Parrot Information in Marathi

Popat पोपट माहिती

  • पोपट हा एक रंगबिरंगी आणि सुंदर पक्षी आहे. त्याला लाल वक्र चोच आणि चार नख्या असणारे मजबूत पाय व सोबतच आणि हिरवी पिसे असतात. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वलय असते.
  • मोर जवळपास सर्वच उष्ण देशांमध्ये आढळतो कारण थंड हवामान त्याला मानवत नाही. तो झाडाच्या पोकळीत राहतो. तो तिथे स्वतःचे घरटे बांधतो आणि मादी तिथे अंडी देतो.
  • तो दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो. त्याला आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे आवडतात.
  • पोपट खूप हुशार पक्षी आहे. तो माणसांच्या आवाजाची नक्कल करू शकतो. बरेच लोक पोपटाला कसरती करण्यास शिकवतात. भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी आणि सर्कस मध्ये काम करण्यासाठी पोपट उपयोगी ठरतात.
  • संपूर्ण जगात ह्या सुंदर आणि चमकदार पिसे असणाऱ्या पक्षाच्या ३५० हून अधिक प्रजाती आहेत. पोपटाच्या बऱ्याच प्रजाती मध्ये नर आणि मादा सारखेच दिसतात, त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी रक्ताची चाचणी करावी लागते.

Wikipedia Information of Parrot / Popat Mahiti Marathi