Skip to content

Swan Information in Marathi | Essay on Swan Bird, Nibandh, Mahiti

swan essays marathi

Swan Information in Marathi

Essay on Swan : राजहंस माहिती

राजहंस एक डौलदार राजबिंडा पक्षी :

लहानपणी ऐकलेले “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ,होते कुरूप वेडे पिल्लू त्यात एक” हे गाणे आठवते का? सुप्रसिद्ध अर्थ तज्ञ नरेंद्र जाधव ह्यांनी आपली आत्मचरित्रात लिहिले आहे की,”आपल्यातला राजहंस [ गुण] आपणच ओळखायचा.” दोन राजहंस आपली डौलदार मान आणि चोची जुळवून केलेली आकृती कितीतरी ठिकाणी प्रेमाचे चिन्ह म्हणून वापरले जाते. राजहंस म्हंटले की शुभ्र, सुंदर, सत्व गुणी,पवित्र, गूढ, उदात्त राजबिंडे व्यक्तिमत्व अशा सगळ्या उच्च प्रतिचे विचार मनात येतात. असे वाटते की देव लोकातून हा पक्षी पृथ्वी तलावर आला आहे. मानसरोवर आणि राजहंस यावरून किती कविता केल्या गेल्या. पौराणिक काळात सुद्धा राजहंस श्लोकातून उच्च प्रतिचा पक्षी म्हणून कल्पिलेला आहे. म्हणूनच देवी सरस्वतीने त्याला आपले वाहन बनविले आहे.

’हंस: श्वेतो बक: श्वेत: कोभेदो बकहन्सायो:|
नीर क्षीर विवेके तू हंसो हंसो बको बक: ||

म्हणजे हंस बदकापेक्षा वेगळा कसा? तर जेंव्हा दूध आणि पाणी मिसळून दोघांना देतात तेंव्हा हंस दूध आणि पाणी वेगळे करतो. बदक नाही.
असे म्हणतात की मृत्यू समयी राजहंस गोड गाणे गातो. त्यास swan song असे म्हणतात. अशा बऱ्याच आख्यायिका राजहंसा बद्दल आहेत. पण तो पण एक पक्षी आहे आणि त्याचे पण जीवन आहे. कसे ते बघू.

राहणे आणि खाणे :

राजहंस हा हंस आणि बदक ह्या वर्गातील पक्षी आहे. प्राणी जगात एवें वर्गात सिग्नस जातीत तो मोडतो. त्याच्या सहा ते सात जाती आहेत. त्या म्हणजे, काळे राजहंस, काळ्या मानेचे राजहंस, व्हूपर राजहंस, ट्रम्पटर राजहंस, तंद्रा प्रदेशातील राजहंस,म्यूट, बेविक राजहंस, आणि व्हिसलिंग राजहंस. हे मुख्यत: उत्तर गोलार्धात, ऑस्ट्रेलिया,आशिया, अमेरिका, आणि न्यूझीलंड येथे आढळतात. ते स्थलांतर करणारे पक्षी आहेत. ते शाकाहारी आहेत पण पाण्यातील छोटे किडे वगैरे पण खातात. पाणवनस्पतीचे मूळ ,खोड, पाने ते खातात.

जिंदगी भर का साथ!

त्यांच्या बद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एकनिष्ठपण ! राजहंस कधीही आपल्या जोडीदाराला सोडून जात नाही. ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. विशेष म्हणजे, एक जण मेला तर दुसरा पण त्याच्या विरहात प्राण सोडतो. त्यांचे आयुष्य १० ते १२ वर्षे असते. नराला कोब आणि मादीला पेन म्हणतात. पिल्लांना सिग्नेत म्हणतात. राजहंसाचे वजन २० ते २६ पौंड असते. ते पाण्याच्या जवळ एक मीटर वर घरटे बांधतात. एप्रिल ते जून च्या दरम्यान पिल्लांना जन्म देतात. नर मादीला घरटे बांधायला मदत करतो. मात्र पिल्लांच्या जवळ कोणी जात आहे असे वाटले तर ते हिंसक बनतात. अगदी पाण्यात पण बुडवतात.

जग भर सन्मान :

जगात राजहंस हा देवाच्या घरचा किंवा राजा पक्षी मानतात. आयरिश देशाने त्यांचे सन्मान नाणे काढले आहे. पोलिश लोकांच्या तो मिलिटरी कोटा वर विराजमान आहे. यीत्स ह्या प्रसिद्ध कवीने त्यांच्यावर कविता केल्या आहेत. फिनलंड, डेन्मार्क, लातिन भारत इत्यादी सर्व देशात तो मान्य वर आहे. म्यूट राजहंस ज्यांच्यावर कोणीच मालकी सांगत नाही ते ब्रिटन मध्ये राणीची प्रोपर्ती मानली जाते. आणि जुलै ऑगस्ट मध्ये त्यांची मोजदाद होते. त्याला UPPING म्हणतात. पूर्वी त्यांना खात असत. आता त्यावर बंदी आहे.
असा हा राजहंस -एक रुबाबदार सात्विक पक्षी.

Information of Swan in Marathi Language : Rajhans

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *