Skip to content

Rice Information in Marathi | Rice Crop & Farming, Recipes

Rice Farming Agriculture Marathi

Rice Information in Marathi

भात / तांदूळ माहिती

तांदूळ एक हलका आहार

 • सणवार असले की घरात भात वरणाचा मंद सुगंध दरवळतो. ताटात भाताची मूद, त्यावर घट्ट वरण वर तुपाची धार आणि लिंबू वा ! तोंडाला पाणी सुटते. असा हा भात किंवा तांदूळ आपली भारतीयांच्या जेवणाचे मुख्य अंग आहे.
 • आपल्या भारताच्या एकंदर पिकांपैकी एक चतुर्थांश भाग तांदूळ हे पिक आहे आणि निम्म्या भारतीय लोकांचे हे मुख्य अन्न आहे. देशाच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील किनार पट्टीचा जेथे पर्जन्यमान १५० से.मी च्या वर हे धन्य पिकवले जाते.
 • जगामध्ये तांदूळाच्या १०,००० जाती आहेत त्यापैकी ४००० जाती भारतात पिकवल्या जातात. तुम्हाला आठवत असेल की बासमती हा प्रामुख्याने भारतात पिकवला जाणारा सुगंधी तांदूळ ! ह्याचे अमेरिकेने पेटंट घेऊन टाकले. त्यामुळे आपले सरकार खडबडून जागे झाले आणि हळदीसाठी काकोडकर ह्या शास्त्रज्ञाने लढा देऊन ते पेटंट मिळवले.
 • तांदूळाच्या उत्पादनात चीनचा पहिला नंबर लागतो त्या खालोखाल भारताचा नंबर लागतो. तांदूळ प्रथम चीन मध्येच उगवला जात होता. पुरातत्व विभागाच्या शोधानुसार ११,००० वर्षापूर्वी यांगत्से नदीसाठी तांदूळ उगवला जात होता.
 • नंतर ख्रिस्तपूर्व २००० (2000 B.C.) वर्षापूर्वी साउथ इस्ट आशिया आणि इंडोनेशिया ते जपान असा तांदूळाचा खाद्य म्हणून प्रसार झाला. भारत आणि श्रीलंकेत ख्रिस्तपूर्व २५०० आणि १००० वर्षापूर्वी तांदूळ उत्पादन सुरु झाले.
 • इ.स. ७०० (700 A.D.) नंतर इस्लामी ‘मूर’ चे स्पेनवर आक्रमण झाल्यानंतर आणि युरोपियन लोकांच्या वसाहती वाढल्यानंतर अमेरिका, युरोप, अफ्रिका इथे तांदूळाचे उत्पादन होऊ लागले. होऊ लागले. तांदूळ कुठे आणि कसा पिकवला जातो ते पाहू.

भौगोलिक आवश्यकता

 • तांदूळ हे उष्ण कटिबंधातील पिक आहे. हे समुद्रकिनार्‍यापासून २५०० मीटर उंचीपर्यंत कुठेही पिकते, फक्त पर्जन्यमान १०० ते २०० से.मी. असावे लागते. तरीही जेथे इतका पाऊस नसेल तेथे जलसिंचन पद्धतीने भात उगवता येतो जसे पंजाब आणि हरियाना मध्ये केले गेले.
 • पहाडी प्रदेशात तांदूळ डोंगर उतारावर लावतात जेणे करून सतत पाणी मिळत राहील. त्याला टेरेस फार्मिंग म्हणतात. मात्र भाताला सतत पाणी लागते किंवा पाणथळ जमीन करून तेथे रोपे लावतात.
 • भाताला गाळाची, चिकण माती, किंवा वाळू असलेली जमीन चालते. तसेच आम्ल किंवा अल्कली पण जमीन चालते. त्यामुळे भात हा नदीच्या मुखाकडे, पुराची जमिनीवर, त्रिभुज प्रदेशात तसेच किनार पट्टीवर पिकतो. विशेषत: अग्निजन्य खडक भाताच्या पिकला उपयुक्त असतो. त्यातल्या त्यात गाळाची सुपीक जमीन किंवा चिखल होणारी काळी जमीन ज्यात आर्द्रता राहू शकते अशी जमीन भाताला उपयुक्त असते.
 • भाताची लावणी, आवणी आणि कापणी ह्यासाठी खूप मजूर लागतात. यांत्रिक शेतीचा तांदूळ पिकवण्यात फारसा उपयोग होत नाही. भाताची थोडी मोठी झालेली रोपे पुन्हा पेरतात. हे सगळे हाताने करावयास लागते म्हणून खूप मजूर लागतात.

भात पिकवण्याची पद्धत

 • भात हे तृणधान्य आहे. म्हणजे हे एक प्रकारचे गवत आहे. पण भाताचे वैशिष्ठ्य असे आहे की तो दोनदा पेरावा लागतो. प्रथम भात पेरण्यांसाठी जमीन नांगरून घेतात. त्यावर मजूरांकडून भाताची बियाणे फेकली जातात.
 • काही दिवसांनी रोपे ६ इंचांपर्यंत वाढली की दुसरीकडे चौकोनी शेताच्या तुकड्यास समतळ करून चोहिकडे मातीचा बंधारा करून त्यात पाणी भरून ठेवतात आणि खुडलेली रोपे त्यात पुन्हा पेरतात.
 • पावसाळ्यातच हे पिक येते त्यामुळे रोपांना पाणथळ जमीन मिळते. नाहीतर जलसिंचन करून शेत पाण्याने भरलेले ठेवावे लागते.
 • सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये साळी [तांदूळाच्या लोंब्या,किंवा कणीस] तयार होतात. नंतर कापणी आणि मळणी यंत्राने पूर्ण रोप काढून लोंब्या वेगळ्या करतात. रोपांचे धांडे गुरांना खाण्यास किंवा शेतात पसरण्यास उपयोगी होतात.
 • तांदूळ मग साळीतून वेगळा काढण्यासाठी पाखडला जातो. त्याला हातसडीचे तांदूळ म्हणतात. हे काम बहुतेक वेळा मजूर बायांकडून केले जाते. पण हा तांदूळ मळकट किंवा लाल दिसतो. व्यापारासाठी यंत्रात पॉलीश केलेला तांदूळ घेतात. त्यामध्ये यंत्रात साली काढून टाकून पुन्हा फिरविले जाते कारण तांदूळाच्या फोलपटात {ब्रान} तेल असते त्यामुळे लालसर रंग येतो. हा तांदूळ ब्राउन तांदूळ म्हणून पौष्टिक म्हणून वापरला जातो.
 • पांढरा शुभ्र तांदूळ मिळवण्यास त्याला पॉलीश केले जाते. आणि फोलपटापासून तेल बनवले जाते. सध्या हे तेल कमी कॅलरी आणि पौष्टिक म्हणून आपण वापरतो पण ही फोलपटे अमेरिकेत गुरांना खायला दिल जातात.

भाताच्या मुख्य जाती / पोषण

 • तांदूळाच्या जागतिक तीन जाती आहेत, जपानी, चिनी आणि इंडियन.
 • जपानी लोकांनी भात शेतीमध्ये अत्यंत संशोधन करून उत्तम जातीच्या तांदूळाची उपज केली आहे. तसेच थोड्या जागेत जास्त पिक देणार्‍या पण जाती विकसित केल्या आहेत.
 • आपल्याकडे पण चेन्नई आणि कोकण येथे संशोधन चालू आहे. आपल्याकडे तांदूळाच्या खूप जाती आहेत आणि त्याचे खाद्यपदार्थ पण वेगवेगळे आहेत. बासमती हा पहिल्या नंबरचा तांदूळ त्याच्या लांबसडक दाण्यामुळे आणि सुगंधामुळे प्रसिद्ध आहे. तसेच आंबेमोहोर पण सुगंधी आहे. भातासाठी जिरेसाळ, कोलम, इंद्रायणी वगैरे बारीक दाणा वापरला जातो.
 • दाक्षिणात्य प्रदेशात इडली डोशासाठी जाड तांदूळ वापरतात. बासमतीसारखाच पण सुगंध नसलेला दिल्ली राइस, आणि मध्यप्रदेशातील काली मुछ् हे तांदूळ आहेत. बंगाल, आंध्र प्रदेश, आसाम, केरळ आणि कोकण प्रदेशातील लोकांचे भात आणि मासे हे मुख्य अन्न आहे.
 • भातामध्ये ९०% कर्ब (carbohydrates), ८% प्रथिने (protein), आणि २% चरबी (fat) असते. तसेच त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस,सेलेनियम, लोह, थायमिन आणि नियासिन असते.
 • ह्यात ओमेगा-६ फॅटी अॅसीड असते. हे अशक्त लोकांना सहज पचण्यासारखे अन्न असल्याने आजारी लोकांना भाताची पेज दिली जाते. भाताचे मोदक, खीर इत्यादी गोड आणि इडली, ढोकळा, आणि डोसा असे खूप पदार्थ बनवतात.
 • हे कॅशक्रॉप म्हणजे पैसे देणारे पिक असल्याने शेतकर्‍यांना खूप महत्वाचे आहे.

Bhat Sheti / Rice Recipes in Marathi Mahiti

1 thought on “Rice Information in Marathi | Rice Crop & Farming, Recipes”

 1. Mukesh Atmaram Satibawane

  This is general information about rice. I am looking. For good rice farming having use of less manpower & various technics.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *