Skip to content
Home » Tips Information in Marathi » Phoenix Information in Marathi Language | फिनिक्स Essay, Mahiti, Info

Phoenix Information in Marathi Language | फिनिक्स Essay, Mahiti, Info

Phoenix Marathi Mahiti

Phoenix Information in Marathi

फिनिक्स माहिती

Phoenix Info :

  • फिनिक्स…फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घे, फिनिक्स पक्ष्यासारखा पुनर्जीवन मिळाला, त्याने फिनिक्स पक्ष्यासारखा राखेतून जन्म घेतला अशी एक ना अनेक म्हणी आणि वाक्यप्रचार आपण दैनंदिन जीवनात ऐकतो आणि वापरात असतो. आहे तरी कोण बरे हा पक्षी?? कुठे आढळतो?? दिसतो तरी कसा?? कुणी याला बघितला आहे का? लोक म्हणतात तो एक काल्पनिक पक्षी आहे?? चला तर मग आज आपण बघुयात कि फिनिक्स पक्षी नेमके आहे तरी काय?
  • हॅरी पॉटर आणि रहस्यमयी तेहखान या हॅरी पॉटर शृंखलेतील दुसऱ्या सिनेमामध्ये ज्वाला नामक पक्षी दाखवण्यात आलेला आहे, तो आपण बघितला असेलच. हा ज्वाला म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून राखेतून जन्म घेणारा फिनिक्स आहे. केवढा सुंदर चित्रण केल आहे या पक्ष्याचा या सिनेमा मध्ये, म्हातारा झालेला ज्वाला स्वतःला आग लावून घेतो आणि काही वेळातच परत एका पिल्लाच्या रूपात जन्म घेतो. आणि नंतर हॅरी चा मदतीला धावून येतो, कितीही वजन उचलू शकणार आणि गंभीर जखमा याच्या अश्रुने पुसून टाकणारा असा हा अदभूत पक्षी यामध्ये दाखवला आहे.

History of the Phoenix / फिनिक्स चा इतिहास :

  • फिनिक्स हा एक काल्पनिक पक्षी आहे कि खरोखर अस्तित्वात असणारा पक्षी याबद्दल अनेक मतभेद आहेत. प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृतीमध्ये याचा उगम आढळतो. सूर्याचा प्रतीक म्हणून या पक्ष्याला संबोधले जाते. काही ठराविक कालांतरानंतर स्वतःच्या झालेल्या राखेतून पुनरुज्जीवन करणारा हा पक्षी अत्यंत पवित्र आणला गेलेला आहे. जणू काही पुनर्जन्माचे संकेतच हा पक्षी देत असतो.
  • सर्वसाधारणपणे तो नूतनीकरणाचे प्रतीक आहे म्ह्णून साम्राज्य, सूर्य, जीवन, वेळ, पावित्र्य यांचे तो प्रतीक असू शकतो. फिनिक्स हे नाव त्याला ग्रीक लॅटिन भाषेमधून आलेल्या फिनिशियन शब्दापासून मिळालेला आहे, ज्याचा अर्थ लाल रंगात काम करणारे लोक असा होतो. म्हणूनच फिनिक्स चा अर्थ फिनिशियन बर्ड किंवा लाल जांभळा पक्षी असा होतो.

Description of the Phoenix / फिनिक्सचे वर्णन :

  • फिनिक्स च्या रंगाबद्दल आणि वर्णनाबद्दल अनेक वैविध्य प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात आढळते. सूर्यासारखा तेजस्वी असणारा हा पक्षी म्हणून त्याचा गौरव केला गेला. काहींनी त्याची तुलना गरुडासोबत केली, काहींनी मोरासोबत तर काहींनी शहामृगासोबत.
  • याच्या रंगावरून देखील अनेक मतभेद आहेत, काही साहित्यिकांना वाटते कि त्याचा रंग लाल आणि सोनेरी आहे. त्याचा रंग बाकी पक्ष्यांपासून भिन्न आहे, हा रंगीत पक्षी आहे. तसेच याचा रंग लाल आहे आणि डोळे पिवळे असा दावा देखील काही साहित्यिकांनी केला. याचे डोळे निळे आहेत आणि पाय गुलाबी आहेत, तर पायावर सोनेरी सोन्यासारखे कवच आहे असेदेखील वर्णन आढळते. हा आकाराने मोठा असलेला पक्षी आहे असेपण उल्लेख आढळतात. हेलीयोज म्हणजे सात किरणे असलेला सूर्य आणि या किरणांसारख्या पिसांचा मुकुट या पक्ष्याच्या डोक्यावर आहे असे वर्णन याचे जुन्या ग्रीक प्रतिमांमध्ये आढळते. म्हणून काहींनी याची तुलना कोम्बड्यासोबत केली आहे. मूळचा ग्रीक इजिप्टीशियन संस्कृतीच्या फिनिक्सचे नंतर युरोपियन संस्कृतीतही दाखले मिळतात. येशूच्या जीवनमरणाचा आणि फिनिक्स चा संबंध जोडल्याचे तेथे बघावयास मिळते.

Information of Phoenix in Marathi / Phoenix Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *