Home » Tips Information in Marathi » Pregnancy Tips in Marathi | How to Care in Pregnancy | Baby Care Tips

Pregnancy Tips in Marathi | How to Care in Pregnancy | Baby Care Tips

pregnancy tips in marathi language

Baby Care Tips in Marathi

 • मुलभूत काळजी
  जर तुम्ही गरोदर असाल, तुम्हाला कदाचित तुमची व बाळाची काळजी घेण्याबाबत काही मुलभूत गोष्टी माहित असतील. धुम्रपान करू नये. दारू पिऊ नये. संपूर्ण गरोदरपणात कॉफी कमी घ्यावी.
 • जीवनसत्व घेणे
  तुमच्या बाळाचे मज्जारज्जू, जे नंतर मेंदू आणि पाठीचा कणा बनतात, गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात विकसित होतात, म्हणून तुम्ही फॉलिक ऍसिड, कॅल्शियम आणि लोह सारखी आवश्यक सत्व अगदी सुरवातीपासून घेणे अतिशय गरजेचे आहे. प्रसूतीपूर्व जीवनसत्वे बऱ्याच औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही डॉक्टर कडूनही लिहून घेऊ शकता.
 • फॉलिक ऍसिड जास्त असणारे अन्न घ्या
  फॉलिक ऍसिड बाळाच्या मज्जारज्जूच्या विकाससाठी अतिशय गरजेचे असते. गरोदर स्त्रियांनी कडधान्ये, शतावरी, डाळ, गहू, संत्री आणि संत्र्याचा रस असे फॉलिक ऍसिड अधिक असणारे अन्न सुरवातीपासून घ्यावे.
 • व्यायाम
  गरोदर स्त्रियांनी सक्रीय राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम तुमचे वजन नियंत्रित करण्यात, अभिसरण वाढविण्यात, आनंदी ठेवण्यात आणि झोप चांगली येण्यात मदत करतो. ह्या सवयी तुमचे मुल जन्माला आल्यानंतर त्यांच्यासमोर चांगला आदर्श ठेवतात. योगा, पोहणे आणि चालणे गरोदर स्त्रियांसाठी चांगल्या हालचाली आहेत. पण कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आठवड्यातून जास्तीत जास्त दिवस ३० मिनिटे व्यायाम करण्याचे निश्चित करा.
 • स्वतःला शिक्षित करा.
  प्रसव क्लासेस लावणे किंवा गरोदरपणावरील पुस्तके वाचल्याने तुम्ही प्रसूती साठी तयार होण्यात मदत होते. तुम्हाला प्रसूतीची आणि शिशूची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती मिळते आणि तुम्ही तुमच्या शंका किंवा विशिष्ट प्रश्न डॉक्टरला विचारू शकता. तुमच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास जाणून घ्या. तुमच्या अगोदरच्या प्रसुतीमधील समस्यांबाबत किंवा कुटुंबातील जन्मदोष असलेल्या घटनांबाबत डॉक्टरशी चर्चा करा.
 • काही कामे करणे टाळा
  विषारी रसायनांशी संपर्क, जड वस्तू उचलणे किंवा जीवाणूंच्या संपर्कात येणे तुमच्या आणि तुमच्या बाळासाठी अपायकारक आहे. गरोदरपणात पुढील काही कामे करणे टाळा
  • अवजड समान उचलणे
  • उंच स्टूल किंवा शिडी चढणे
  • खूप वेळ, विशेषतः गरम चुल्ह्याजवळ उभे राहणे.
 • आरामदायक पादत्राणे निवडा
  तुमचे नैसर्गिक वाढत्या वजनामुळे तुमचा गुरुत्वाकर्षणाचा मध्य बदलतो, जो तुमच्या पायांवर अधिक ताण टाकतो. ज्यामुळे वेळ जाईल तशी वेदनादायक तळवे किंवा तळव्यांना सूज येते. ह्या समस्या टाळण्यासाठी, आरामदायी व चांगला आधार देणाऱ्या चपला वापरा. खूप गर्भवती स्त्रियांना असे आढळून आले आहे की प्रसूतीनंतरही त्यांना मोठ्या मापाच्या चपला लागतात.
 • सूर्यापासून संरक्षण
  गर्भवती झाल्यानंतर तुमची त्वचा सूर्यकिरणाबाबत जास्त संवेदनशील बनाते, म्हणून तुम्हाला सूर्यकिरणामुळे होणारा क्षोभ लवकर होऊ शकतो. तसेच त्वचा काळवंडणे, डागाळणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात. SPF३० किंवा त्याहून अधिक प्रमाणात असलेले सनस्क्रीन लावून आणि गॉगल घालूनच उन्हात जा.
 • स्त्रीरोगतज्ञाशी कधी बोलावे
  गर्भवती राहणे गोंधळात टाकणारे असू शकते, विशेषतः जर हे तुमचे पहिले गर्भारपण असेल तर. तुम्हाला कसे कळणार की कुठली वेदना सामान्य आहे कुठली नाही? आम्ही खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी बोलणे सुचवतो:
  • चक्कर किंवा भोवळ येणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • सतत मळमळ किंवा उलटी होणे
  • बाळाची हालचाल मंदावणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *