Skip to content

Kite Bird Information in Marathi, घार पक्षाची माहिती

kite bird information in marathi

Kite Information in Marathi

घार पक्षाची माहिती

  • घार हा शिकारी पक्षी आहे. जगभरात घारीच्या सुमारे २२ जाती आहेत. भारतात ब्राम्हणी घार आणि परैया घार या दोन प्रकारच्या घारी आढळतात.
  • घारीचा रंग तपकिरी असतो. तिची नजर अतिशय तीक्ष्ण असते आणि आकाशातून जमिनीवरील सावज सहज हेरु शकते.
  • बेडूक, मासे, सरडे किंवा छोटी पिल्ले हे घारीचे खाद्य आहे. घार बराच काळ आकाशातून घिरट्या घालण्यात व्यतीत करते. घारीच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे उडत असलेल्या घारीला सहज ओळखता येते.
  • बऱ्याच घारी एकाच जागी वास्तव्य करतात परंतु काही घारी स्थलांतर सुद्धा करतात. घारी अंटार्क्टिका वगळता इतर सर्व प्रदेशात आढळतात.
  • घारींचे पंख लांब आणि मजबूत असतात पण पाय मात्र कमजोर असतात.
  • लाल घार सुमारे २४ ते २८ इंच लांब असते आणि तिच्या पंखांचा विस्तार ७० ते ८९ इंच इतका असतो.
  • घारी मोठ्या असल्या तरी आकाराच्या मानाने फार शक्तिशाली नसतात.
  • घारी वजनाला हलक्या असतात. वयस्क घारीचे वजन सुमारे ९०० ग्राम असते.
  • त्यांचे डोके शरीराच्या मानाने छोटे असते आणि चोच छोटी पण मजबूत असते.
  • घारी गवताळ प्रदेशाच्या आजूबाजूला रहातात. त्यांना सपाट जमिनीवरून सावज हेरणे आणि शिकार करणे सोपे जाते.
  • घारी उंच झाडावर जमिनीपासून १२ ते २० मीटर उंचीवर, काट्या – कुटक्यांच्या, गवताच्या सह्हायाने घरटे बनवितात आणि अंडी देण्यापूर्वी दोन तीन दिवस आधी लोकरीचा थर लावतात.
  • घार मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान एक ते चार अंडी देते. प्रत्येक अंड तीन दिवसांच्या अंतरावर दिले जाते. अंडी पांढरी असून त्यावर लाल तपकिरी ठिपके असतात.
  • मादा वर्षातून एकदाच अंडी देते. परंतु काही कारणास्तव अंडी फुटल्यास पुन्हा देते.
  • अंडे उबविण्याच्या काळात मादा सहसा घरटे सोडत नाही आणि नर तिला खाद्य पुरवितो.
  • सुमारे एक महिन्यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले कमजोर असतात आणि मादा त्यांचे रक्षण करते. नरच मादा आणि पिल्ले, सर्वांसाठी खाद्य पुरवितो.
  • घारीची पिल्ले आठवड्यातच भावंडासोबत भांडू लागतात. पिल्ले ५० ते ७० दिवसातच उडण्यायोग्य बनतात.
  • घारी सात आठ दिवस अन्नावाचून जगू शकतात आणि त्यांचे आयुष्यमान सुमारे १५ ते २० वर्षे आहे.

Information of Kite in Marathi / Ghar Bird Mahiti Wikipedia

1 thought on “Kite Bird Information in Marathi, घार पक्षाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *