Skip to content
Home » Tips Information in Marathi » Pineapple Information in Marathi | Benefits & Fayde Mahiti अननस

Pineapple Information in Marathi | Benefits & Fayde Mahiti अननस

Pineapple Marathi Mahiti

Pineapple Information in Marathi

Pineapple Ananas / अननस माहिती

Information and Uses of Pineapple / अननसाची माहिती आणि फायदे :

  • अननसाचे नाव जरी काढले कि आपल्याला आठवतो तो म्हणजे थंडगार जूस…हं तोंडाला पाणी सुटले ना ??
  • लांब अकराराचे हे आंबट गोड फळ आहे, त्याची पाने काटेरी असतात तसेच फळाच्या सालीवर देखील काटे असतात.या फळाची लांबी १ फूट पर्यंत असू शकते. या फाकच्या डोक्यावर त्याच्या पानांचा काटेरी मुकुट असतो.
  • याच्या साली थोड्या कठीण असतात. याचा खाण्यासाठी वापर करण्यापूर्वी सालीचे आवरण पूर्णपणे काढून टाकावे लागते आणि मग आतमध्ये असते ते एक रसरशीत पिवळ्या रंगाचा गर. याचा गाभा थोडासा कठीण आणि अधिक गोड असतो तसेच कडेच्या बाजूला थोडे काटे असू शकतात.
  • अननस हे जगातील तिसऱ्या क्रमांककाचे लोकप्रिय फळ आहे आणि याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मूळचे दक्षिण अमेरिकेच्या या फळाने संपूर्ण जगाला भरलं घातलेली आहे.
  • अननसाच्या रेड स्पॅनिश जातीच्या झाडाच्या पानांपासून एक रेशमी धागा तयार केला जातो जो विणकामाची अत्यंत प्रसिद्ध आहे. पाय फायबर्स असे या धाग्याचे नाव आहे.
  • युरोपमध्ये या धाग्यांनी विणलेल्या कपड्याने अतिशय ग्लॅमर आहे आणि स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात याची हौस आहे. अननस, ब्रोमेलेन, फ्लोजेन्झियम, डेब्रीडेस या नावानी देखील ओळखले जाते.

Pineapple Cultivation / अननसाची शेती :

  • जगातील अनेक देशांमध्ये अननसाची लागवड केली जाते. याचे झाड खुरटे आणि जमिनीलगतचा येते. अननस फळ झाडाच्या वरच्या भागाला येते. याची शेती पॉलीहाऊस मध्ये देखील केली जाऊ शकते.
  • युरोपमधील कोस्टा रिका येथे अननसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अननसाचे हिलो, नेटल राणी, रेड स्पॅनिश अशा अनेक जाती आहेत.
  • हवाईन बेटांवर देखील अननसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. १७ व्य शतकात अननस हे फळ जगभर प्रसिद्ध झाले. हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे.
  • अननसाच्या पानांचा वॉलपेपर म्हणून देखील वापर केला जातो त्यामुळे याच्या पानांना देखील बाजारात मोठी मागणी आहे. तसेच अननसापासून सुगंधी तेल देखील बनवले जाते.

Recipes from Pineapple / अननसाचे पदार्थ :

  • अननसापासून जगभरात अनेक प्रकारचे विशिष्ठ आणि चविष्ठ पेय व इतर खाद्य पदार्थ बनवले जातात. अननसाचे पिनाकोलाडा हे कॉकटेल पेय जगभर प्रसिद्ध आहे.
  • अननसाचे सरबत, जेली, केक लोणचं, जॅम, कोशिंबीर, शिरा एवढेच काय तर अननसाचा पिझ्झा देखील असतो. अनेक पाश्चात्य देशांमध्ये लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आणि आहारात अनानासाने आपली जागा निर्माण केली आहे.
  • जेवणाच्या विविध पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी आणि मुख्य करून फ्लेवर साठी म्हणून अननस प्रसिद्ध आहे. जेवणाच्या विविध सजावटीसाठी देखील अननसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
  • केक तयार करताना अननस फ्लेवर ला एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. आता ही मागणी कमी झाली असली तरी देखील केक च्या सजावटीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर आहे.
  • अननसाचे आईस्क्रीम, कुकीज, कप केक, स्मूदी सुद्धा लोकप्रिय आहेत.

Ingredients in Pineapple / अननसातील घटक :

  • अननस हे आरोग्यासाठी चांगले असते. भारतात साठर्णपणे उन्हाळ्याच्या सुरवातीला हे फळ बाजारात विकायला येते. यामध्ये ८६ % पाणी असते, व्हिटॅमिन अ आणि क मोठ्या प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन सी, बी १२ आणि कॅल्शियम सुद्धा असते.
  • यामध्ये खनिजे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात जसे मॅग्नेशिअम, लोह, थायमिन, पोटॅशिअम. ७४ कॅलरीज, १९.५ ग्राम कार्बोहायड्रेट्स आणि ० % फॅट्स असते.
  • अननस हा कॅन मध्ये म्हणजेच पॅकेजिंग मधेपण उपलब्ध असतो त्याला आपण पल्प असे देखील म्हणतो.
  • तज्ज्ञांच्या मते केन केलेल्या पल्प मध्ये साखरेचे प्रमाण अधिक असू शकते आणि व्हिट्यामिन आणि खनिजांची संख्या कमी होऊ शकते. तसेच दीर्घकाळ टिकवण्यासाठी म्हणून प्रिसेर्वेटिव्ह देखील असतात.

Benefits of Pineapple / अननसाचे उपयोग :

अननसाचे आपल्या शारीसाठी अनेक उपयोग आहेत.

  • यामध्ये ब्रोमेलन हे द्रव्य मोठ्या प्रमाणात असते, जे अर्थ्राइटिस आजाराने ग्रस्त असणाऱ्यांच्या उपचारात महत्वाचे ठरते.
  • सायनस चा त्रास असणाऱ्या लोकांना अननसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे त्यांचा त्रास कमी होण्यात मदत होते.
  • अननस आपल्याला उंच आणि सुदृढ बनवते.
  • अननस मध्ये असणारे व्हिटॅमिन सी हे सांधेदुखी आणि हृदय रोगावर उपयुक्त ठरते.
  • अननसाचे नियमित सेवन केल्याने राजेनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करते.
  • अननसाच्या फायबर देखील बऱ्याच प्रमाणात असतात जे आपले पचन नीट करून आतडे साफ ठेऊ शकते.
  • ज्या लोकांना रक्ताच्या गाठी होण्याचा त्रास आहे त्यांनी अननसाचे नियमित सेवन करावे.
  • वजन कमी करू इच्छिणार्यांनी नियमित अननसाचे सेवन करावे.
  • आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी अननस उत्तम भूमिका बजावतो.
  • अननसमध्ये अँटिऑक्सिडंट ची मात्र मोठ्या प्रमाणात असते.
  • यामध्ये कर्करोगाशी लढणारे गुणधर्म असतात.
  • दीर्घकाळ असणाऱ्या ऍसिडिटी वर अननस सेवन एक चांगला उपचार असू शकतो.
  • सततच्या सर्दी खोकल्याने कंटाळलेले असाल तर रोज अननसाचे सेवन करा.
  • तसेच अननसाच्या नियमित सेवनाने दीर्घायुष्य लाभते.

Disadvantages Of Pineapple / अननसाचे धोके :

  • कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास तिचा आपल्या शरीराला अपाय होतो तसेच अननसाचेदेखील आहे.
  • बऱ्याच लोकांना अननसाची ऍलर्जी असते.
  • अननसाच्या काट्यामुळे तोंडाचा आतील बाजूस इजा होऊ शकते.
  • तसेच यात व्हिटॅमिन सी अधिक असते आणि अति सेवनामुळे याचा धोका संभवतो.
  • तसेच अननस खाल्यामुळे जर मळमळ उलटी अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • कच्या अननसाचे सेवन करणे टाळावे.
  • तसेच अननसाच्या गाभ्यातील कडक गराचे सेवन करणे टाळावे ते आपल्या आतड्यामध्ये गाठी तयार करू शकतात.
  • अति सेवनामुळे पुरळ देखील येऊ शकते..
  • जर तुम्ही अननस दीर्घ काळ तोंडात ठेवले तर यातील ब्रोमेलन मुळे तुमचे ओठ, हिरड्या जीभ यात तुम्हाला संवेदनशीलता जाणवू शकते.
  • अननस हे मासिक पाळीला उत्तेजना देणारे फळ आहे, म्हणून गरोदर स्त्रियांनी अननसाचे सेवन टाळावे ज्यामुळे त्यांना गर्भपाताचा धोका संभवणार नाही.
  • अननसंधे पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे जर तुम्ही अननसाचे अधिक सेवन केलेलं असेल आणि तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • तसेच आजकाल सर्वच फळांवर किट्टकनाशकांचा फवारा होत असतो त्यामुळे ते आपल्या आरोग्यावर देखील परिणाम करू शकतात.

Pineapple Benefits in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *