Skip to content
Home » Tips Information in Marathi » Piano Information in Marathi, Piano Notes, Music Lesson

Piano Information in Marathi, Piano Notes, Music Lesson

Piano Marathi Mahiti Notes

Piano Information in Marathi

पियानो माहिती

पियानो – सिनेमातील एक सर्वात लाडके वाद्य

  • मोझार्ट, बीथोवेन इत्यादी कलाकारांची ‘सिम्फनी’ ऐकली की स्वर्गीय आनंद मिळतो. त्यांची कॅसेट ऐकली तरी मन एका नी:शब्द सुरांच्या अथांग सागरात प्रवेश करते. ह्या आंतरराष्ट्रीय कलाकारानी पियानोला एका महत्वाच्या वाद्याचा दर्जा दिला आहे. 1960 – 80 च्या सुमारास आपल्या हिंदी बॉलीवूड सिनेमाचे पियानो हे एक महत्वाचे पात्र होते.
  • कसेही करून ओढूनताणून प्रसंग निर्माण केला जायचा आणि नायक किंवा नायिका पियानोसमोर बसून दर्दभरे किंवा रोमांटिक गीत गायचे.
  • संगम चित्रपटात “दोस्त दोस्त ना रहा” ह्या गाण्यात राज कपूरने पियानोचा सुंदर उपयोग करून घेतला. आणि ते गाणे अजरामर झाले. वक्त, गुमराह, राम और श्याम,संगम, मेरे सनम, मेरी जंग अशा अनेक सिनेमांमध्ये ह्याच्या सुरांचा सुंदर उपयोग केला गेला आहे. आनंद मधील “मैने तेरे लिये हि सात रंग के सापाने चुने हे गीत आजही लोक गुणगुणतात.
  • श्रीमंत घरांचा दिवाणखाना पियानोने सजलेला असायचा. आपल्याकडे हार्मोनियमचे जे संगीतात स्थान आहे तेच युरोपात पियानोला आहे.

इतिहास / History :

  • पियानो हे एक तंतुवाद्य असून दोन्ही हातांनी आणि पेडलने वाजविता येते.
  • पियानोचा जन्म ब्रिटनचा. सगळ्या शोधांची जननी असलेल्या ब्रिटनमध्ये ह्या वाद्यात खूप स्थित्यंतरे होत गेली. आणि खूप प्रकार पण जन्माला आले. त्याचीच माहिती घेऊया.
  • पियानोचा शोध बर्तोलोमिओ क्रिस्तोफोरी (Bartolomeo Cristofori) ह्याने सतराव्या शतकात लावला. नक्की कधी ते अज्ञात आहे. ह्याच्या आधी ‘हर्प्सीकोर्ड’ नावाचे असेच वाद्य होते पण त्याच्यात आवाजाचे फरक होत नव्हते.
  • ह्या पियानोमध्ये छोट्या तरफा सारख्या की होत्या आणि त्यावर आघात करून त्या वाजविल्या जायच्या. त्यामुळे ह्याला फोर्ते-पियानो किंवा पियानो फोर्ते असे नाव पडले. त्याचा अर्थ पियानो म्हणजे सॉफ्ट म्हणजे मृदु आणि फोर्ट म्हणजे उच्च स्वर असा होता.
  • जितके जोरात कीज वर आघात कराल तितक्या जोरात आतील तारांवर आघात होऊन अधिक जोरात आवाज यायचा.

पियानोची यंत्रणा कशी चालते / How it works :

  • आपल्याला मधुर स्वर देण्यास पियानो मध्ये ‘की (key)’ असतात ज्याला आपण हार्मोनियममध्ये ‘स्वर’ म्हणतो. एका रांगेत ८८ काळे आणि पांढरे स्वर म्हणजे कीज (keys) असतात.
  • त्यापैकी ५२ पांढरे मोठ्या आकाराचे आणि ३६ काळे, लहान आकाराचे पांढरे कीज वर असतात.काळे सूर एबोनी लाकडाचे आणि पांढऱ्या सुरांवर हस्तिदंताचे आवरण असते. यामाहाने हस्तिदंती सारख्या दिसणाऱ्या प्लास्टिक चे सूर शोधले आहेत. हल्ली तेच वापरतात.
  • ही आपल्या पेटीसारखीच रचना आहे. असे ८८ वेगवेगळे स्वर वाजवता येतात. की म्हणजे सूर दाबल्यावर आवाज येतो आणि सोडल्यावर थांबतो. त्यामुळे ह्या वाद्याला तंतुवाद्य म्हणण्यापेक्षा थाप किवा आघात वाद्य म्हणतात.
  • हे सूर ८/८ च्या संचात असतात.कांही जुन्या पियानोंना ८५ तर हल्लीच्या कांही पियानोंना ९७ ते १०७ की असतात. त्या सुरांच्या रेझोनन्स साठी असतात. पण त्या पृष्ठभागावर नसून दडवलेल्या असतात. Toy पियानोला ४४ ते ४९ सूर/की असतात.
  • इमनुअल मूर ह्याने डबल कीबोर्ड शोधला ह्याने एका हाताने दोन कीबोर्ड वापरले जाऊन संगीत सहज निर्माण करता येते.थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर टोम आणि जेरी मधील जेरी एका कॉन्सर्ट मध्ये पियानोच्या आत जातो आणि टोम मुद्दाम पियानो वाजवतो हा एपिसोड बघा म्हणजे तंतोतंत कल्पना येईल.
  • पियानो हि एक लाकडी फ्रेमची पेटी असते.त्यामध्ये १२००० भाग असतात. बाहेरची फ्रेम हार्डवूड ची असते आणि कांही पियानो मध्ये ती दोन बाजूने वाकलेल्या प्लायवूडची असते.
  • पिनब्लॉक मउ लाकडाची असते. त्यावर धातूची फ्रेम असते. ती आता कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टीलची असते. बाहेरची फ्रेम लॅमिनेट केलेली असते. त्यात रसिकांना आवडेल अशी शोभा आणतात. विंटेज पियानो सुंदर कलाकुसरींनी नटलेले असतात.
  • कांही पियानोंवर कव्हर किंवा फॉल बोर्ड असते.ते सुरांना म्हणजे कीज ना झाकून ठेवण्यात वापरत येते. सुरांना हॅमर जोडलेले असते.ते तारांवर आघात करून सूर निर्माण करतात.
  • ते लाकडाचे असून त्याला एक प्रकारच्या लोकरीने [फेल्ट] घट्ट आवरण केले असते. त्याच्यापुढे तारा असतात. की /सूर दाबल्यानंतर हॅमर तारांवर आघात करतो आणि सूर ऐकायला येतो.
  • फ्रेम मध्ये सुरांना पेडल जोडलेले असतात. ते ३ किंवा ४ असतात. त्यावर पाय ठेवला की जो सूर पकडलेला असतो तो तसाच चालू राहून दुसरा सूर वाजवता येतो.
  • त्याला सस्तेन पेडल म्हणतात. तसेच तारांना डम्पर नावाचे कापडी किंवा लोकरीचे भाग जोडले असतात. ते सुरांवरचे बोट उचलल्यावर तरंग [व्हायब्रेशन]थांबवून सूर थांबवतात. पियानोंचे वजन ३०० ते १००० पौंड असते. आणि उंची ११० से.मी. ते १३५ से.मी. असते.

पियानोंचे प्रकार / Types of Piano :

  • ग्रांड पियानो:- हा क्लासिकल, सोलो, किंवा आर्ट तसेच जाझ रॉक ह्या संगीतात वापरतात. तो २.२ मीटर उंच असतो. कांही पियानो शिकवणी वर्गात,लहान समारंभात वापरतात. ह्यामध्ये ओक्टेव्ह [आठ सुरांचा संच] व्यवस्थित ताणून बसविलेले असल्याने सुगम संगीत ऐकू येते आणि सुरांचा गोंगाट किंवा विसंगती होत नाही.
  • अपराईट पियानो:- हा घरगुती पियानो म्हणून पण ओळखला जातो. बऱ्याच श्रीमंत लोकांकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून हा ठेवला जातो ह्याची उंची १०७ ते ११४ से.मी. असते. हा घरी, शाळांमध्ये, चर्चेस मध्ये,किंवा सरावासाठी वापरला जातो.
  • बाकी प्रकार असे:-, TOY पियानो, स्निपेट पियानो, मिडीयम ग्रांड पियानो, पार्लर ग्रांड पियानो, स्टुडीओ ग्रांड पियानो, मिनी पियानो आणि कॉन्सर्ट ग्रांड पियानो. कांही सायलेंट पियानो पण असतात. ते वाजवता येतात पण बाकीच्यांना डिस्टर्ब करीत नाही.
  • जसे जसे शोध लागत गेले तसे पियानो मध्ये पण मशीन आले. कांही इलेक्ट्रिकल, काही इलेक्ट्रॉनिक आणि कांही डिजिटल पियानो शोधले गेले. ह्यात मुख्य भाग, मॅग्नेटिक पिक अप, ऍम्प्लिफायर आणि लाउड स्पीकर हे आहेत.
  • हे पॉप आणि रॉक संगीतात जास्त लोकप्रिय झाले. कारण ते इलेक्ट्रिक गिटार सारखे होते. तसेच इलेक्ट्रोनिक पियानो हा सिंथेसायझर म्हणून जास्त लोकप्रिय झाला. डिजिटल पियानो मध्ये डिजिटल नमुने वापरून सूर काढतात. पियानोचा दर्जा सुरांच्या संगती/विसंगातीवरून ठरवतात. विसंगती हि हर्मोनिक ओव्हरटोनच्या फ्रिक्वेन्सीच्या डिग्रीने ओळखली जाते.हि पियानोच्या तारांच्या. कडकपणामुळे येते.
  • हायब्रीड पियानो: काही इलेक्ट्रोनिक पियानो अपराईट किंवा ग्रांड पियानो MIDI फिचरने जोडून हायब्रीड पियानो तयार करतात. Midi [Musical Instrument Digital Interface ] हे एक टेक्निकल स्टॅंडर्ड असते जे इलेक्ट्रोनिक म्युझिकल साधनांना, कॉम्प्यूटर आणि तत्सम श्राव्य साधनांना जोडणारे संवाद प्रोटोकॉल ,डिजिटल इंटरफेस आणि इलेक्ट्रिकल जोडणी ह्या बाबत सांगतात. एक midi १६ माहितीच्या चॅनेल वेगवेगळ्या साधनांना पुरविते.

संगीत कसे येते / Music Creation :

  • सुरांवर दाब दिला की आवाजाची एक साखळी प्रक्रिया तयार होते. प्रथम सूर किंवा की हॅमर रोलर वर जॅक आपटतो.
  • हॅमर रोलर हॅमर ची तरफ उचलतो. की मुळे डम्पर पण उचलला जातो. आणि हॅमरने तारांवर आघात केला की डम्पर मागे जातात.त्यामुळे तर स्पंदन पावून आवाज येतो. की वरचे बोट उचलल्याबरोबर डम्पर पुढे येतात आणि तारा स्पंदन पावण्याचे थांबतात.तारांचा आवाज मोठा नसतो पण ते सूर मोठ्या साउंडबोर्डवरून फिरतात आणि उर्जेचे आवाजात रुपांतर होते.
  • मधल्या पुलाचा वाकडा आकार असल्याने साउंडबोर्ड जोरात स्पंदन पावतो.आवाजाची तीव्रता तीन गोष्टींवर अवलंबून असते.
  • तारांची लांबी: जितकी कमी तितका आवाज तीव्र.
  • तारांची जाडी: जितकी बारीक तितका आवाज तीव्र.
  • तारांचा ताण :- जितका जास्त तितका आवाज तीव्र.

पियानो उत्तम वाजविणारे कलाकार / Piano Artists :

  • पियानो उत्तम वाजविणारे कलाकार म्हणजे मोझार्ट, बीथोवेन,हेडन आणि आत्ताचे जेरी ली लेविस, लिटल रिचर्ड, केथ इमर्सन, एल्तोन जॉन, बेन फोल्ड, बिली जोएल, निकी होप्किंस, आणि तोरी अमोस.
  • पियानो वाजविण्यास अवघड आहे पण बहुतांश संगीतकारांना पियानो येते आणि संगीतबद्ध करता येते. पियानो शोभेसाठी पण ठेवतात.
  • व्हाईट हाउस मध्ये पण पियानो दर्शनी भागात ठेवला आहे. चांगल्या पियानोच्या कंपन्या म्हणजे, यामाहा, रॉक जम, कोरग, कॅसीओ आणि आलेसीस मेलडी.
  • ब्रिटीशांचे अनुकरण करतांना आपण त्यांच्या संगीताचे पण अनुकरण केले आणि हार्मोनियम जाऊन तिची जागा पियानोने घेतली. तरीही सैगल, बर्मनदा, किशोर कुमार, आर.डी. आणि सी.रामचंद्र ह्यांना हर्मोनियमच प्रिय होती.

Information about Piano in Marathi – Wikipedia Language

Lessons : Learn Piano Notations & Notes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *