Skip to content
Home » Tips Information in Marathi » Bongo Drums Information in Marathi | बोंगो ड्रम माहिती

Bongo Drums Information in Marathi | बोंगो ड्रम माहिती

Bongo Drums Images

Bongo Drum Information in Marathi

बोंगो ड्रम माहिती

परिचय / Introduction :

  • माणसाने आपल्या मनोरंजनासाठी संगीताची निर्मिती केली, अगदी अनादी अनंत काळापासून माणूस हा संगीत ऐकत आला आहे व निर्माण पण करत आला आहे. त्यासाठी कधी तो आवाजाची मदत घेत असतो तर कधी वाद्यांची. आवाज किंवा वाद्य यांच्या मदतीने निरनिराळे ताल, लय निर्माण करून त्याचा आनंद घेत असतो.
  • संगीत निर्मिती मध्ये अनेक वाद्यांचा वापर केला जातो, जसे बासरी, संतूर, जलतरंग, ढोल, ताशा, अगदी मातीची मटकी वाजवूनसुद्धा संगीत निर्मिति होत असते.
  • अशा विविध प्रकारच्या वाद्यांपैकी आज आपण बोंगो ड्रम आणि इलेक्ट्रॉनिक ड्रम अशा २ ड्रमची रचना आणि माहिती बघणार आहोत. हे ड्रम कुठे तरी आपल्या ढोल सोबत साधर्म्य ठेवतात असे वाटते. आतून पोकळ रचना आणि त्याच्या तोंडावरती अतिशय ताणून असे बसवलेले चामड्याचे आवरण अशी ढोलाची रचना असते आणि कुठेतरी ड्रम्स देखील अशीच रचना असलेले असतात. संपूर्ण जगामध्ये ड्रमचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत आणि जवळपास संपूर्ण जगभरात ड्रम हे वाद्य वापरले जाते.

इतिहास / History :

  • आपण टीव्ही वरील काही गाण्यांमध्ये हे वाद्य नक्कीच बघितलेले असेल, एखाद्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर हे वाद्य वाजवून काही आफ्रिकन किंवा अमेरिकन माणसं गात असतात आणि नृत्य करत असतात.
  • मधुर निर्मिती करणारे हे वाद्य आहे आणि जागतिक आधुनिक संगीतामध्ये या वाद्याने आपले स्थान निर्माण केलेलं आहे.
  • बोटानी विशिष्ट असा लय धरून यामधून संगीत निर्मिती केली जाते. असे असले तरी याची रचना नेमकी कधी झाली हे सांगणे जरा कठीण आहे.
  • सुरवातीला एक लोककला म्ह्णून वाजवला जाणारा हा बोंगो ड्रम नंतर सिनेमांच्या गाण्यासाठी म्हणून सुद्धा वापरला जाऊ लागला, हिंदी सिनेमा दिल-से मधील टायटल ट्रॅक “दिलसे रे” मध्ये तुम्ही या वाद्याचा अनुभव घेऊ शकता. बोंगो ड्रम वाजवणाऱ्या वादकाला “बोंगोसेरो” म्हणून ओळखले जाते.

वर्णन / Description :

  • बोंगो ड्रम मध्ये दोन लहान आकाराच्या ड्रमची जोडी असते जे एकमेकांना जोडलेले असतात. हे दोन्ही ड्रम सामान किंवा लहान मोठ्या आकाराचे असू शकतात. साधारणपणे २० सेंटीमीटर उंची आणि २५ सेंटीमीटर व्यास असणारे हे ड्रम असतात.
  • यांचा साचा हा पोकळ लाकडापासून बनवलेला असतो ज्याचे तोंड चामड्याने ताणून बंद केले जाते. या दोन्ही ड्रमला जोडून ठेवणारी एक लोखंडी फ्रेम असते. जर लहान मोठे असे ड्रम असणारी रचना असेल तर त्याला नर आणि मादी असे म्हंटले जाते. म्हणजे आकाराने मोठ्या असणाऱ्या ड्रमला नर तर आकाराने लहान असणाऱ्या ड्रमला मादी म्हणून संबोधले जाते.

Information about Bongo Drums in Marathi – Wikipedia Language

Lessons : Learn Bongo Drums Notations & Notes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *