Hummingbird Marathi Mahiti

Humming Bird Information in Marathi | हमिंग बर्ड (गुंजन पक्षी ) माहिती

Humming Bird Information in Marathi

हमिंग बर्ड- एक पंखांनी गाणारा पक्षी

वसंताच्या आगमनाबरोबर शुभ शकून घेऊन येणारा पक्षी म्हणजे अख्ख्या अमेरिकेचा आवडता पक्षी हमिंग बर्ड. गाणारा पक्षी. ह्याचे दर्शन सर्वात पहिल्यांदा ज्याला होईल त्याला सुख, समृद्धी मिळेल असा अमेरिकेत समज आहे. पण हा चिमुकला पक्षी दिसला तर ना? कारण तो फक्त फुलांचा मध घेतांना जी प्रचंड वेगाने पंखांची फडफड करतो त्यातून मधूर आवाज येतो. म्हणून अमेरिकन लोक हौसेने त्यांनी यावे म्हणून बर्ड फीडर तसेच मधासारखे लागावे म्हणून साखरेचे पाणी आणि काय काय आणून ठेवतात.अमेरिकेत ह्यांच्या ३४० पैकी निम्म्या जाती आहेत. इतका हा विविध प्रकारचा आहे. त्यांची बारीक सुई सारखी चोच अगदी हलके चिमुकले शरीर आणि अंगावरचा रंगीबिरंगी कोट वसंताच्या रंगीबिरंगी फुलांबरोबर समरसून जातो.बागेत जितकी फुलांच्या रंगांची उधळण असते तितकीच ह्यांच्या अंगावरच्या कोटावर असते.

History of Humming Bird / हमिंग बर्डचा इतिहास :

  • अगदी सहजतेने उपलब्ध असणारा हा पक्षी वंश शास्त्राप्रमाणे मात्र खूप पूर्वीचा म्हणजे 30 ते 50 मिलियन वर्षांपूर्वीचा आहे.
  • महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती तसे मोठे मोठे प्राणी अस्तंगत झाले पण हा अजून टिकून आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यात संकरामुळे अजून नव्या नव्या जाती तयार होत आहेत.
  • हमिंग बर्ड हा ऍनिमल किंगडम मधील एव्हज क्लास मधला आणि त्रोचीलीडी कुटुंबातील प्राणी आहे.
  • वर सांगितल्याप्रमाणे ह्याचे पहिले जीवाश्म 22 मिलियन वर्षापूर्वीचे होते आता 2013 आणि 14 मध्ये जवळ जवळ 40 ते 50 वर्षापूर्वीचे जीवाश्म सापडले असा दावा केला जातो आहे. ह्याच्या ३४० जाती आहेत.
  • पण मुख्य म्हणजे बी हमिंग बर्ड, अण्णा, विओलेतर, ब्लैक चीन, त्रोचीलिनी,रुफोस ,मार्व्ह्लास ,ब्रोड टेल्ड ,अलेन,.
  • हे न्यू वर्ल्ड पासून तीएरा ,डेल फुगेतो, ते साउथ अलास्का पर्यंत आहेत.दक्षिण आफ्रिके मध्ये अन्डीज पर्वतांच्या रांगांमध्ये140 जाती आढळतात.
  • अमेरिकेत त्याच्या 9 जाती पडल्या आहेत. टोपाझ, मांगो, ब्रील्लींत, कोकेत्ती इत्यादी.

Humming Bird Information / हमिंग बर्डची माहिती :

  • हमिंग बर्ड मध्ये नर आणि मादी दोघेही सारखेच दिसतात. फक्त मादीची चोच लांब असते.
  • काही जातीत मात्र नर मोठा दिसतो अर्थात ह्या चिमुकली पक्ष्यात आणखी किती मोठा दिसणार? कारण ह्यांना सर्वात लहान पक्षी म्हणतात.
  • ह्यांची लांबी साधारण पणे जास्तीत जास्त 5 सें.मी. असते आणि वजन 2 ते 3 ग्राम पर्यंत.
  • बी हमिंग बर्ड सर्वात लहान पक्षी आहे. त्याचे वजन फक्त 2 ग्राम असते. ह्यांची चोच अतिशय अणकुचीदार असते आणि आत मध्ये स्ट्रॉ सारखी जीभ असते.
  • तुम्ही पाहिले असेल की खाली झुकलेल्या फुलांच्या गुच्छातून हा पक्षी एका फुलातून मध शोषून घेतो.
  • त्यावेळी तो मध शोषत नाही तर प्रयोग शाळेत आपण जसे पिपेटने द्रव खेचतो तसा तो मध पितो. निशिगंधसारख्या नळी सारख्या फुलातून मध शोषताना त्यांना ह्या जिभेचा उपयोग होतो आणि झुकलेल्या फुलातून मध घेतांना तोल सावरावा म्हणून ते असंख्य वेगाने पंखांची फडफड करतात आणि त्यावेळी ते मान ताठ ठेवतात.
  • मध पिताना ते आजूबाजूच्या धोक्यावर पण लक्ष ठेवतात. त्यांना अल्ट्रासाउंड ऐकायची शक्ती असते. तसेच अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या जवळची वेव्ह लेन्थ दिसते.
  • त्यामुळे त्यांना पटकन धोक्याची चाहूल जरी लागली तरी ते सावध होतात.
  • ते सेकन्डला 70 ते 80 वेळा पंखांची फडफड करतात. त्यांचा उडण्याचा वेग 79 की.मी.एका तासाला असतो. तरी ते स्थलांतर करतांना 3000 की.मी एकावेळी न थांबता जाऊ शकतात. रुफोस नावाचा हमिंग बर्ड अलास्का ते मेक्सिको 3900 मैल जाऊ शकतो.
  • हे अंतर त्याच्या लांबीच्या 78,47,0000 पट मोठे आहे.पुरेसे पोट भरण्यासाठी एकावेळी त्याला 1000ते 1200 फुलाना भेट द्यावी लागते.
  • याची पचन संस्था अतिशय कार्यक्षम आहे आणि ह्याला एकसारखे खावे लागते.
  • हा मधमाशांसारखा ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज घेत नाही तर सुक्रोज घेतो.
  • तसेच हा छोटे किडे उदा.डास, नॅट, अफिद स्पायडर असे खातो. ह्याचे पेक्टोरल स्नायू आतून खूप ताकदवान असतात आणि ह्याचे वजन त्यातच असते.
  • ह्यांच्या कळपाला फ्लोक न म्हणता “चार्म” असे म्हणतात. हे जानेवारीच्या सुमारास दक्षिणेकडे स्थलांतर करतात.

Nesting / प्रजनन :

  • मादी घरटे तयार करते आणि अंडी उबवते. तीच पिल्लांची काळजी घेते. मादी घरटे जमिनीपासून 10 ते 12 फुटावर गर्द झाडांच्या पानात बांधते.
  • घरट्यासाठी कोळ्याचे जाळ्याचे सिल्क आणि लायकेनचा उपयोग करते. एकावेळी 2 अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची आणि तरारून फुगलेल्या द्राक्षासारखी दिसतात.
  • 10/12 दिवसानी चोच वगैरे दिसते. डोळे बंद असतात. एका सीजन मध्ये 14 ते 23 अंडी घालते. पण ह्यातील फक्त 2/3च जगून मोठे होतात.
  • ह्या पक्षाचे तसे पाहिले तर आयुष्य 10 वर्षाचे असते, जर सुरवातीला जगले तरच.
  • ह्यांना खूप शत्रू असतात. हे पण तसे आक्रमक असतात. सहसा त्यांच्या वाटेला जाऊ नये पण गेल्यास ते डोळ्यांवर हल्ला करतात.
  • अमेरिकेत ह्यांना खाण्यासाठी साखरेचे पाणी भरलेले फिडर जागोजागी असते. पण दुरूनच त्यांना पाहायचे.

Huming Bird Habitat / हमिंग बर्ड निवासस्थान:

  • टोरपोर: हि एक प्रकारची योगनिद्रा म्हणता येईल. बेडूक जसा हायबरनेशन मध्ये जातो तसे हे पक्षी झोपताना छातीचे ठोके 1200 वरून 50 ते 180 वर आणतात. त्याने एनर्जी ऱ्हास कमी होतो कारण ह्याचे पोट 2/2 तासात रिकामे होते. ते झोपेत त्रास होऊ नये म्हणून हा खटाटोप करतो.
  • ह्याला टोरपोर म्हणतात. ह्यामुळे डिहाइड्रेशन कमी होते. तसेच परमेश्वराने ह्याची किडनी अशी बनविली आहे की, ती सोडियम आणि पोटॅशिअम ह्यांचे संतुलन नीट ठेवते.

हमिंग बर्डला शुभ संकेत देणारा पक्षी मानतात. तसेच अझटेक ह्या गॉड ऑफ वॉरने स्वत:ला हमिंग बर्ड म्हणून दर्शविले आहे. त्रिनिनाद आणि टोबॅको लॅंड येथे आर्मी कोट वर आणि एक सेंटच्या नाण्यावर ह्याचे चित्र आहे.

Information of Humming Bird in Marathi / Humming Bird Mahiti Wikipedia

1 thought on “Humming Bird Information in Marathi | हमिंग बर्ड (गुंजन पक्षी ) माहिती”

  1. Prathamesh Pandurang Narute

    हा पक्षी आमच्या घराच्या porch मध्ये घरटे बांधून राहिला आहे. तो इथला आहे का ? बाहेरून आला आहे.
    B/p Kolhapur, panahala

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *