Name PRARTHANA BEHERE (प्रार्थना बेहेरे)

Also Known as / Real Name PRARTHANA BEHRE

Birthday / Date of Birth / Age 5th January 1983. As of early 2020, she is around 36 years old.

Marital Status / Husband / Spouse Currently Married. Her husband is the director-writer Abhishek Javkar. Their wedding date was November 14, 2017.

Career Span 2009 – PRESENT

TV Serials / Shows Acted
  • Mai Lek
  • Nachle Ve – Dance Show
  • Pavitra Rishta
  • Remix
Chitrapat / Films / Movies Acted
  • BodyGuard – Hindi
  • Coffee ani Barach Kahi
Most Memorable Role As Vaishali Dharmesh-Jaipurwala in Pavitra Rishta / Also in Salman Khan’s Movie Bodyguard.

Biodata Profile / Wikipedia Information

Though Prarthana comes from a Marathi family, her childhood happend in Gujrat.

Prarthana played the role of Leelavati in serial Mai Lek. Love U…Mr. Kalakaar!, directed by new director S. Manasvi was her debut role. Coffee ani Barech Kahi was one of her first big Marathi films, where she played the role of Jaai.

In 2016, she was seen in the movie Mr and Mrs Sadachari in the role of Gargi opposite Vaibhav Tatwawadi.

प्रार्थना बेहेरे

११ जुलै १९८० साली गुजरात मधील अहमदाबाद येथे प्रार्थना बेहेरेचा जन्म झाला. मूळची महाराष्ट्रीय असलेली प्रार्थना गुजरातेत जन्मली वाढली तरी तिला मराठी भाषेविषयी विशेष आत्मीयता वाटत आली होती. चित्र नाट्य या क्षेत्रात तिला अतिशय रस होता व सुरुवातीपासूनच प्रार्थना हिला अभिनयाचीही आवड होती .

अभिनय क्षेत्रात पदार्पण :

झी टी वी वरील पवित्र रिश्ता या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषिक अत्यंत लोकप्रिय अशा या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील अंकिता लोखंडे या अभिनेत्री च्या मालिकेतील धाकट्या बहिणीची भूमिका प्रार्थना हिला मिळाली व तीची गणती लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये होऊ लागली .पवित्र रिश्ता या मालिकेतील करंजकर कुटुंबातील सर्वात धाकट्या मुलीची वैशालीची भूमिका प्रार्थना हिला मिळाली. ही वैशाली एक अतिशय गोड व बडबडी अशी एक मुलगी असते. या मुलीचे लग्न धर्मेश जयपुर वाला या परभाषिक माणसाशी होते व तिच्या आयुष्यात होणाऱ्या उलथा पलथिचे तिने अतिशय प्रभावी पद्धतीने सादरीकरण केलेले पहावयास मिळाले, या शिवाय तिची भूमिका अतिशय संयत अशा स्त्री ची होती व ती तिने उत्कृष्ट पणे जिवंत केली.

या मालिकेपाठोपाठ तिच्या मराठी मालिकांमधील कारकिर्दीची सुरुवात झाली झाली .
नच ले वे या नृत्यावर आधारित अशा कार्यक्रमातही तिने भाग घेतला होत. या मालिकेतील तिचे सहकलाकार नेहा मरदा होते व या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरोज खान या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिकेने केले होते. हा कार्यक्रम एन डी टी वी इमाजीन या वाहिनीवर खूपच गाजला होता व त्यातील प्रार्थनाला विशेष करून नोटीस केले गेले.

या शिवाय प्रार्थना ने स्टार वन या वाहिनीवरील एका रिमिक्स शो मध्ये ही भाग घेतला होता जो तरुण वर्गाला खूपच भावला होता. याच शो नंतर प्रार्थना हिला सलमान खान व करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आय लावला यू मिस्टर कलाकार या हिंदी चित्रपटात एक लहानशी भूमिका मिळाली. या लहान भूमिकेतही प्रार्थना हिला लक्षणीय यश मिळाले व तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली .

चित्रपट व मालिका

प्रार्थना ने अनेक मराठी चित्रपट व मालिकांतून अभिनय केला आहे. मायलेक हि तिची एक गाजलेली मालिका. या मालिकेत प्रार्थना लीलावती नामक एका फौजदारी वकिलाच्या भूमिकेत दिसली. आई व लेकीची हि एक विलक्षण मालिका होती. ई टी वी वाहिनीवर टी खूप गाजली ही होती. प्रर्थानाच्या अभिनय कौशल्यास बऱ्यापैकी वाव देणारी ही मालिका मिळाल्यामुळे प्रार्थना अतिशय खुश झाली होती.
२०१३ साली वक्रतुंड महाकाय हा तिचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. यातील तिची भूमिका खूपच लक्षवेधी होती व या भूमिकेत तिचे विशेष कौतुक ही झाले.

त्यानंतर कॉफी आणि बरच काही हा तिचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला त्यातील तिचे सहकलाकार होते. वैभव तावडे व भूषण प्रधान. दिलीप प्रभावळकर या ज्येष्ठ कलाकाराची हि या चित्रपटात विशेष भूमिका होती. या चित्रपटास प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा जरासा थंडच प्रतिसाद मिळाला. पण चित्रपटातील प्रार्थना हिचा अभिनय व एकूणच अस्तित्व खूपच लक्षणीय ठरले.

या चित्रपटा पाठोपाठ तिला गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या महाराष्ट्र धाबा भटिंडा या चित्रपटात अतिशय वेगळी अशी भूमिका करायची संधी मिळाली. हि भूमिका मध्यवर्ती तर होतीच पण यात प्रार्थना हिच्या अभिनय कौशल्याची कसौटी च होती. व ती तिने उत्कृष्ट रित्या साकार ही केली. या चित्रपटात तिचा सहकलाकार होता अभिजित खांडकेकर हा दूरदर्शन वरील एक प्रथितयश कलाकार. चित्रपटात मराठी व पंजाबी संस्कृती चे सुंदर चित्रण केले गेले होते. या दोन जीवनशैलीचे संघर्ष व त्यातून निर्माण झालेले प्रश्न असा अतिशय वेगळाच विषय या चित्रपटातून हाताळला गेला पण तरीही या चित्रपटास तितकेसे यश नाही मिळाले.

या शिवाय रीता, बाइकर्स अड्डा, मितवा आणि बॉडी गार्ड या चित्रपटातूनही तिने लहान मोठ्या भूमिका केल्या. या गुणी अभिनेत्रीला तिच्या अभिनय कारकिर्दीत उत्तरोत्तर यश लाभो हीच शुभेच्छा.