Home » Tips Information in Marathi » Dragon Fruit Information in Marathi | ड्रॅगन फ्रुट फायदे

Dragon Fruit Information in Marathi | ड्रॅगन फ्रुट फायदे

Dragon Fruit Info

Dragon Fruit Information in Marathi

Dragon Fruit / ड्रॅगन फ्रुट माहिती

पिताया किंवा ड्रॅगन फ्रुट – आपल्या अननसाचा मावस भाऊ!

 • ग्लोबल कनेक्शन आणि इंटरनेट मुळे जग अगदी हाकेच्या अंतरावर आले आणि येताना बरोबर खाद्य, परिधान आणि वर्तणुकीची संस्कृती घेऊन आले. ह्या आदान प्रदानात इकडची फळे, लोणची, पापड, मोदक तिकडे गेले आणि तिकडची फळे, पिझ्झा, बर्गर आणि सबवे सॅन्डविच इकडे आली.
 • नाविन्याची आवड आणि स्वास्थ्याबद्दल जागरुकता ह्यामुळे खाण्यामध्ये बदल घडले. ताटभर जेवण्यापेक्षा सॅलड, ज्यूस आणि किरकोळ जेवण असा आहार लोक करू लागले. लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आणि समृद्धी अंगाखांद्यावर वाढू लागली तशी तिकडचे रोग पण घेऊन आली आणि त्यावर नैसर्गिक उपचार सुरु झाले. ह्यामुळे बाकी काही नसले तरी फळांचे मार्केट वाढले. वेगवेगळ्या देशातील फळे डायनिंग टेबलाची शोभा वाढवू लागले.
 • परवाच फळवाल्याकडे फळे घेत असताना किवी शेजारी प्लास्टिकच्या चौकोनी बॉक्समध्ये ही फळे बघितली. फळवाल्याला विचारले तर तो म्हणाला “हे ड्रॅगन फ्रुट. डायबिटीस वर औषध आहे. घेऊन जा” भाव पाहिला आणि चक्कर आली. तरी बरं मला डायबिटीस नाही ते. म्हटलं बघू तरी कसे आहे ते. तर आपल्या अननसाची लहान कॉपी पण कमी काटेरी आणि सुंदर रंगाची. घ्यावीशी वाटली पण केव्हा आली असतील आणि किती जुनी झाली असतील. आपल्याला मोसमी ताजी फळे खायची सवय. गेला उडत तो डायबिटीस. मी मस्तपैकी आंबे घेतले आणि निघाले. पण कुतुहल थांबेना.

तर काय आहे हे पिताया / ड्रॅगन फ्रुट :

 • हे ‘कॅक्टस’च्या जातीतील झाडांना येणारे बारमाही फळ आहे. हे ट्रॉपिकल फळ असून उन्हाळ्यात आणि पावसाच्या सुरुवातीला ते जास्त येते. मूळचे मेक्सिकोचे असलेले फळ हे मध्य अमेरिका आणी तैवान आणि चीन येथेही पिकू लागले.
 • ह्या फळाची जात “हायालोसिरास” असून ते “कॅक्ट्सी” संवर्गातील एक प्रकारचे निवडुंग आहे. ह्या झाडाची फुले रात्री फुलतात वटवाघूळ आणि मॉथ कडून परागीभवन होते. ही झाडे आपल्या अननसासारखीच असतात. पण फुले मात्र ब्रह्मकमळासारखी असतात.
 • ड्रॅगन फळाची साल जाड असते आणि त्यावर काटे असतात. त्यावरून त्याला “ड्रॅगनफ्रुट” असे नाव पडले.

Fayde / Uses of DragonFruit in Marathi / ड्रॅगनफ्रुटचे उपयोग :

 • ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि विटामीन बी तसेच ९०% पाणी असते. बाहेरून जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात.त्या खाल्यातरी चालतात.
 • हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे विटामीन सी चे भरपूर कोठार. एक गोरी हजार रूप चोरी म्हणतात तशातला प्रकार! विटामीन सी असले की रोग प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.
 • ड्रॅगॉनफ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहर्‍यावरचे फोड, अक्ने, रूक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहर्‍यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाल्ल्याने तुम्ही तरुण रसरसलेले दिसता.
 • ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहजिकच एकदा पोट साफ असले की ९०% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर नियंत्रित राहते. म्हणजे डायबिटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदय विकार सर्वांवर मात करता येते.
 • ह्या फळांमधील अँटी टॉक्सिडन्ट आणि एन्झाईम केसांचे सौंदर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, “ओमेगा-३” आणि “ओमेगा -६” वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील आयर्न रक्ताचे हिमोग्लोबिन वाढवते आणि अॅनिमीया होऊ देत नाही. ह्या फळात अत्यंत कमी कॅलरी असल्याने वजन वाढत नाही.
 • खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. डेंग्यू मध्ये हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पाहता पाहता माणूस मरतो. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेंव्हा डेंगूची भीती हि कमी होईल.
 • अजून अतिशय महत्वाचे म्हणजे हे फळ कॅन्सरला अटकाव करते. कारण ह्या फळामध्ये “लायकोपेन” नावाचे एन्झाईम असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फळाच्या सालीत पण पोलीफेनोल आणि रसायने असतात जे कांही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.
 • रक्ताल्पता असलेल्या ऍनिमिक गर्भवतीना रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला पण कमी हिमोग्लोबिनची व्याधी जडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवतीचे हिमोग्लोबिन वाढते.
 • माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत हि शक्ती माणसाला निरोगी बनवते. हे फळ त्यामुळे अमृत फळच म्हणावयास हवे.

अर्थात जास्त खाल्ले तर कुठलेही फळ वाईटच असते. ह्या फळात फ्रुक्टोज असल्याने जास्त खाल्ले तर वजन कमी होण्या ऐवजी वाढते आणि रक्तात साखरेचे प्रमाण पण वाढू शकते. तेंव्हा जपून खावे. अर्थात त्याची किमत पण आपल्याला तसे करू देणार नाही.

Dragon Fruit Benefits in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *