Home » Tips Information in Marathi » Grapes Information in Marathi | द्राक्ष माहिती

Grapes Information in Marathi | द्राक्ष माहिती

Grapes Marathi Mahiti

Grapes Information in Marathi

Grapes / द्राक्ष माहिती

द्राक्ष – एक बहूउपयोगी फळ

 • द्राक्ष हे बलवर्धक आणि सौंदर्यवर्धक फळ आहे. द्राक्षात अनेक पोषकतत्वे असल्याने हे सर्वात उत्तम फळ आहे असे समजले जाते. द्राक्षाच्या वेलीवर ही फळे गुच्छ्याने लागतात.
 • द्राक्षाची वेल १५ मीटर पर्यंत लांब पसरू शकते. एका वेलीला सुमारे ४० घड लागतात. द्राक्षाच्या पानांच्या कडा कातरल्याप्रमाणे असतात.

History / द्राक्षाचा इतिहास :

 • द्राक्षे ही मुळची रशियामधील आहेत. तेथून ह्यांचा इराण, अफगाणिस्तान मध्ये प्रवेश झाला व त्यानंतर भारतात प्रवेश झाला. द्राक्षाची लागवड युरोप, अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात केली जाते.
 • भारतात पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यात द्राक्षाचे पीक घेतले जाते. पण भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्षाचे पीक सर्वात जास्त घेतले जाते.
 • महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापूर व उस्मानाबाद ह्या जिल्ह्यात द्राक्षाची सर्वात जास्त लागवड घेतली जाते. नाशिक जिल्हा द्राक्षाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.

Types of grapes / द्राक्षाचे प्रकार :

 • सुरवातीच्या काळात द्राक्ष्यामध्ये मोठ्या बिया असायच्या परंतु द्राक्ष्यांच्या प्रजातीवर विविध प्रयोग करून संकरित द्राक्षे निर्माण केली गेली ज्यामध्ये अगदी बारीक बिया असतात किंवा बियाच नसतात. ही द्राक्षे खाण्यासाठी वापरतात व त्यांना ‘टेबल ग्रेप्स’ म्हणतात.
 • ज्या द्राक्षांपासून वाईन बनवली जाते ती द्राक्षे थोडी वेगळी असतात. वाईन बनवण्यासाठी वापरण्यात येणारी द्राक्षे थोडी छोटी असतात, त्यांची साल जाड असते व त्यामध्ये जास्त बिया असतात.
 • द्राक्षे ही बेरीच्या वर्गातील फळे आहेत.
 • जगभरात द्राक्ष्याच्या ६० जाती आणि ८००० हून अधिक प्रजाती आहेत. द्राक्षे पिवळ्या किंवा काळ्या रंगाची असतात.
 • तसेच काही द्राक्षे लाल, निळ्या व जांभळ्या रंगाची देखील असतात.

Uses and Benefits / उपयोग व फायदे :

 • काळ्या रंगाची द्राक्षे अधिक उत्तम समजली जातात कारण या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. पिकलेली द्राक्षे थोडीशी आंबट गोड असतात. द्राक्षे वाळवून त्यांच्या मनुका तयार केल्या जातात.
 • तसेच द्राक्षांपासून मद्य देखील तयार केले जाते. संपूर्ण जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८० % द्राक्षे मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी वापरली जातात तर केवळ १०% द्राक्षेच खाण्यासाठी व १०% द्राक्षे मनुका तयार करण्यासाठी वापरतात.
 • द्राक्षांमध्ये ८०% पाणी असते म्हणून ह्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.
 • द्राक्षे सोडियम, पोटॅशियम, सायट्रिक अॅसिड, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व यांचा उत्तम स्त्रोत आहेत.
 • तसेच द्राक्षांमध्ये फलशर्करा (fructose) जास्त असते व ही शर्करा नैसर्गिक असल्यामुळे रक्तात लगेच शोषली जाते. म्हणून आजारी किंवा अशक्त माणसांना द्राक्षे खायला देणे चांगले असते. यामुळे त्यांचा थकवा निघून जातो व त्यांना उत्साह वाटू लागतो.
 • द्राक्षे ताप, क्षय, अशक्तपणा, पचनशक्ती मंदावणे यावर उत्तम उपाय आहे. त्याचप्रमाणे काळ्या मनुका शरीरातील रक्त वाढवण्यासाठी चांगला पर्याय आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील द्राक्षे उपयुक्त आहेत. दमा, अपचन, माइग्रेन, किडनी रोग यासाठी देखील द्राक्षे उपयोगी ठरतात.

Take care / काळजी जरूर घ्या! :

 • परंतु द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारली जातात त्यामुळे ही खाताना थोडी सावधानी घेणे आवश्यक आहे.
 • द्राक्षे सर्वात प्रथम थोड्याश्या कोमट पाण्यात किंवा वाहत्या पाण्यात चांगली धुवून घ्यावी व मगच खावीत.
 • आंबट व कच्ची द्राक्षे खाऊ नयेत. त्याने पोट खराब होण्याची शक्यता असते.
 • द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्याने जुलाब व जास्त लघवी होऊ शकते. तसेच झोपही जास्त येते. म्हणून कितीही आवडली तरी द्राक्षे खाण्याच्या बाबतीत अतिरेक करू नये.

Grapes Benefits in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *