Skip to content

Ganesh Chaturthi Information in Marathi, गणेशोत्सव माहिती

Ganesh Chaturthi Essay in Marathi

Ganesh Chaturthi Information in Marathi

तिथी

गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थी.

माहिती

गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी गणेश मूर्तीची पूजा आणि आरती केली जाते व गणपतीला नैवैद्य दाखवून प्रसादाचे वाटप करण्यात येते.काही ठिकाणी आरतीच्या नंतर भजने गायली जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या किंवा समुद्रात विसर्जन केले जाते.

गणेश महोत्सव हा सण दहा दिवस साजरा केला जातो.या दहा दिवसात सार्वजनिक गणेश मंडळे विविध स्पर्धा देखावे सादर करतात व बक्षिसे वितरण केले जाते जेणेकरून समाजामध्ये एकत्र सण साजरा करण्याची प्रथा निर्माण व्हावी आणि सर्व समाज एकत्र यावा.हा उत्सव भारत देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच विदेशात सुद्धा मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो.हिंदू मान्यतेनुसार हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणूस साजरा केला जातो.

कथा

गणेश चतुर्थीची कथा अशी आहे कि एके दिवशी भगवान गणेश आपले आवडते मोदक खाऊन मूषकराजाच्या पाठीवर बसून जात होते.तेंव्हा त्यांच्या वाटेत साप आला व उंदीर घाबरून पडले त्यामुळे गणेश पण उंदराच्या पाठीवरुन खाली पडले.त्यांच्या पोटातील सर्व मोदक पण बाहेर येऊन पडले.तेंव्हा त्यांना पाहून आकाशातील चंद्र तारे त्यांच्या वर हसू लागले.त्यावर गणेशाने चंद्राला शाप दिला कि चतुर्थीला तुझे कोणी दर्शन करणार नाही.

श्री गणेशाची नावे :

गणेशाची शंकर व पार्वतीचा पुत्र म्हणून शिवहर, पार्वतीपुत्र अशे नावे पडली आहेत.तसेच द्विमातुर असेही संभोधले जाते.विविध ठिकाणी या देवतेचे वर्णन बदलत असले तरी सगळीकडे हिंदू धर्मानुसार हत्तीचे मुख व मनुष्याचे अंग असलेली देवता असेच आहे.या देवतेचे वाहन पुराणामध्ये काही ठिकाणी उंदीर व काही ठिकाणी सिंह वर्णिले आहे.

गणपती हा महाभारत या महान ग्रंथाचा लेखनिक होता.संपूर्ण भारतात गणेश पुज्यनीय असून विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव

हा उत्सव महाराष्ट्रातील गणपती संदर्भामधील सर्वात मोठा सण आहे.दर वर्षी भारतीय पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या मध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी पासून सुरु होतो. श्री गणेशाच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्या जातात.देवाला लाल रंगाची फुले फार आवडतात अशी आख्याईका आहे त्यामुळे देवाला लाल फुलांचा हार घातला जातो. मोदक तयार करून नैवद्य म्हणून देवाला दाखवले जातात.त्यानंतर गणेश आरती गायली जाते व सर्वाना गणपतीचा प्रसाद वाटप केले जाते.

दहा दिवस उत्सव चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने ह्या उत्सवाची सांगता होते. पेशव्यांच्या काळात हा उत्सव फक्त घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा परंतु इ.स.१८९३ साली लोकमान्य टिळकांनी सर्व लोक एकत्र यावेत म्हणून हा उत्सव सार्वजनिक साजरा करण्याची प्रथा चालू केली.सुरुवातीला सनातनी व सुधारक लोकांनी टिळकांवर खूप टीका केली पण नंतर सर्वानी या गणेशाच्या सार्वजनिक स्वरूपाला मान्यता दिली. मुंबई व पुण्यात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत.तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग, कसबा पेठ आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, बाबू गेनू, मंडई आणि जिलब्या मारुती ही आणखी काही मोठी मंडळे आहेत. भव्य देखाव्यासाठी पुण्यातील हिरा बाग मंडळ प्रसिद्ध आहे.मुंबईमधील लालबागचा राजा मंडळ सर्वात प्रसिद्ध मंडळ असून सर्वात मानलेला गणपती आहे. अगोदरच्या काळात गणेश मूर्ती लहान व छोट्या स्वरूपात असत परंतु आजकालच्या काळात गणेश मूर्ती फार भव्यदिव्य स्वरूपात तयार केल्या जातात.त्यांच्या समोरचे देखावे सुद्धा तसेच भव्यदिव्य स्वरूपाचे राहतात.

इतर राज्यांतील गणेशपूजा

कर्नाटक व आंध्र प्रदेशामध्ये हा सण घरगुती स्वरूपात गणेशाची दहा दिवस पूजाअर्चा करून साजरा केला जातो.राजस्थान मध्ये हा सण गणगौर या नावाने साजरा केला जातो.बंगालमध्ये गणपतीची पूजा दुर्गादेवीसोबत केली जाते.

Ganesh Chaturthi Mahiti Greetings, Wishes : Marathi Nibandh

8 thoughts on “Ganesh Chaturthi Information in Marathi, गणेशोत्सव माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *