Skip to content
Home » Tips Information in Marathi » Vastu Shanti Invitation Card in Marathi | Nimantran Patrika Card Format

Vastu Shanti Invitation Card in Marathi | Nimantran Patrika Card Format

Vastu_Shanti

Vastu Shanti Invitation in Marathi

वास्तुशांतीचे निमंत्रण / Vastu Shanti Nimantran Patrika Matter

“घर असावे दोघांचे, नसाव्या तेथे दुराव्याच्या भिंती,
घरात चिमुकली किलबिल असावी ,नसाव्या कुरापती ,
प्रत्येकाचे स्वप्न असते आपले स्वत:चे घर असावे
त्या छोट्याश्या विश्वामध्ये आपले सारे सुख नांदावे.
त्या स्वप्नाची पूर्ती कराया लागावे आपले तन,मन आणि धन
सार्थकतेच्या आनंदाचे जिवलगांसमावेत वेचावे मधुर क्षण.”

…………………………………………………

सस्नेह नमस्कार,
कळविण्यास अत्यंत हर्ष होत आहे की, आज आमच्या स्वप्नांची पूर्ती करणारा मधुर क्षण आलेला आहे.आमचे छोटेसे घरकुल आम्हाला मिळालेले आहे. आमच्या छोट्याशा जगात आता आम्ही प्रवेश केलेला आहे आणि हा अवर्णनीय क्षण आम्हा दोघांना आपल्या मधुर उपस्थितीत साजरा करावयाचा आहे. तरी आम्ही आग्रहाची विनंती करतो की, आमच्या घराच्या वास्तुशांतीला आपण हजर राहून आमचा आनंद द्विगुणीत करावा. आमच्या घराची वास्तुशांत दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता संपन्न होणार आहे.त्याचवेळी श्री सत्यनारायण पूजन पण आहे. तरी आपण सर्वांनी इष्ट मित्रांसमवेत हजर राहून आम्हांस शुभाशीर्वाद द्यावे. आणि त्यानंतरच्या भोजन समारंभाचा व सत्यनारायणाचा प्रसाद घ्यावा हि विनंती.

कळावे,
स्वागतोत्सुक,
श्री. वसंत श्रीकृष्ण महाजन
सौ उषा वसंत महाजन.

वरील विनंतीस मान देऊन अगत्य यावे.
चि. संदीप, सुषमा आणि युवराज महाजन.

आमच्या घराचा पत्ता:-

1.फ्लॅट नं. 201, सिद्धिविनायक को ओपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी,
मंगलपाडा, दीनदयाळ चौक, आंबेडकर रोड, डोंबिवली {पूर्व)
जिल्हा ठाणे – 421201.

2.“सार्थक” जनकपुरी हाउसिंग सोसायटी.
नौपाडा, महात्मा गांधी रोड,
ठाणे, 400605.

वेळ: सकाळी 10.00 वाजता.

शेजारी नकाशा दिलेला आहे, तसेच गुगल मॅप वर संजीवनी हॉस्पिटल शोधावे. म्हणजे आपल्याला अचूक पत्ता मिळेल.
विशेष सूचना:- करोनाच्या निमित्ताने जर कार्यक्रमास परवानगी नाकारली तर हाच आकार्य्क्रम त्याच वेळी ऑनलाइन करण्यात येईल. तरी आपण सर्वांनी झूम चालू करावे. आपण हा सोहळा आनंदाने साजरा करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. आणि तो होईल याची खात्री आहे.
आपली उपस्थिती हेच आम्हाला आशीर्वाद आहेत. तरी काही भेटवस्तू आणू नये हि विनंती.

Invitation Letter Format

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *