Home » Tips Information in Marathi » Dholak Information in Marathi, Musical Instrument Dholak

Dholak Information in Marathi, Musical Instrument Dholak

information about dholak in marathi

Dholak Information in Marathi

Indian Musical Instruments Dholki Info – ढोलक माहिती

 • सुमारे इसवी सन १३०० पासून dholak अस्तित्वात आहे. ढोलक हे एक भारतीय चार्म-वाद्य आहे. ढोलक हे हातांनी किंवा काठीने वाजवले जातात. ढोलक वाजवताना हातांच्या बोटांचा जास्त उपयोग होतो. भक्ती संगीतात ताल देण्यासाठी ढोलकचा उपयोग करतात. होळी सणाच्या संगीतातही ढोलकचा प्रामुख्याने उपयोग होतो. ढोल व ढोलकी हेही ढोलकचेच प्रकार आहेत.
 • ढोलक आंबा, साग, शिसम, निम इत्यादी झाडांच्या लाकडापासून बनवली जाते. लाकडात दोन्ही बाजूंनी पोकळी करून त्याच्या तोंडावर बकऱ्याची चामडी लावतात व ती दोरांनी कसून बांधतात. ढोलकाच्या दोरात छल्ले असतात जे ढोलकात स्वर मिळवण्यासाठी वापरतात. मोठया ढोलकांच्या बांधणीसाठी म्हैशीच्या चामडीचा उपयोग केला जातो. ढोलकाच्या बांधणीसाठी बांबूचाही वापर करतात. ढोलकाची लांबी १६ इंच असते. त्याची डावी बाजु ८ इंच आणि उजवी बाजु ६ इंच असते.
 • ढोलक हे नृत्यातील, संगीतातील प्रमुख तालवाद्य आहे. कव्वाली, कीर्तन, लावणी आणि भांगडा नृत्य इत्यादीत ढोलक प्रामुख्याने वापरतात. शास्त्रीय नृत्यातही याचा वापर केला जातो. ढोलक हे दोर बांधून गळ्यात घालूनही वाजवता येते.
 • उत्तर भारतात ढोलक हे वाद्य मोठया प्रमाणात वापरले जाते. मोठया ढोलकांना ढोल म्हणतात तर लहान आकाराच्या ढोलकांना ढोलकी असे म्हणतात. ढोलकी ही अरुंद असते तिच्यावर तबल्यासारखी शाही लावलेली असते. ढोलकी वाजवण्यासाठी हाताचा आणि बोटांचा वापर होतो. तमाशातील नृत्यात ढोलकी हे वाद्य गरजेचे असते.
 • ढोल वाजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काठ्या वापरल्या जातात. ढोल हे ढोलकपेक्षा मोठे असतात.
 • भारतात लग्नसमारंभातील संगीत कार्यक्रमातील संगीतात ढोलकीचा करतात. ढोलकीवर चमच्याने वाजवून हा संगीताचा कार्यक्रम केला जातो.
 • पूर्वीच्या काळी ढोलक फक्त नृत्य आणि संगीतातच वापरत नसत तर दुश्मनांवर हल्ला करण्यासाठी, भयानक जनावरांना घालवण्यासाठी ढोलकचा वापर करत. ताकीद देण्यासाठीही त्याचा वापर करत.
 • ढोलक शिकण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. ढोलक शिकण्याची विशिष्ट पद्धत असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ढोलक वाजवले जाते. ढोलक वाजवण्यात अनेक घराणी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक घराण्याची ढोलक वाजवण्याची पद्धत वेगवेगळी असते. देवांच्या उत्सवातही ढोलक, ढोल वाजवले जातात.
 • वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ढोलपथके आढळून येतात. गणेशोत्सवात लोक मोठया प्रमाणावर ढोल वाजवून आनंदात उत्सव साजरा करतात. सध्या नाशिक ढोल हे संगीत अतिशय प्रसिद्ध आहे.
 • आदिवासी समाजातही नृत्यात, संगीतात ढोलक वापर केला जातो.
 • ढोलकामुळे संगीताला, नृत्याला तालबद्धता येते. ढोलक वाद्यावर सिनेमाची निर्मितीही झाली आहे.
 • आजकाल बाजारात प्लास्टिकचे ढोलकही उपलब्ध झाले आहेत.

Information about Dholak in Marathi – Wikipedia Language

1 thought on “Dholak Information in Marathi, Musical Instrument Dholak”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *