Invitation Letter in Marathi
डोहाळे जेवणाचे निमंत्रण
|| श्री गणेशाय नम: || || श्री महालक्ष्मी प्रसन्न|| || श्री स्वामी समर्थ||
आग्रहाचे निमंत्रण :-
“कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा घरी येणार येणार गं.
लाडक्या राणीला लागले डोहाळे
पुरवा सोहळे रामराय.
ओटी भरा गं ओटी भरा, हिची ओटी भरा.
वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते, शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणि नव्या पाहुण्याची चाहूल घरादाराला आनंदाच्या सरींनी भिजवीते.”
सस्नेह नमस्कार,
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात एका नवीन पाहुण्याची चाहूल लागली आहे. हे आनंदाचे गाठोडे आमच्या घरी आमच्या स्नुषेच्या पोटी देवाकडून येऊ घातले आहे. त्यानिमित्ताने आम्ही आमची स्नुषा सौ. गिरीजा हिचे डोहाळे जेवण करण्याचे ठरविले आहे.आमच्या या आनंदात आपली शुभ उपस्थिती अपेक्षित आहे. तरी आपण आपल्या इष्ट मैत्रिणींसह दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी, संध्याकाळी 6 वाजता आमच्या घरी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि आग्रहाची विनंती.वाडी भरणे आणि ओटी भरण्याची वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. त्यानंतर काही गाणी वगैरे होतील. आणि त्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा हि विनंती.
आपली स्नेहांकित,
सौ आशा रमेश देव.
वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे.
सौ. सोनाली अंकुश देव.
सौ. मधुरा मिलिंद कुळकर्णी.
आमच्या मामीच्या डोहाळजेवणाला नक्की या हं!
सोहम, शोनू आणि छकुली.
कार्यक्रमाची वेळ संध्याकळी 6 वाजता.
कार्यक्रमाचे स्थळ:- श्री. रमेश देव यांचा बंगला,
“सार्थक” प्रशांतनगर हौसिंग सोसायटी, मुम्बई पुणे रोड, कळवा, जिल्हा ठाणे- 400605.
फोन मोबाईल नं. xxxxxxxxxxxx.
ता.क.:- करोनाच्या कारणाने जर कार्यक्रमास परवानगी नाकारली तर हा कार्यक्रम ह्याच वेळी ऑनलाईन साजरा करण्यात येईल. तशी आगाऊ सूचना आपल्या ई-मेल वर देईन. सर्वांनी त्यावेळी झूम वर यावे हि आग्रहाची विनंती.