Home » Tips Information in Marathi » Eagle Information in Marathi : Bird Garud Essay Nibandh गरुड माहिती

Eagle Information in Marathi : Bird Garud Essay Nibandh गरुड माहिती

eagle bird marathi information

Eagle Information in Marathi

Garud गरुड माहिती

 • गरुड हा अत्यंत चलाख, शक्तिशाली शिकारी पक्षी आहे आणि त्याला पक्ष्यांचा राजा हा मान प्राप्त झालेला आहे.
 • गरुड साप, छोटे पक्षी, छोटे प्राणी, मासे यांची शिकार करतात. गरुड अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहेत.
 • गरुड बऱ्याच पक्षांपेक्षा मोठे असतात आणि फक्त गिधाड हे पक्षी त्यांच्या पेक्षा मोठे असू शकतात.
 • जगभरात गरुडांच्या ६० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्पगरुड आकाराने लहान असतात आणि हार्पी गरुड सर्वात मोठे असतात. त्यांचा लांबी सुमारे १०० सेमी असते आणि वजन ९ किलोपेक्षा जास्त असू शकते. बाल्ड ईगल नावाच्या गरुडाच्या पंखाचा फैलाव सुमारे सहा फुट असतो.
 • जंगलात राहणाऱ्या गरुडांचे पंख छोटे आणि शेपूट लांब असते ज्यामुळे जंगलातील झाडांमधून सावजाची शिकार करणे सोपे जाते.
 • आकाशात उंच उडणाऱ्या गरुडांचे पंख मात्र भरारी घेण्यासाठी लांब असतात आणि शेपूट तोकडी असते. त्यामुळे हवेत तरंगणे त्यांना सोपे जाते परंतु झेप घेणे मात्र तुलनेत थोडे कठीण जाते.
 • त्यांची चोच बाकदार आणि बळकट असते जी मांस फाडण्याच्या कमी येते. तसेच गरुडाचे पंजे आणि नख्या सुद्धा बळकट असतात ज्यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि जखडून ठेवण्यासाठी होतो.
 • गोल्ड ईगल नावाचे गरुड कासव खातात. ते कासवांना उंचीवरून दगडावर फेकतात ज्यामुळे कवच फुटते आणि गरुड कासव खाऊ शकतो.
 • गरुडाच्या डोक्याच्या मानाने डोळे खूप मोठे असतात आणि त्यांची नजर खूप तीक्ष्ण असते. ते माणसाच्या चौपट चांगले पाहू शकतात आणि डोळ्याच्या रचनेमुळे एकाच वेळी समोरचे तसेच बाजूचे पाहू शकतात. ते माणसांपेक्षा अधिक रंग पाहू शकतात.
 • गरुड पक्षी सहसा उंच कड्यावर किंवा उंच झाडावर घरटे बांधतो. बरचसे गरुड एकच घर बांधून रहातात आणि त्यात वेळोवेळी काट्या – कुटक्यांचा भर घालत रहातात.
 • मादा एका वेळीस एक किंवा दोनच अंडी देते. बऱ्याचदा मोठे पिल्लू छोट्या पिल्लाला मारून टाकते. मादी पिल्लू नर पिल्ला पेक्षा मोठे असते त्यामुळे बऱ्याचदा वरचढ ठरते. मोठे झाल्यावरही मादी नरापेक्षा थोडी मोठी असते.
 • गरुड स्वतःच्या क्षेत्राबाबत आक्रमक असतात आणि दुसऱ्या गरुडाचे अस्तित्व सहन करून घेत नाहीत. आपल्या जागेसाठी ते खूप क्रूरपणे लढतात.
 • बाल्ड ईगल हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. १० जानेवारी हा जागतिक गरुड बचाव दिवस म्हणून पाळला जातो.

Information of Eagle in Marathi

3 thoughts on “Eagle Information in Marathi : Bird Garud Essay Nibandh गरुड माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *