Skip to content

Sheli Palan Mahiti Marathi | Goat Farming Information, Bakri Palan Project

sheli bakri farming project business

Goat Farming in Marathi

शेळी /बकरी पालन

वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली होती, बकरी ईद निमित्त बकरे विकायला आणले होते, त्यात एका बकर्याला १ लाख रुपये किमत मिळाली. दुसरी बातमी अशी होती, ओझर मिग नाशिक हून कार्गो विमानातून बकरे सौदी अरेबियाला निर्यात झाले. अशा दोन कंसाईनमेंट गेल्या आहेत. वाचून आश्चर्य वाटले न?

पशु पालन हा पूर्वी शेतीला एक जोड धंदा म्हणून गणला जायचा. आणि तो त्या शेतकर्याच्या घरगुती उपयोगा पुरता असायचा. आता तसे राहिलेले नाही. बेरोजगारी आणि महागाई,तसेच मटणाची वाढती मागणी यामुळे सर्वांचे लक्ष ह्या नवीन आवक देणार्या धंद्याकडे गेले. जसे जसे यश मिळत गेले तसे तसे जास्ती जास्त लोक हयाकडे आकर्षित झाले. आणि आता तो एक दुर्लक्षित जोड धंदा राहिलेला नसून कित्येक लोकांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन झालेले आहे.

आता बकरी पाळून माळरानावर चरायला सोडून देण्या ऐवजी त्यांचे शास्त्रोक्त पालन करणे सुरू झाले आहे. आता हा खेड्या पुरता मर्यादित राहिलेला नसून सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, परंपरागत व्यावसायिक, महिला आणि स्वयं रोजगार पहाणारे ह्या सर्व लोकांकडून हा व्यवसाय चालविला जातो. एक योजनाबद्ध उपक्रम सरकार तर्फे राबवविला जात आहे.

Animal Husbandry Department of Maharashtra विभागा तर्फे खादी ग्रामोद्योग आणि इतर संस्थांतर्फे बकरी/शेळी पालनाचे शिक्षण दिले जाते. त्यात बकर्यांच्या जाती, त्यांचे गुण वैशिष्ठ्ये ,त्यांना लागणारे अन्न, त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांना होणारे रोग आणि उपचार हयाबद्दल समग्र माहिती दिली जाते. तसेच इच्छुकांना त्यांची ऐपत नसेल तर मिळणारी सरकारी मदत, सबसिडी हयाबद्दल पण माहिती दिली जाते. अल्प भूधारक व भूमिहीन लोकांना विशेष मदत करून त्यांचे जीवन सुसह्य केले जाते. त्यामुळे कोणी ही नोकर्यांच्या मागे पळण्याच्या ऐवजी स्वत:च्या पायावर उभे राहून आणखी काही जणांना रोजगार देतात.

सरकारी योजना :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ हे जिल्हाधिकार्याच्या अधिपत्याखाली असलेले महामंडळ असून त्यातर्फे शेळी पालनास ५०% ते ७५% सबसिडी दिली जाते. त्यामध्ये शेळ्यांची किमत,जागेची किमत, लागणारे सामान इत्यादि पुरविले जाते. तसेच काही राष्ट्रीयीकृत बँका आणि IDBI आणि NABARD ह्या सरकारी बँका पण कर्ज पुरवठा करतात. त्यात २५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. किंवा एकंदर प्रोजेक्ट च्या ३३% सबसिडी दिली जाते. ह्यावर वेगवेगळे व्याज असते तरी सामान्यत: ते १२% इतके असते.

शेळी पालन आणि त्यांच्या जाती :

भारतामध्ये हिमालयापासून दक्षिणेपर्यंत विविध जातीच्या शेळ्या आहेत. त्यांचे वर्गीकरण त्यांच्याकडून मिळणार्या उत्पन्नाप्रमाणे आहे. शेळ्या मांस, कातडी, लोकर आणि दूध ह्यासाठी पाळल्या जातात. त्यांच्या एकूण २0 जाती आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
हिमालयीन शेळ्या ह्या HP,UP आणि जम्मू कश्मीर मध्ये असतात. त्यांच्याकडून पशमीना लोकर आणि मांस मिळते. तीनच्या जाती, पशमीना,चेगू, गड्डी इत्यादि.

नॉर्थ : पंजाब,हरयाणा आणि up येथील शेळयांच्या जाती जमूनापरी बीटल, आणि बरबारी. त्या जास्तकरून दुधासाठी प्रसिद्ध आहेत.
सेंट्रल : राजस्थान, MP, गुजरात महाराष्ट्र. येथील शेळयांच्या जाती, मारवरी, महसणा, झळवडी, सिरोही, बिरारी, आणि कठियावाडी
सदर्न : महाराष्ट्र,कर्नाटक, AP आणि तेलंगणा. येथील शेळयांच्या जाती, कणणी अडी, कोडी अडी, मलबार, तेल्लीचेरी, सुरती, आणि संगमनेरी /ऊस्मानाबादी

आणखी काही हायब्रिड जाती आहेत त्या म्हणजे, बोअर ,आणि ब्लॅक बंगाल, तसेच सानेन,आणि अँग्लो नुबियन.
ह्यामध्ये महाराष्ट्रात उस्मानाबाद /संगमनेर ही आणि झालवाडी जास्त लोकप्रिय आहेत.

शेळ्यांना कसे ठेवायचे – काही सल्ला :

आधी सांगितल्याप्रमाणे बकर्या उघड्यावर किंवा माळरानावर पाळून चालणार नाही. व्यवसायासाठी त्यांची उत्तम देखभाल करावी लागते. त्यांच्या गोठ्यासाठी चांगली जागा, पाणी, हवा ह्यांचे नियोजन करावे लागते.

गोठा नेहमी उंचावर मोकळ्या जागेत असावा म्हणजे ओलसरपणा जाऊन कोरडी जमीन राहील. गोठ्यात उत्तम हवा खेळती असावी. तसेच जमीन ओलसर किंवा दमट नसावी म्हणजे त्यांना जंतुसंसर्ग होणार नाही. गोठ्यात जागोजागी पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. गोठ्याला उत्तम सांडपाण्याची व्यवस्था असावी. कुठे ही अस्वच्छता किंवा कीटक नसावे. पावसापासून पूर्ण संरक्षण असावे कारण बकरी पावसाला घाबरते. कुरणाच्या भोवती दणकट कुंपण असावे. ज्यामुळे कुत्रे किंवा इतर प्राण्यांचा त्रास होणार नाही .गोठ्यामध्ये मोकळी जागा असावी. पिल्ले आणि बकरी वेगवेगळे ठेवावे.

बकरीचे अन्न :

बकर्यांना ताजे आणि पौष्टिक अन्न द्यावे. उरलेले किंवा शिळे अन्न देऊ नये. चांगले गवत असावे. नाहीतर शेंगदाणे, बार्ली मका इत्यादि खायला द्यावे. बकरी सर्व प्रकारचे गावात खाते. पण ज्यामुळे तिला रोग होईल असे खाऊ देऊ नये.

बकरीला होणारे रोग :

जर नीट काळजी घेतली तर बकरी पाळणे अत्यंत सोपे आहे. पण त्यांना पण काही रोग होतात. उदा. जंतुसंसर्ग, enterotoxaemia, pneumonia, anthrax, septicemia, foot rot, goat rot, PPR, FMD, tape worm, round worm fluke,lice tick इत्यादि. हे सर्व रोग अस्वच्छते मुळे होतात. त्यामुळे बकरी आणि ती राहत असलेला परिसर अत्यंत साफ ठेवावा लागतो. आजारी बकरी वेगळी ठेवावी लागते. तसेच हे रोग होऊ नये म्हणून तिला वेळोवेळी लशीकरण करावे लागते. कळपातील एखादी बकरी अशक्त किंवा ताप आलेली असेल तर तिला ताबडतोब वेगळे ठेवून पशु वैद्यका कडून तपासणी करून घेऊन औषधे द्यावी.

बकरी घेताना चांगल्या हायब्रिड जातीची घ्यावी. तसेच नवीन उत्पादनासाठी आर्टिफिशियल इंसेमिनेशन करावे. चांगल्या रीतीने हा व्यवसाय केला तर त्याचे खूप फायदे आहेत.

फायदे :

व्यापाराकरिता हा एक उत्तम पर्याय आहे कारण अल्प भांडवलात हा करता येतो. अगदी एक दोन बकर्या घेऊन देखील हा धंदा वाढविता येतो.
मांस, कातडे,लोकर आणि दूध ह्या बरोबर लेंड्यांपासून खत करून ते देखील उत्तम भावात विकले जाते. कारण बकरी सर्व प्रकारचे गवत खाते म्हणून तिचे दूध ही पौष्टिक असते आणि तिच्यामुळे मिळणारे खत देखील उत्तम प्रकारचे असते. विशेषत: गुलाबाला तिचे खत खूप फायदेशीर असते.

बकरीमुळे हल्ली निर्यात पण वाढली आहे. त्यामुळे विदेशी चलन पण मिळते.

बकरीला अगदी थोडे अन्न लागते आणि जागा पण थोडी लागते. त्यामुळे अल्प भू धारक पण हा धंदा करू शकतात. बकरी पालनात मजूर पण कमी लागतात. बकरीला रोग पण कमी होतात आणि योग्य काळजीने त्यावर मात करता येते. ह्या धंद्याला सरकारी आणि बँक ह्यांची मदत मिळते.

आता ते दिवस दूर नाही की भारत पण नोर्वे सारख्या देशाप्रमाणे पशु पालनात जगात अग्रेसर ठरेल.

Osmanabadi Goat Information in Marathi Language

Bandist Sheli / Bakri Palan Marathi Mahiti – Project, Business Plan

6 thoughts on “Sheli Palan Mahiti Marathi | Goat Farming Information, Bakri Palan Project”

 1. Bibishan Chaudhari

  खुप छान माहिती तुम्ही या लेखा द्वारे दिली आहे. धन्यवाद

 2. Manoj Vijayrao Nawthale

  Hi Sir, I am Manoj. I like your information. I am Bsc In HORTICULTURE. I am from Buldhana District. Sir, I had started Usmanabadi goat farm. Plz tell me about marketing. Where to buy and sell. Market demand. Market prize. And how get loan from bank.

 3. hi sir. im kavin
  actually mala dekhil pashupalan ha vyavasaay kaaycha aahe. But kahi resons mule mi nahi karat ahe.chan mahiti dilit tumhi
  thank you…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *