Chafa Flower Information in Marathi

Chapha Flower – चाफा माहिती

 • सुगंधी फुले देणारा, सुंदर झुपकेदार फुलांनी बहरलेला चाफा सर्वांनाच माहित आहे. चाफ्याच्या अनेक जाती आहेत. प्रत्येक फुल वेगवेगळे तर दिसतेच पण त्यांचा सुगंधही इतरांपेक्षा भिन्न असतो.
 • देवचाफा – देवचाफ्याची फुले पांढरी असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी रंगाचे असते व खोडाला पारंब्या असतात. ही फुले किंवा या फुलांचा हार देवाला वाहतात, म्हणून सहसा हे झाड देवळाबाहेर लावलेले दिसते.
 • पांढरा चाफा – हि फुले पांढरीशुभ्र असून मध्यभागी पिवळा रंग नसतो.
 • सोनचाफा – भारतात सोनचाफा हा प्रकार इतर चाफ्यापेक्षा जास्त प्रमाणात व जवळपास सर्व राज्यात आढळतो. याची फुले पिवळ्या रंगाची असतात व याचे दुसरे नाव सुवर्णचंपक असे आहे. हि फुले दाटीने येतात आणि पानांमध्ये लपलेली असतात.
 • कवठी चाफा – कवठाच्या फळाप्रमाणे गोड वास असल्यामुळे या चाफ्याला कवठी चाफा म्हणतात. हे झाड छोटे असते व फुल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुले संध्याकाळी उमलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. य फुलांपासून मॅग्निलिया  नावाचे सुवासिक तेल मिळते. कवठी चाफ्याची फुले इतर चाफ्यांपेक्षा लहान असली तरी एक प्रजाती अशी आहे की त्याला मोठमोठी फुले येतात ज्यामुळे दुरून झाडावर बगळे बसले असल्याचा भास होतो.
 • पिवळा चाफा – पिवळा चाफ्याची फुले सोनचाफ्यापेक्षा लहान व पिवळसर पांढरी असतात. याला लाल रंगाची फळे येतात.
 • नागचाफा – हा मुळचा श्रीलंकेचा आहे. य फुलांचा केसर मसाल्याच्या पदार्थांमध्ये नागकेसर म्हणून प्रसिद्ध आहे. मिझोरम राज्याचा हा राज्यवृक्ष आहे.
 • हिरवा चाफा – हिरव्या चाफ्याची वेल असते. फुले हिरव्या रंगाची असतात व पानांना लागून येतात त्यामुळे सहज नजरेस पडत नाहीत. फुले छोटी असतात व साधारणपणे पावसाळ्यात येतात. फुले लहान असेपर्यंत त्यांना वास येत नाही परंतु पूर्ण उमलून पिवळी झाली की त्यांचा वास दरवळायला लागतो. असे म्हणतात की वास सापांना आकर्षित करतो. या चाफ्याला हिरवीगार फळे लागतात.
 • तांबडा चाफा – हे झाड सात ते आठ मीटरपर्यंत उंच वाढू शकते. उन्हाळ्या किंवा हिवाळ्याच्या आरंभी या झाडाला गुलाबी, पांढरी, पिवळी अशा छटा असलेली फुले येतात.
 • भुईचाफा – चाफ्याचा हा प्रकार फार दुर्मिळ असतो. हा थेट जमिनीतून उगवतो व याला जांभळ्या आणि निळ्या रगांची फुले येतात. हि झाडे हिवाळ्यात पूर्ण वाळून जातात व उन्हाळ्यात पुन्हा उगवतात.
 • भारतात चाफ्याची झाडे देवळाबाहेर लावतात परंतु फिलिपाईन्स आणि इंडोनेशियात हि झाडे स्मशानभूमीबाहेर लावतात.
 • चाफा भारतात मोठ्या प्रमाणावर आढळत असला तरी चीनमध्ये मात्र हे फुल अत्यंत दुर्मिळ आहे.

Chafa Flowers Wikipedia Language