Skip to content

Ostrich Information in Marathi | Shahamrug Bird Mahiti

Ostrich Marathi Essay

Ostrich Information in Marathi

Mahiti Essay on Ostrich : शहामृग माहिती

ऑस्ट्रीच,शहामृग – पक्षी जगतातील अमिताभ बच्चन !

आफ्रिकेत गेल्यावर आपल्याला खरोखरच एखाद्या “ज्युरासिक वर्ल्ड” मध्ये गेल्यासारखे वाटेल, इतके विविध पक्षी आणि प्राणी तेथे आहेत. अजूनही डायनासोरसारखे विशाल प्राणी आपल्याला तेथे पाहायला मिळतात – हत्ती, गेंडे, सिंह. अशा विशाल प्राण्यांसारख्या विशाल पक्षी “ऑस्ट्रीच” आपल्याला कितीतरी पुरातन काळात घेऊन जातो. न उडणार्या पक्षांमध्ये सर्वात मोठा ऑस्ट्रीच आपले लक्ष वेधून घेतो अगदी बोललीवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन सारखा!

ऑस्ट्रीचचे वैज्ञानिक नाव “स्त्रुथिओ कॅमेलस” (Struthio camelus) आहे. हा पक्षी जगतातील “स्त्रुथिओनिफोर्मास (Struthioniformes)” ह्या ऑर्डरमधील “स्त्रुथिओनिडी (Struthionidae) ” कुटुंबातील पक्षी आहे. तसेच हा “रॅटीटी” ग्रुपचा सदस्य आहे, ज्यात न उडणार्या महाकाय पक्ष्यांचा समावेश आहे, जे आता फार थोडे उरले आहेत उदा, किवी, इमू आणि रहीस.

शारीरिक माहीती :

पूर्ण वाढलेला ऑस्ट्रीच २. १ ते २.८ मीटर उंच असतात. म्हणजे माणसाच्या उंचीच्या जवळपास दुपटी एवढा. आणि त्याचे वजन 150 किलोपर्यंत असते. अरे बापरे ! कल्पना करा एव्हडे मोठे ऑस्ट्रीच जर शंभरच्या संख्येने त्यांचा कळप जायला लागला तर वाटेत येणाऱ्या प्राण्याची काय अवस्था होत असेल. त्यांच्या कळपाला “फ्लोक” म्हणतात.

नर ऑस्ट्रीचला “कॉक” किंवा “रुस्टर” म्हणतात आणि मादीला “हेन.” नराचा रंग काळा पांढरा असतो आणि मादीचा तपकिरी. ऑस्ट्रीचची मान खूप लांब असते आणि शरीराच्या मनाने डोके अगदी छोटे असते. त्यावर प्रकर्षाने जागा व्यापली असते ती डोळ्यांनी.
ह्यांचे डोळे खूप मोठे व शक्तिशाली असतात. ते तब्बल २ किमी पर्यंतचे पाहू शकतात! त्यामानाने मेंदू डोळ्यांपेक्षा लहान असतो. साधारण अक्रोडा एव्हडा.

ऑस्ट्रीचचे पाय मात्र प्रचंड मजबूत असतात. त्याच्या पायाच्या दोन बोटांपैकी एकाला ताकदवर नख असते. ऑस्ट्रीचची उंची मुख्यत: पायातच असते. त्यामुळे तो अत्यंत वेगात म्हणजे ७० किमी/ तास ह्या प्रमाणे धावू शकतो. एव्हडेच नव्हे तर शत्रू जवळ येतो आहे असे वाटले तर त्याच पायाने त्याला लाथ मारून मारूही शकतो. होय, ऑस्ट्रीचच्या लाथेने सिंहपण मरू शकतो. त्याची तुलना आपण अमिताभच्या “अॅन्ग्री यंग मॅन” शी करू शकतो.

ऑस्ट्रीचच्या छातीवरील स्टर्नम सपाट असते आणि त्याला किल, जे उडण्यास मदत करते, ते नसल्याने त्याला उडता येत नाही.

राहणे आणि जीवनमान :

ऑस्ट्रीच मुख्यत्वे करून आफ्रिकेतच आढळतो. तेथील वाळवंटी, किंवा गवताळ प्रदेशात त्यांचे वास्तव्य असते. तरीपण CCMB (सेंटर फॉर सेल्युलर अॅन्ड मॉलेक्युलर बायालोजी) ने राजस्थान आणि मध्यप्रदेश येथे केलेल्या उत्खननात असे आढळून आले आहे की हा पक्षी २५००० वर्षापूर्वी तेथे होता. ५० ते ६० कोटी वर्षापूर्वी जे सलग गोंडवन खंड होते त्यात विषुववृतीय गवताळ प्रदेशात ह्या पक्ष्यांचे वास्तव्य असावे. आफ्रिकेत साव्हाना प्रदेशात ते असतात. तसेच मसाई सोमाली आणि पूर्व आफ्रिकेत असतात. अरेबियन ऑस्ट्रीच एशिया मायनर आणि अरेबिया येथे होते पण त्यांची कत्तल झाल्याने ते नामशेष झाले.

ऑस्ट्रीच तसा शाकाहारी असला तरी बारीक किडे अळ्या तो खातो. पण त्याला त्याबरोबर खडे, कंकर इत्यादी पण खावे लागते नाहीतर हे अन्न त्याला पचत नाही. तो पाण्याशिवाय बरेच दिवस राहू शकतो, ह्या काळात तो शरीरातील साठा वाया जाऊ देत नाही आणि वाळवंटातील मांसल वनस्पतीतील पाणी घेतो.

ऑस्ट्रीच साधारण ४० ते ५० वर्षे जगतो. त्यांचा पुनरुत्पादानाचा काळ हा जून किंवा जुलै असतो. नर आणि ५, ६ माद्या असा कळप असतो आणि त्यात एक बेगम/ पट्टराणी आणि बाकी जनाना असतो. बेगम एकावेळी ११ ते १५ अंडी, नराने तयार केलेल्या कॉमन घरट्यात घालते. आणि बाकीच्या माद्या १, २ अंडी घालतात. बेगमेला जर अडचण झाली तर ती इतर माद्यांची अंडी बाहेर टाकते. ऑस्ट्रीच मादी आपले अंडे ओळखू शकते. नर वाळूमध्ये खोदून घरटे तयार करतो. मादी दिवसा आणि नर रात्री अंडे उबवतात. त्यामुळेच नराचे पंख काळे आणि मादीचे वाळूशी संयोजन होण्यास तपकिरी असतात.

मादी थोड्या थोड्या वेळाने अंडे हलवते. त्यामुळे असे वाटते की ऑस्ट्रीच वाळूत डोके खुपसून झोपतो. पण हा समज खोटा आहे. ऑस्ट्रीच जसा मोठा आहे तसे त्याचे अंडे पण जगातील सर्वात मोठे अंडे आहे. ३५ ते ४० दिवसांनी अंडे उबते. १८ महिन्यांनी ते पिल्लू उडू लागते. पण केवळ १५ % पिले प्रौढावस्था पर्यंत जगतात.

ऑस्ट्रीचचे शत्रू म्हणजे सिंह, चिते आणि अफ्रिकन कुत्रे. मुंगूस, गिधाडे इत्यादी पक्षी त्यांची अंडी आणि लहान पिल्ले खातात. त्यांच्यापासून संरक्षण फक्त पळूनच करता येते. नाहीतर तो पंख पसरून आणि वाळूत चोच खुपसून बसतो ज्यामुळे शत्रूला वाळूत त्याला ओळखता येत नाही. म्हणून आफ्रिकेत ऑस्ट्रीच झेब्रा, गवा ह्यासारख्या प्राण्यांच्या कळपाबरोबर राहतात. त्यांचे परस्पर सहयोग असतो. म्हणजे हे प्राणी जमीन उकरून ऑस्ट्रीचना किडे मकोडे खाण्यास देतात आणि त्या बदल्यात ऑस्ट्रीच त्याच्या लांब पल्ल्याच्या नजरेने सिंह,चित्ता आल्याची खबर देतात.

असा हा उत्पात्तीशास्त्रातील प्राचीन आणि अर्वाचीन काळातील दुवा असलेला प्राणी आता फक्त आफ्रिकेतच बघायला मिळतो. अर्थात ह्याचा चुलत भाऊ इमू हा पशु पालनासाठी वापरला जातो. तो लहान असतो पण बराचसा ऑस्ट्रीच सारखाच दिसतो. भारतात इमू पालन हा किफायतशीर धंदा आहे.

Shahamrug Information in Marathi Wikipedia / Ostrich Egg Mahiti

1 thought on “Ostrich Information in Marathi | Shahamrug Bird Mahiti”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *