Gas Agency Letter Patra

Gas Agency Letter Patra in Marathi | गॅस एजन्सी ट्रान्सफर- विनंती अर्ज

Gas Agency Letter in Marathi

Transfer Letter from Gas Agency in Marathi Language

रमाकांत वि. पाठक
ग्राहक क्रमांक – २३६५८९५२
पत्ता – फ्लॅट क्रमांक ३०४,
त्रिदल सोसायटी, श्रेय नगर,
औरंगाबाद – ४३११०२.
दुरध्वनी क्रमांक – २२२४३६.
भ्रमणध्वनी – ९५२४३०३४३

प्रति,

माननीय व्यवस्थापक
भारत गॅस एजन्सी,
श्रेया नगर शाखा,
औरंगाबाद, महाराष्ट्र.

विषय : भारत गॅस एजन्सी मधून एच पी गॅस एजन्सी मध्ये ट्रान्सफर करणे बाबत.

महोदय,

माझे नाव श्री. रमाकांत वि. पाठक असे आहे आणि गेल्या २० वर्षांपासून मी भारत गॅस एजन्सी चा एक नियमित ग्राहक आहे. माझा ग्राहक क्रमांक – २३६५८९५२ असून राहणार फ्लॅट क्रमांक ३०४, त्रिदल सोसायटी, श्रेय नगर, औरंगाबाद ४३११०२. तरी वरील विषयी मी आपणास विनंती करी इच्छितो कि मला भारत गॅस एजन्सी मधून एच. पी. गॅस एजन्सी मध्ये सदस्यत्व ट्रान्सफर करून द्यावे आणि इथुन पुढे मला मिळणारे गॅस कनेक्शन आणि सिलेंडर हे एच पी गॅस एजन्सी अंतर्गत मिळावे अशी विनंती.

मी गेली कित्तेक वर्षे भारत गॅस एजन्सी मार्फत सिलेंडर घेत आहे परंतु गेल्या काही काळापासून आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांपासून मी समाधानी नाही, वारंवार विनंती करून देखील मला घरपोच गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागत आहे याचा मला खेद आहे. घरपोच गॅस सिलेंडर मिळावे यासाठी मी आजवर अनेकदा विनंती अर्ज केलेला आहे तरीदेखील त्या दृष्टीने एजन्सी कडून मला आजपर्यंत काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मी एक जेष्ठ नागरिक व्यक्ती आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये असे कुणीही नाही जे एजन्सी मध्ये येऊन गॅस सिलेंडर घेऊन जातील त्यामुळे नेहमी मलाच यावे लागते आणि माझ्या घरापासून एजन्सीचे अंतर काहीसे जास्त आहे. ज्यामुळे मला अत्यंत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण होत आहेत, जे वाढत्या वयामुळे मी आता अजून सहन करू शकत नाही. एच पी गॅस एजन्सी मधील व्यवस्थापकांनी मला घरपोच गॅस सिलेंडर मिळेल या बद्दलची शाश्वती दिलेली आहे, ज्यामुळे माझे पूर्ण कष्ट कमी होतील.

म्हणून मी आता गॅस कनेक्शन बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी ऑनलाइन फॉर्म देखील भरलेला आहे त्याची एक प्रत मी सोबत जोडलेली आहे. तसेच या ट्रान्सफर साठी लागणारे सर्व कागतपत्रे जसे ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा इत्यादी. देखील त्यासोबत जोडलेली आहेत. माझ्याकडून लागणारी सर्व मदत एजन्सीला करण्यास मी तयार आहे आणि माझ्याकडे असणारे भारत गॅस एजन्सीचे सिलेंडर आणि पासबुक मी लवकरच जमा करेन असे आश्वासन देतो. तरी लवकरात लवकर माझी विनंती मान्य करून माझा अर्ज मंजूर करावा अशी विनंती.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आपला विश्वासू ग्राहक,
श्री. रमाकांत वि. पाठक

Application Letter in Marathi / Few Lines

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *