Skip to content

Jasmine Flower Information in Marathi l जाई फुलाची माहिती

jasmine flower information marathi

Jasmine Flower Information in Marathi

जाई माहिती

 • जाई हे पांढरेशुभ्र सुगंधी वासाचे नाजूक दिसणारे फुल आहे जे मुख्यतः देवपूजेत वापरले जाते.
 • जाईच्या पाकळ्या खालच्या बाजूने हलक्या गुलाबी किंवा जांभळ्या रंगाच्या असतात. जाईची फुले बहुधा झुपक्याने येतात. काही प्रकारांमध्ये जाईची फुले पिवळीदेखील असतात. जाईची फुले सुमारे एक इंचाची असतात.
 • जाईची लागवड उष्ण किंवा समशीतोष्ण कटीबंधात होते. जाईच्या सुमारे २०० जाती जगभरात अस्तित्वात आहेत. जाई सारखीच दिसणारी काही फुले आहेत ज्यांना फॉल्स जास्मिन म्हणतात व हि फुले खूप विषारी असतात.
 • जाई खरंतर वेलवर्गात मोडते परंतु तिचे खोड मनगटाएवढे जाडदेखील होऊ शकते. जाईचे झाड ओलिव्ह कुळात येते.
 • जाईच्या काही जाती मध्ये वर्षभर हिरवीगार पाने असतात तर काही पानगळीची असतात. जाईला वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात फुले येतात.
 • जाईची फुले शक्यतो संध्याकाळच्या वेळेस उमलतात व लवकर कोमजतात. फुलांपेक्षा कळ्याच जास्त सुगंधी असतात. फुलांचा सुगंधही रात्रीच्या वेळी जास्त असतो.
 • जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. जाईचे तेल आल्हाददायक आणि थंडावा देणारे असते.
 • तसेच जाईच्या फुलांपासून मिळणाराऱ्या अर्काला अत्तर बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये खूप मागणी आहे. अत्तर बनविण्यासाठी गुलाब खालोखाल जाईचा उपयोग केला जातो.
 • फिलिपिन्स मध्ये देवतांना जाईच्या फुलांचे हार घालण्याची प्रथा आहे. थाईलंडमध्ये तर जाईला आईचे प्रतिक मानतात.
 • जाईचे झाड १० ते १५ फुटापर्यंत वाढते. वर्षाला सुमारे एक ते दीड फुट वाढते. जाईच्या काही प्रकारांमध्ये वेल आधाराच्या सहाय्याने २५ फुटापर्यंत सुद्धा वाढू शकते.
 • जाई मूळची चीनच्या हिमालयातील भागातील आहे. आता भारतातील सर्व भागात आढळते. जाईचे फुल चीनमध्ये आनंद, ममता आणि लावण्य यांचे प्रतीक आहे. तसेच नाजूकता आणि सौंदर्याचे प्रतीकही आहे म्हणूनच चीनमध्ये लग्न समारंभात जाईचा वापर जास्त प्रमाणात होतो.
 • जाईचे पान सुद्धा खूप औषधी असते. तोंड आल्यावर जाईची पाने चघळतात, भोवरीवर सुद्धा जाईच्या पानांचा रस लावला जातो. जाईचे मूळ उगाळून त्याचा लेप नायट्यावर लावल्यास लवकर आराम मिळतो.
 • जाईच्या फुलांना दोन्ही प्रकारचे पुनरुत्पादन अवयव असले तरी पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकाच वेळी विकसित होत नसल्यामुळे परागीभवनासाठी इतर फुलांवर अवलंबून असतात. मधमाशा आणि फुलपाखरे हि जाईच्या फुलांचे मुख्य परागवाहक आहेत.
 • जाईची फुले झडल्यावर काळ्या रंगाची बेरीसारखी फळे येतात.
 • जाईची सुकलेली फुले जास्मिन टी बनविण्यासाठी उपयोगी येतात. जास्मिन आणि हर्बल टीचे मिश्रण आशियात खूप प्रसिद्ध आहे.
 • जाईचे झाड सुमारे १५ ते २० वर्ष जगते.

Jai Information in Marathi / Jasmine Flowers Wikipedia Language

1 thought on “Jasmine Flower Information in Marathi l जाई फुलाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *