Skip to content

MSEB Letter Format in Marathi | Light Bill Complaint Letter Application

MSEB Letter Patra

MSEB Complaint Letter in Marathi

Application to Maharashtra State Electricity Board (MSEB)

श्री रामचंद्र दशरथराव रघुवंशी
ग्राहक क्रमांक – ४५४५३२
पत्ता – फ्लॅट क्रमांक ४२७
नभांगण सोसायटी,
मोरवाडी, पुणे – ४३२५७८
दूरध्वनी – ०२०-१२३४५६
मोबाईल – ९८९८१९८१९८
१८.०३.२०२०

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड।
पुणे विभाग.

विषय- अतिरिक्त शुल्क आकारल्याबद्दल तक्रार करणेबाबत

महोदय,

वरील विषयी विनंती अर्ज करतो कि गेले कित्येक दिवस मी आपल्या तक्रार विभागात मला माझ्या वापराच्या व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क स्वीकारल्याची तक्रार केली आहे, परंतु आजपर्यंत माझ्या तक्रारीचे निवारण करण्यात आलेले नाही.

मी या पत्राद्वारे पुनःश्च एकदा आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो कि, मी श्री. रामचंद्र दशरथराव रघुवंशी, ग्राहक क्रमांक – ४५४५३२, राहणार- फ्लॅट क्रमांक ४२७, नभांगण सोसायटी, मोरवाडी पुणे येथील रहिवासी असून मागील ३० वर्षांपासून मी येथे राहत आहे. मला मार्च २०२० मध्ये वीज बिल ३००० रुपये देण्यात आलेले आहे, तसेच महिन्याचा वीज वापर ३०० युनिट दाखवण्यात आलेला आहे जो कि मी तपासला असता प्रत्यक्षात ९० युनिटच आहे. आमचा घरगुती वीज वापर देखील अत्यंत कमी आहे, वीज वाचवण्यात आम्ही विश्वास ठेवतो.

याआधी मला सरासरी दरमहा १००० रुपये वीजबिल येत असताना या महिन्यामध्ये कुठल्या कारणास्तव मला हे अवाजवी शुल्क आकारण्यात आले हे स्पष्ट करावे. आजपर्यंत असे कधीही झालेले नाही म्हणून मी आश्चर्यचकित आहे आणि मला याबद्दल अतिशय नवल वाटत आहे कि बिलामध्ये एवढा फरक कसा येऊ शकतो.

सदरील अधिकचे शुल्क आकारल्या बद्दलची तक्रार मी याआधी आपल्या खालील पातळीवर नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु मला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही :

१) आपला निःशुल्क ग्राहक तक्रार निवारण क्रमांक १२३४ वर सर्वप्रथम तक्रार केली ज्यावर काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
२) आपले ऑनलाईन पोर्टल यावर आपल्या तक्रारी या लिंकवर जाऊन तक्रार नोंदवली तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही.
३) आपले माझ्या परिसरातील स्थानिक कार्यालय येथे लेखा विभाग येथे तक्रार केली परंतु संबंधित कामगाराला पाठवून विजेचे वापर केलेले युनिट पुन्हा तपासले जातील असे सांगण्यात आले, परंतु आजतागायत आपल्या संस्थेचे कुणीही घराकडे फिरकले नाही.
४) याच कार्यालयाच्या प्रमुख अभियंत्याला मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही उलट थातुर मातुर उत्तरे देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

तरी मी आपणास शेवटची विनंती करतो कि कृपया माझे वीजबिल सुधारित करून द्यावे व लावलेले अतिरिक्त शुल्क कमी करावे. अन्यथा कुठल्या कारणास्तव मला हे अतिरिक्त शुल्क लावण्यात आलेले आहे हे स्पष्ट करावे. वरील सर्व ठिकाणी तक्रार करताना मला कुठेही अतिरिक्त शुल्क लावण्याचे कारण कुठल्याही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले नाही अथवा खरेतर कारण नसल्यानेच ते सांगू शकले नाहीत.

माझ्या याही पत्राला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास माझ्याकडे ग्राहक सेवा मंचाकडे एम. एस. इ. बी. ची तक्रार करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक राहणार याची नोंद घ्यावी, आणि निश्चितच तिथे तक्रार करताना मला आतापर्यंत मिळालेल्या मानसिक त्रासाचा हिशोबही आपणास द्यावा लागेल.

योग्य उत्तराची आणि तक्रार निवारणाची आशा करतो.

आपलाच विश्वासू ग्राहक,
श्री रामचंद्र दशरथराव रघुवंशी

( पत्रासोबत मला देण्यात आलेले मार्च चे अतिरिक्त शुल्क असलेले बिल आणि गेल्या ६ महिण्यातील मी भरलेल्या बिलांची देयके जोडत आहे.)

Application Letter in Marathi / Few Lines

1 thought on “MSEB Letter Format in Marathi | Light Bill Complaint Letter Application”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *