Home » Tips Information in Marathi » Strawberry Information in Marathi | Benefits & Fayde Mahiti स्ट्रॉबेरी

Strawberry Information in Marathi | Benefits & Fayde Mahiti स्ट्रॉबेरी

Strawberry Marathi Mahiti

Strawberry Information in Marathi

Strawberry / स्ट्रॉबेरी माहिती

स्ट्रॉबेरी – एक मनमोहक फळ

 • लाल रंगाच्या स्ट्रॉबेरी बघितल्या की कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटत? ही रसाळ, मधुर फळे लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडतात.
 • विशिष्ट सुगंध, चमकदार लाल रंग, सुंदर पोत आणि गोडवा यामुळे हे फळ दिसायला तर आकर्षक आहेच पण खायला देखील रुचकर आहे.

Strawberry history / स्ट्रॉबेरीचा इतिहास :

 • स्ट्रॉबेरी हे मूळचे उत्तर अमेरिकेमधील फळ आहे. अमेरिकेतील जवळपास सर्व राज्यात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते.
 • अमेरिकेथून ह्या फळाचा प्रसार युरोप मध्ये झाला. फ्रान्सच्या ब्रिटनी येथे सर्वात पहिले स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली होती.
 • भारतात अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते. महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी मध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
 • हे फळ उच्चभ्रू लोकांच्या खास आवडीचे आहे. असे समजले जाते की फ्रान्सची राणी मॅडम टॅलियन त्वचेची काळजी घेण्यासाठी स्ट्रॉबेरीने अंघोळ करत असे.
 • काही लोकांचे मत होते की स्ट्रॉबेरीने दिर्घायुष्य लाभते तर अर्जेंटिनामध्ये मात्र स्ट्रॉबेरीला विषारी फळ समजले जात असे. अमेरिकेत तर स्ट्रॉबेरी उत्सव देखील साजरा केला जातो.

Shape and tupes of Strawberry / रंग रूप व विविध प्रकार :

 • स्ट्रॉबेरीला बेरी समजले जात असले तरीही हे फळ प्रत्यक्ष बेरी वर्गातील नाही!
 • स्ट्रॉबेरीच्या फळाच्या बाहेरच्या बाजूला असतात व एका स्ट्रॉबेरीच्या फळावर सुमारे २०० बिया असतात.
 • स्ट्रॉबेरीच्या झाडांचे आयुष्य फार नसते. फळे लागण्यास सुरवात झाल्यांनतर सुमारे ५ वर्षे ही झाडे जगतात. प्राचीन रोम मध्ये स्ट्रॉबेरीचा उपयोग ताप, घसा बसणे आणि नैराश्या यावर उपाय म्हणून केला जात असे.
 • स्ट्रॉबेरीच्या विविध प्रजाती आहेत व यातील काही प्रजातीची फळे पिवळी, निळी, पांढरी, काळी व जांभळी देखील आहेत. काही प्रजातींच्या स्ट्रॉबेरी सफरचंदा एवढ्या मोठ्या होऊ शकतात.
 • स्ट्रॉबेरीमध्ये ९१% पाणी, ७% कर्बोदके आणि केवळ ०.३% मेद असते म्हणून हे फळ वजन कमी करण्यास लाभदायक ठरते.

Uses and Benefits / उपयोग व फायदे :

 • स्ट्रॉबेरी मध्ये संत्र्यापेक्षा जास्त ‘क’ जीवनसत्व (Vitamin K) असते.
 • तसेच ही फळे आपल्या स्नायू, मेंदू आणि हृदयासाठी देखील उपयुक्त आहेत.
 • स्ट्रॉबेरी शरीरातील मेद कमी करण्यात देखील मदत करते, विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यास स्ट्रॉबेरीची मदत होते.
 • स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल सारखे घटक कॅन्सरला कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करण्यात मदत करतात.
 • स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असल्याने हृद्यविकारांमध्ये ही फळे उपयोगी आहेत. तसेच उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास देखील फायदेशीर ठरते.
 • ह्या फळामधील मँगेनिज हे खनिज हाडांचा ठिसूळपणा कमी करते आणि हाडेदुखीपासून आराम मिळण्यास फायदा होतो.
 • स्ट्रॉबेरी हे फळ नुसतेच खाता येते पण इतरही अनेक प्रकारे त्याचा आस्वाद घेता येतो. आईस्क्रीम, जॅम व मिल्कशेकची लज्जत वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर केला जातो. तसेच केक व वेगवेगळ्या मिठाया बनवण्यासाठी देखील स्ट्रॉबेरीचा वापर केला जातो.

Take care / काळजी नक्की घ्या!

 • स्ट्रॉबेरीचा देठ काढून त्यांना धुवून ठेवले जाते, पण जर तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्रीजमध्ये जास्त काळासाठी ठेवायच्या असतील त्यांना न धुता ठेवले पाहिजे. कारण धुतल्यानंतर स्ट्रॉबेरीज लगेच खाल्ल्या नाहीत तर त्या वेगाने खराब होऊ लागतात.
 • हे फळआपल्यासाठी नक्कीच चांगले आहे, पण जास्त प्रमाणात खाणे आपल्याला आजारी पाडू शकते. उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ए असल्याने अपचन आणि सुस्तपणासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

Strawberry Benefits in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *