Skip to content

Makar Sankranti Information in Marathi, Essay, Wishes & Greetings

makarsankrant mahiti marathi

Makar Sankranti Information in Marathi

पौष महिन्यात येणारा भारतातील एक शेतीसंबंधित सण म्हणजे मकरसंक्रांत होय. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो.दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल या नावाने प्रचलित आहे.सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात ज्या दिवशी मार्गक्रमण करतो त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेशित होतो. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूवात होते.सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकताना पृथ्वीवरून व्यवस्थित पाहिले तर दिसते.भारतीय सरकारने हा सण राष्ट्रीय सण म्हणून घोषित केलेला आहे.

मकर संक्रांत कथा

फार वर्षापुर्वी लोकांना फार पीडा देणारा संकासुर नावाचा एक राक्षस होता.त्याला मारणे आवश्यक असल्याने देवीने संक्रांतीचे रूप घेतले.संकासुराला संक्रांतीदेवीने ठार मारले आणि सगळ्या लोकांना सुखी केले.

मकर संक्रांतीचे महत्व

 • मकरसंक्रांतीच्या सणाची महिला व नववधू आवर्जून वाट पाहत असतात.संपूर्ण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चार वेळा संक्रमणे होत असतात तरी भारतीयांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला खूप महत्त्व आहे. उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना सूर्याच्या उत्तरायणामध्ये झालेल्या संक्रमणामुळे अधिक प्रकाश व उष्णतेचा लाभ होतो.
 • भारतामध्ये बहुतेक भागात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी करतात. स्त्रिया गरिबांना मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तांदूळ,तीळ अर्पण करून सौभाग्याचे वाण लुटतात.
 • थंडीच्या काळामध्ये संक्रांतीच्या तिळाचे फार महत्व समजले जाते.थंडीच्या दिवसात तिळामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी मदत होते तसेच बाजरीची भाकरी, लोणी, गाजर,मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा जेवणात वापर करून उष्णता मिळवली जाते .तिलाच जेवणातील वापराचा दुसरा अर्थ आहे स्निग्धता. स्निग्धता म्हणजेच स्नेह व मैत्री.या स्नेहाचे गुळ व तीळ सोबत मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला उद्देश आहे. म्हणून या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करून स्नेह वाढवायचा आणि नवीन स्नेहसंबंध जोडायचे.तुटलेले संबंध आवर्जून पूर्ववत करायचे.

मूळ

उत्तरायण शब्द, हा दोन संस्कृत शब्द – उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांची संधीफोड आहे.

महाराष्ट्रातील संक्रांत

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्यात येतो.या ३ दिवसामध्ये भोगी (सामान्यतः १३ जानेवारी), संक्रांत (१४ जानेवारी) व किंक्रांत (१५ जानेवारी) अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी एकमेकांना हळदी-कुंकू लावतात.इंग्रजी कॅलेण्डर महिन्यानुसार हा दिवस साधारणपणे १४ जानेवारी रोजी येतो.तरी दर ७० वर्षांनी ही तारीख एक एक दिवस पुढे जात असते.

भारतीय संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे. या दिवसांमध्ये आपल्या शेतांत आणि मळ्यांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. बोरे,तीळ,हरभरे, ऊस,गव्हाची ओंबी अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात.

Makar Sankranti Essay

makar sankranti wishes marathi

धार्मिक अर्थ

यात्रा :

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रसिद्ध कुंभमेळा. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी नासिक,हरिद्वार, प्रयाग, उज्जैन अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो.याशिवाय कोलकाता शहरा जवळ गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित करण्यात येत असते.

पुराणातील उत्तरायण:

महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक महाराज भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या शुभ दिवशी म्हणजेच उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केल्याची कथा आहे.हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायन कालावधी पेक्षा जास्त शुभ मानला जातो.

प्रादेशिक विविधता

पूर्व भारतातील संक्रात संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया मध्ये थोड्या फार स्थानिक फेरफार सोबत साजरी केली जाते.

या सणाची स्थानिक नावे पुढील प्रमाणे आहेत

 • पंजाब – लोहडी अथवा लोहळी
 • हिमाचल प्रदेश – लोहडी अथवा लोहळी
 • बिहार – संक्रान्ति
 • आसाम – भोगाली बिहु,
 • पश्चिम बंगाल – मकर संक्रान्ति
 • ओडिशा – मकर संक्रान्ति
 • गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
 • कर्नाटक, आंध्र प्रदेश – (संक्रांति)
 • तमिळनाडू – पोंगल
 • शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
 • भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
 • थारू लोक – माघी
 • थायलंड – सोंग्क्रान
 • लाओस – पि मा लाओ
 • म्यानमार – थिंगयान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *