Maharashtra Laghu Udyog Information in Marathi

महाराष्ट्रातील लघु आणि ग्राम उद्योग माहिती

महाराष्ट्र भारतातील लघु आणि ग्राम उद्योगात सर्वात पुरोगामी राज्य :

 • भारतातील सर्व राज्यांमध्ये शिक्षण आणि सुधारणा यात महाराष्ट्र अग्रेसर होता आणि सध्या पण आहे. महाराष्ट्रात मोठे उद्योग आहेत तसेच लघु आणि मध्यम उद्योग पण आहेत. अजूनही परदेशी गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावीशी वाटते. याचे कारण म्हणजे उद्योगासाठी लागणारी साधन सामग्री, पुरेसे आणि कुशल मनुष्यबळ, रस्ते जोडणी,आणि निर्याती साठी लागणारे वाहन स्थलांची समीपता. [उदा. विमानतळ, रेल्वे, जहाज इत्यादी]

लघु आणि गरम उद्योगांचे औद्योगिक विकासात योगदान :

 • भारत हा लहान खेड्यांचा देश आहे. अजूनही जवळपास ७0% जनता खेड्यात राहते. रोजगारासाठी किंवा दुष्काळ पडला तर तेथील जनतेला घर सोडून शहरांकडे यावे लागते. यामुळे शहरांवर ताण पडतो, बेरोजगारी वाढते आणि खेड्यातील लोकांना बेघर व्हावे लागते. यामुळे गांधीजीनी सांगितले होते की आर्थिक समानता हवी असेल तर तरुणांनी खेड्याकडे जावे. त्यासाठी त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला आणि खादीला लोक मान्यता दिली. त्यांच्या द्रष्टेपणा मुळे भारताच्या विकासात ग्राम उद्योगांना प्राधान्य देऊन योजना आखल्या गेल्या. त्यायोगे खेड्यातील उद्योगांची वर्गवारी करून त्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून नीती ठरविली गेली.

उद्दिष्टे :

 • महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळ ह्यांच्या समन्वयाने एक नवीन औद्योगिक धोरण २०१३ मध्ये राबवविले गेले. ह्यांची सहा प्रादेशिक कार्यालये आणि एक उप प्रादेशिक कार्यालय उघडली गेली. तसेच जिल्हा पातळीवर पण उद्योग केंद्रे उघडली गेली. त्यांची उद्दिष्टे याप्रमाणे आहेत :
 • १) रोजगारांच्या संधी निर्माण करणे आणि बेरोजगारीचे निवारण.
  २) समान आर्थिक स्थिती .आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण.
  ३) औद्योगिक विकेंद्रीकरण ,आर्थिक विकास, प्रोद्योगिक संतुलन.
  ४) श्रम प्रधान उद्योग म्हणून श्रमिक आवश्यक म्हणून औद्योगिक शांतता.
  ५) देशाच्या संस्कृतीचे जतन, कलेचा विकास,गट विकास, बंधु भाव, आणि परस्पर सहकार.
  ६) नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ ह्या उक्तीच्या भावनेला वृद्धी
  ७) व्यापार संतुलन भुगतान संतुलन .
  ८) विदेशी मुद्रा गंगाजळी मध्ये वाढ.
  ९) ग्रामीण जनतेला आत्मसन्मानाने जगण्याची आणि चांगले उत्पन्न मिळण्याची संधी
  १०) अर्थव्यवस्थेत महत्वाचे. जास्त श्रेष्ठ उत्पादन वाढ.
 • ह्या लघु उद्योगांचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम ह्या क्रमवारीत वर्गीकरण केले गेले. महाराष्ट्रात नैसर्गिक विविधता असल्याने ग्रामीण भागातून खूप तर्‍हेचे उद्योग विकसित करता येऊ लागले. उदा. शेतीला जोड धंदा म्हणून पशु पालन, दुग्ध व्यवसाय, बागवानी, मधमाशी पालन, रेशमी किड्यांचे पालन, फळे, फुलांची शेती, फळांवर प्रक्रिया करणे, काजू, आमसुल, जांभूळ ह्यांची सरबते, वेताच्या टोंकरी बनविणे इत्यादी. जेथे कलाकुसर आहे तेथे नक्षीकाम करणे, पैठण्या करणे, कापड उद्योग, हातमागाच्या साड्या, काचेच्या भांड्यांवर नक्षीकाम, नक्षीदार कोल्हापूरी चप्पल,द्राक्ष ,डाळिंबे, स्टॉबेरी,हापूसचे आंबे ह्यांच्या फळांवर प्रक्रिया करणे इत्यादी.
 • सरकारने ह्यासाठी SIDBI [Small Industries Development Bank] ,MSME, NSIC, MSMEDI,DIC and SFC NABARD ह्या संस्थाना नेमले आहे. त्यायोगे आता निर्यातीत ३३% भागीदार हे लघु उद्योजक आहेत. आणि २००७ च्या आकडेवारीप्रमाणे १२.८४ दशलक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे.

सरकारच्या योजना : Laghu Udyog Wikipedia in Marathi / Project List Ideas

१. प्रधान मंत्री रोजगार योजना ह्या अंतर्गत ह्या उद्योगांना पत पुरवठा केला जातो. लघु आणि सूक्ष्म उद्योगांना क्रेडिट हमी योजना तसेच व्याजावर अनुदान दिले जाते.

२. Khadi Gram Udyog Loan : मुद्रा हि २०१५ ची एक अभिनव योजना आहे जिच्यात कुठल्याही तारणाशिवाय तीन प्रकारची कर्जे देण्याचे राष्ट्रीयीकृत बँकांना निर्देश दिले गेले. [Micro unit Development & refinance Agency Limited] बाल, युवा आणि तरुण अशी तीन प्रकारची कर्जे आहेत. बाल – र. ५०००० /- युवा- ५,००,०००,आणि तरुण १०,००,०००/-

३. खादी ग्रामोद्योग : खादी ग्रामोद्योग तर्फे, स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास अंतर्गत विविध कलांचे आणि रोजगाराचे सवलतीच्या दरात [SC/ST साठी मोफत] प्रशिक्षण दिले जाते. त्यात लोणची पापड, शिवणकाम, फळांवर प्रक्रिया तसेच पॅकेजिंगचे प्रशिक्षण दिले जाते.

४. कॉयर उद्यमी विकास योजना अंतर्गत कौशल्य विकास, यांत्रिकीकरण, देशी बाजार उपलब्ध करून देणे, निर्यातीस हातभार लावणे, सरकारी आणि औद्योगिक समितीशी समन्वय साधणे. प्रचार, नाविन्य, आणि उद्योजकतेचा विकास करणे. ISO मानकासाठी मदत करणे. मार्केटिंग आणि त्यासाठी लागणारी मदत करणे. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यास मदत करणे.

५. एक खिडकी योजने अंतर्गत एकाच ठिकाणी सर्व फॉर्म्स ,पंजीकरण, आणि मंजूरी मिळण्याची सोय.

६. NSIC हि संस्था लघु उद्योगांना पहिल्या ९० दिवसांपर्यंत कच्चा माल घेण्यास आर्थिक मदत करते. शहरांमध्ये हातमाग आणि हस्तकला यांचे प्रदर्शन भरवून किरकोळ विक्रेत्या श्रमिकाला बाजारपेठ मिळवून देणे.

७. महिलांसाठी विशेष रोजगार निर्मिती निर्माण करून पत संस्था महिला बचत गट किंवा एकटी महिला उद्योजक ह्यांना अल्प दरात कर्ज मशिनरी आणि कागद पत्रांमध्ये सवलत आणि तत्काळ मंजूरी दिली जाते.

योजनेचे यश :

 • ह्या योजनांना चांगले यश आले असून कामसू आणि प्रामाणिक श्रमिकांना त्याचा लाभ झाला आहे. आता पैठणीला चांगला भाव मिळून थेट विणकरांकडून पैठणी विकत घेतली जाते. हापूसचे आंबे आता ऑनलाईन निर्यात होऊ लागले आहेत. त्यासाठी BARC ने irradiations चे तंत्र वापरून चांगल्या दर्जाचे आंबे व द्राक्षे निर्यात करण्यास योग्य असे बनविले आहेत. हिंदी सिनेमाची फॅशन डिझायनर डोंगरे हिच्याकडून पालघर येथील आदिवासींना कपडे बनविण्याचे ट्रेनिंग देण्यास सांगितले आहे त्यामुळे आदिवासींची कला आणि सरकारचे मार्केटिंग ह्यामुळे आदिवासींना रोजगार मिळणार आहे. गायीच्या पालनाबरोबर आता गोमूत्र पंचगव्य पण विकले जात आहे आणि शेतकर्याला अधिक उत्पन्न मिळत आहे.

शेवटी ‘योजकस्तत्र दुर्लभ:’. कल्पकता आणि त्याला व्यवहाराची जोड मिळाली तर ग्रामीण भाग प्राचीन भारता सारखा समृद्ध होईल यात शंका नाही.

Khadi Gram Udyog Products & Project : Pune / Mumbai / Maharashtra