूमिका

 • 2014 मध्ये भाजप बहुमताने निवडून आल्यावर शहांचा प्रभाव वाढत गेला. भाजप चे तेव्हाचे मुख्य राजनाथ सिंग यांनी शहाना भाजपाचे जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले ते केवळ त्यांच्या अद्भुत व्यूहरचनेचे कौशल्य बघूनच. त्यांनीही ते सार्थ केले.
 • अशा रीतीने ते सरकारचे पडद्यामागचे सर्वेसर्वा बनले. सगळे महत्वाचे निर्णय, इतर पक्षांशी वाटाघाटी, पुढील योजना, मिडीयाचा अचूक वापर आणि रणनीती हे सर्व ते एकटे सांभाळत आहेत.
 • त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांची उत्कृष्ट मांडणी केली ती म्हणजे शहराच्या जागी एक मुख्य त्याच्या खाली उपमुख्य आणि त्यांच्या खाली खेडोपाडी कार्यकर्त्यांची फळी उभी केली. ह्यात इतर पक्षातील असंतुष्टांना आपल्यात ओढून घेतले.
 • 2014 मध्ये अमित शाह यांच्या देखरेखीखाली भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 लोकसभा जागांवर विजय मिळवून विजय नोंदविला. पक्षाच्या उच्च कमांडने त्यांची रणनीति आणि संघटनात्मक क्षमतांबद्दल प्रशंसा केली.
 • 2019 लोकसभा निवडणूकीत भाजपचा खरा कस लागणार होता कारण विरोधक चांगलेच पेटून उठले होते आणि त्यांनीही सोशल मिडीयाचा वापर सुरु केला होता. पण शहा आणि मोदी जोडीने पुन्हा त्यांना मागे सोडत ३०० चा वर जागा जिंकून आणल्या!
 • आता भाजपचा रथ सुसाट निघाला. मोदी भारता बाहेरची आघाडी सांभाळीत आहेत तर भारतातील राजकारण शाह सांभाळीत आहेत. मंत्री निवडीत सुद्धा त्यांनी स्वच्छ पूर्वपीठिका असलेले मंत्री निवडून आधी लोकांचा विश्वास संपादन केला आणि नवनवीन योजना कार्यान्वित करून विरोधकांचे तोंड गप्प केले. त्याचबरोबर त्या योजनांना पद्धतशीर प्रसिद्धी देऊन पक्षाची प्रतिमा उंच केली.
 • त्यांचे विशेष म्हणजे तळागाळातील लोकांपासून उच्चभ्रू ,मध्यमवर्गीय आणि बुद्धीजीवी लोकांना सुद्धा भाजपाच्या कार्याची ओळख सतत देत राहणे. ह्यासाठी त्यांनी वेबसाईट, WhatsApp इत्यादी सर्व सोशल मिडिया चा वापर करून घेतला.
 • जून २०१९ मध्ये नवीन मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून शहा भारतातले सर्वात ताकदवर कॅबिनेट मंत्री बनले आहेत. त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.

Amit Shah Information in Marathi Language Wikipedia : Essay Biography

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *