Skip to content
Home » Tips Information in Marathi » Make up Tips in Marathi, Beauty Tips for Face, Skin Information

Make up Tips in Marathi, Beauty Tips for Face, Skin Information

beauty parlour tips marathi

Make Up & Beauty Tips in Marathi Information

MakeUp for Face Information in Marathi 

  • आपल्याला जेव्हाही कधी खास समारंभाला जायचे असते तेव्हा मेकअप करणे आपल्यासाठी खूप गरजेचे असते. मेकअप हि एक अशी गोष्ट आहे, जी खराब चेहऱ्याला सुद्धा सुंदर आणि आकर्षित बनवू शकते. पण जर मेकअप योग्य रीतीने नाही केला गेला तर मेकअपच आपल्या चेहऱ्याला अधिक खराब पण बनवू शकतो. म्हणून मेकअप करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
  • मेकअप करण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या. जर तुमचा चेहरा साफ नसेल तर तुम्हाला मेकअपचा चांगला परिणाम मिळणार नाही. मेकअप करण्यापूर्वी तुमच्या त्वचेला मोइस्चराईज(आर्द्र) करा. तुमच्या ओठांना सुद्धा मोइस्चराईज(आर्द्र) करा जेणेकरून लिपस्टिक लावल्यानंतर ते खराब नाही दिसणार.
  • वेळेअभावी बरेचदा तुम्ही तुमच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊ नाही शकत. अशावेळी डोळ्याभोवती गडद वर्तुळे, डागाळलेली त्वचा अश्या समस्या निर्माण होणे साहजिकच आहे. ह्या समस्या तुम्ही तुमच्या त्वचेशी मिळत्या जुळत्या कन्सिलरच्या सहाय्याने लपवू शकता.
  • नाक बारीक दाखवण्यासाठी हायलाईटरला हाडाच्या लांबीपर्यंत लावा आणि एक छटा (शेड) गडद कन्सिलरने मिसळा. मुरुमं लपवण्यासाठी प्रभावित जागी तुमच्या त्वचेशी मिळणारा कन्सिलर लावा आणि व्यवस्थित एकजीव करा. कन्सिलर तुमच्या बोटांनी लावा. नंतर स्पंजने एकजीव करा. गरज वाटल्यास पुन्हा लावा. नंतर एक छटा गडद तरल फाउंडेशन चेहऱ्याला थपथपवत वरून खाली अशा दिशेने व्यवस्थितपणे एकजीव करा.
  • बेस तुमच्या त्वचेच्या रंगाशी अनुरूप असला पाहिजे. जर तुमची त्वचा गडद असेल तर तिला हलक्या रंगाच्या बेसने लपविण्याचा प्रयत्न करू नका. जर त्वचा निस्तेज असेल तर नैसर्गिक चमक असणारे फाउंडेशन निवडा. जर त्वचा पिवळट झाकवाली असेल तर हल्की नारिंगी छटा असणारे फाउंडेशन निवडा.
  • ब्लश कधीही खूप गहिरे आणि पसरवून लावू नये. जर तुमची त्वचा सावळी असेल तर तपकिरी किंवा बेज शेड चा वापर करा. गोऱ्या रंगासाठी गुलाबी किंवा नैसर्गिक रंगाचा वापर करा.
  • तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी मस्करा अवश्य वापरा. हे तुमच्या डोळ्यांना चमक आणि पापण्यांना वक्रदार बनवेल. प्राईमर नंतर नैसर्गिक मस्करा लावणे विसरू नका. जर तुम्हाला रात्री पार्टीला जायचे असेल तर डोळ्यांचा मेकअप जास्त करा.
  • मेकअप मध्ये फिनिशिंग सर्वात महत्वाचे असते. तुमचा मेकअप चांगल्या तऱ्हेने एकजीव झाला पाहिजे. म्हणून असा मेकअप करा की, तुमचा बेस, फाउंडेशन आणि कॉमपेक्ट पावडर चांगल्या तऱ्हेने एकजीव होईल. त्यानंतरच आयशेडो लावा. नंतर लाईनर आणि काजळचा वापर करा.
  • लिपस्टिक लावताना लक्षात ठेवा की, तुमच्या ओठांची रेखा हि नैसर्गिक रेखेच्यावरती नसावी. जर तुमचे ओठ बारीक असतील तर लीपग्लॉस लावा जेणेकरून तुमचे ओठ भरलेले दिसतील.
  • तुमच्या ओठांना आकर्षित बनवण्यासाठी हलक्या गुलाबी लिपस्टिकचा वापर करा. ऑफिसमध्ये नेहमी बेज किंवा गुलाबाच्या रंगाच्या आयशेडोचा वापर करणे उत्तम राहील.
  • मेकअप ब्रशला तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आणि हलक्या हातांनी वापरा. मेकअप करताना नेहमी लक्षात असू द्या की, तुम्हाला मेकअप ब्रश तुमच्या चेहऱ्यावर हळूहळू फिरवावे लागेल.
  • मेकअप करून झाल्यानंतर मेकअप ब्रशला चांगलं साफ करूनच मेकअपच्या डब्यामध्ये परत ठेवा. जर तुमच्या ब्रशमध्ये पहिलीच मेकअप पावडर असेल तर तुमचे मेकअप ब्रश खराब होऊ शकते.

Fast Marathi Beauty Tips : लवकर मेकअप करण्यासाठी काही टिप्स

  • सर्वप्रथम चेहऱ्याला कापसाच्या बोळ्यावर मॉईस्चराईजर घेऊन साफ करा.
  • आता चेहऱ्याला त्वचेच्या रंगाशी मिळतेजुळते फाउंडेशन लावा.
  • फाउंडेशननंतर चेहऱ्याला पावडर लावा.
  • गालांना उठाव देण्यासाठी ब्लशर नक्की लावा.
  • डोळ्यांना मोठे दिसण्यासाठी आणि उठाव देण्यासाठी लाईनर, मस्करा आणि काजळ लावा.
  • पापण्यांवर आयशेडो नक्की लावा.
  • ओठांना लीप लाईनर किंवा चमकदार दिसण्यासाठी लीप ग्लॉस वापरा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *