Home » Essay in Marathi Language » Marathi Letter Writing | Formal Letter Writing in Marathi Language

Marathi Letter Writing | Formal Letter Writing in Marathi Language

Marathi Formal letters

Marathi Letter Writing

Patra Lekhan : Examples 1

श्री प्रकाश गोविंद राजे
गंगा को ओप. हौसिंग सोसायटी,
फ्लॅट नं ४१५, चौथा माळा,
आंबेडकर रोड, आंबेडकर नगर,
पुणे, पिन – ४११००२.
२० जुलै २०१८.

प्रति,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
पुणे महानगर पालिका,
पुणे, ४११००१.

विषय :- घंटागाड़ी वेळेवर येणेबाबत.

महाशय,

मी श्री प्रकाश गोविंद राजे, आंबेडकर नगर येथे राहतो. गेले कांही दिवस आमच्या विभागात कचरा गोळा करण्यास घंटा गाड़ी वेळेवर येत नाहीं, किंवा कधी कधी येतच नाहीं. न येण्याबाबत काहीही सूचना सुद्धा दिली जात नाहीं.

आमचा विभाग अतिशय गजबजलेला असून, एकूण २५ सोसायट्या आहेत. एका सोसायटी मध्ये सरासरी १० फ्लॅट असल्यामुळे येथे एकूण २५० फ्लॅट आहेत. घंटागाड़ी न आल्यास इतक्या फ्लॅटसचा कचरा दररोज जमा होतो आणि कांही जण रस्त्यावर फेकतात. त्या मुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. त्यात मोकाट कुत्री आणि जनावरे यथेच्छ फिरत असतात. घाणीमुळे वास आणि डास/मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सध्या डेंग्यु, मलेरिया इत्यादि रोगांच्या साथी चालू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण जातीने ह्या बाबतीत लक्ष घालून संबन्धित घंटागाडीच्या ठेकेदाराला समज द्यावी आणि यापुढे घंटा गाड़ी वेळेवर येईल हयाची काळजी घ्यावी ही विनंती.

आपला,
प्रकाश गोविंद राजे.

Marathi Letters : Sample 2

साधना प्रिंटिंग प्रेस,
महात्मा गांधी रोड,
पुणे, ४११०२०.
२० जून २०१८.

प्रति,
नवीन बुक डेपो,
शिवाजी चौक ,
नासिक – ४२२००९.

विषय :- पुस्तकांचे वितरण

महोदय /महोदया ,

आपले दिनांक ९ जून २०१८ चे क्रमांक nbd/१७६ चे पत्र मिळाले. आपण ऑर्डर केल्याप्रमाणे आम्ही मराठी व्याकरण, बालभारती इयत्ता १ली ते ७वी पर्यंत आणि गणित ८वी ते १०वी पर्यंतचे एकूण २०० पुस्तकें पाठवित आहोत. त्यांच्या किंमती खालील प्रमाणे आहेत.

पुस्तकांचे नाव – दर रु. – नग – किंमत रु.

१. मराठी व्याकरण २० ४० ८००
२. बालभारती ४० १०० ४०००
३. गणित ६० ६० ३६००

एकूण किंमत : रु.८४००

आम्ही आपणास पुस्तकें मारुति कूरियर ने पाठवित आहोत. कंसाईनमेंट नंबर ४५६९२१ आहे. आपण पुस्तकें मिळाल्याची पोच द्यावी. आपण आम्हांस डिमांड ड्राफ्ट किंवा बैंक ट्रांसफर ने पैसे पाठवू शकता. त्यासाठी अकाउंट नंबर आणि बँकेचा तपशील आपणास पाठवत आहोत :

खातेदाऱ्याचे नाव : साधना प्रिंटिंग प्रेस.
बँकेचे नाव : स्टेट बैंक ऑफ इंडिया, कोरडेवाडी शाखा.
अकाउंट नंबर : ४२३४६६७६९३.

पोच मिळाल्यानंतर ८ दिवसांच्या आत पैसे पाठवावे. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक दिवसास १२% प्रमाणे व्याज द्यावे लागेल.

पुस्तकांची डिलीवरी वेळेवर न झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आम्ही कूरियर कंपनीशी पत्रव्यवहार करून आपणास मदत करू शकतो.

कळावे,

आपले स्नेहांकित,
सू. श्री. जोशी.[संचालक] साधना प्रिंटिंग करिता.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Letter Writing in Marathi Example

40 thoughts on “Marathi Letter Writing | Formal Letter Writing in Marathi Language”

  1. प्रती ,
   वैद्यकीय आरोग्य अधिकारी ,
   सार्वजनिक आरोग्य विभाग ,
   अमरावती महानगरपालिका ,अमरावती
   अर्जदार :- श्री अमित सुधाकर गावंडे
   मार्फत :- स्त्री वैद्यकीय अधिकारी ,शहरी आरोग्य केंद्र विलासनगर
   विषय :- 1 दिवसाची किरकोळ रजा मिळण्याबाबत
   महोदय,
   वरील विषयास अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करते की ,माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी दि .24/07/2019 ला कार्यालयास हजर राहू शकणार नाही .तरी माझी एक दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्यात यावी ही विनंती.माझ्या अनुउपस्थितीत माझ्या सर्व कर्तव्या व जबाबदर्‍या श्री.अमोल जंभोळे सांभाळतील यांना देण्यात यावी ही विनंती
   आपला विश्वासू
   अमित

 1. kishor omaprakash sharma

  आपले पत्र फार्मुले फार छान आवडले
  आभारी

 2. The format of letter writing is old one. In new format the sender’s address is at the bottom means after yours truly or in marathi आपला, . so its my request to know the new format of letter writing on this website .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *