Home » Tips Information in Marathi » Marigold Flower Information in Marathi, Zendu Essay

Marigold Flower Information in Marathi, Zendu Essay

zendu flowers essay nibandh

Marigold Flower Information in Marathi

(Jhendu) Zendu Flower – झेंडू माहिती

 • जास्वंदीच्या फुलांप्रमाणेच झेंडूची फुलेसुद्धा बहु उपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते.
 • झेंडूची लागवड तिन्ही ऋतूत करता येते परंतु हिवाळ्यात आणि थंड हवामानाच्या ठिकाणी झेंडूचे उत्तम दर्जाचे पीक येते.
 • झेंडूच्या झाडांसाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे, सावलीत झाड चांगले झाले तरी त्याला फुले येत नाहीत.
 • झेंडूच्या दोन मुख्य जाती आहेत, आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू.
 • आफ्रिकन झेंडूची झाडे १०० ते १५० सेमीपर्यत उंच असतात व फुले पिवळी किंवा नारिंगी असतात. जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, गियाना गोल्ड, क्रॅकर जॅक, ऑरेंज ट्रेझंट, बंगलोर लोकल, देशी सनशाइन, हवाई, स्पेन गोल्ड या काही आफ्रिकन झेंडूच्या प्रजाती आहेत.
 • फ्रेंच झेंडूची झाडे ३० ते ४० सेमीपर्यंत उंच असतात व फुले मध्यम आकाराची आणि अनेक रंगाची असतात. यलो बॉय, हार्मोनी बॉय, बटर स्कॉच, लिटल डेव्हिल, हार्मोनी, रॉयल बेंगाल, बायकलर, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, क्विन, सोफिया या काही आफ्रिकन झेंडूच्या प्रजाती आहेत.
 • या खेरीज पुसा नारिंगी, पुसा बसंती आणि एम. डी. यु. १ या काही सुधारित जाती सुद्धा आहेत.
 • देवपूजेत झेंडूच्या फुलांचा खासकरून उपयोग केला जातो. तसेच दसरा, गुडीपाडवा, दिवाळी या संणामध्ये किंवा काही खास समारंभासाठी झेंडूच्या फुलांचे तोरण घर सुशोभित करण्यासाठी वापरतात. नवरात्रीमध्ये देखील देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करतात.
 • झेंडूची फुले चवीला कडवट, तुरट आणि तिखट असतात ज्यांचा उपयोग अपस्मार किंवा आकडी या रोगांच्या निवारणासाठी होतो.
 • झेंडूची पानेसुद्धा मूळव्याध, मूत्रपिंडाचे रोग आणि स्नायूंच्या दुखण्यावर आरामदायक आहेत.
 • झेंडूच्या पानापासून एक प्रकारचे तेल मिळते ज्याचा अत्तरासाठी बेस म्हणून वापर होतो. याचा वापर सुगंधासाठी नाही तर जंतुनाशक म्हणून होतो.
 • झेंडूच्या बिया अगदी सहज रुजतात व त्यासाठी काही खास मेहनत करावी लागत नाही.
 • युरोपमध्ये कोंबड्यांना झेंडूच्या पाकळ्या खायला घालतात ज्यामुळे कोंबडीच्या मांसाला तसेच अंड्याच्या बलकाला केशरी रंग येतो.
 • झेंडूला इंग्लिशमध्ये मारीगोल्ड म्हणतात तसेच वर्जिन मेरी असेही संबोधले जाते.
 • पॉट मारीगोल्ड या झेंडूला गरिबांचे केशर समजले जाते कारण त्याचा उपयोग केसरसारखा होतो आणि ते तुलनेत स्वस्त असते. याचा उपयोग जर्मन पदार्थांमध्ये तसेच चीज, पास्ता, मेयोनीज इत्यादी पदार्थांमध्ये नैसर्गिक फूड कलर म्हणून होतो.
 • झेंडूच्या फुलांच्या वास डासांना पळवून लावतो म्हणून दरवाजाच्या व खिडकीच्या जवळ झेंडूची झाडे लावणे उत्तम आहे.

Zendu Flower Information in Marathi / Marigold Flowers Wikipedia Language

2 thoughts on “Marigold Flower Information in Marathi, Zendu Essay”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *