Electronic Drum Images

Electronic Drum Information in Marathi | इलेक्ट्रॉनिक ड्रम माहिती

Electronic Drum Information in Marathi

इलेक्ट्रॉनिक ड्रम माहिती

इतिहास / History :

  • पॉप आणि रॉकच्या जमान्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ड्रम एक अत्यंत महत्वाचे असे आधुनिक वाद्य आहे. त्याला ड्रम सेट, ट्रॅप सेट किंवा इलेक्ट्रॉनिक ड्रम असे देखील म्हटले जाते.
  • यामध्ये अनेक ड्रमचा संच असतो जो एका विशिष्ट प्रकारच्या स्टॅन्डवरती सजवलेला असतो. या सेट मध्ये अत्यंत आधुनिक अशा सुविधा दिल्या गेलेल्या असतात. ड्रम, तबकडी, ड्रम पॅड, सेन्सर्स असे सुसज्ज असा हा सेट आहे. यामध्ये आपण आपल्या ट्यून्स रेकॉर्ड करू शकता, इलेक्ट्रिक कनेक्शन करून सिंथेसायजरचा वापर देखील यामध्ये करू शकतो.
  • ड्रम वाजवणाऱ्या व्यक्तीला ड्रमर असे म्हटले जाते. अनेक हॉलिवूड बॉलीवूड सिनेमांमध्ये आपण या वाद्याला बघितलेले असेल – “रॉक ऑन,” “ऑल द बेस्ट” अशा सिनेमामध्ये तुम्ही हे वाद्य बघू शकता.
  • भारतीय संगीतामध्ये याचा वापर कमी आहे पण पाश्चात्य संगीतामध्ये याचा जास्त वापर केला जातो. तरी देखील भारतीय तरुणांमध्ये या वाद्याबद्दल अत्यंत आकर्षण बघावयास मिळत आहे आणि सर्वाना हे वाद्य शिकण्याची आशा असते.
  • परंतु हे वाद्य वाजवण्यासाठी संगीताची गोडी आणि त्यासाठी लागणारे कौशल्य अतिशय महत्वाचे आहे. हे वाद्य वाजवण्यासाठी मनाची एकाग्रता आणि संगीतावर प्रेम अतिशय गरजेचे आहे तेव्हाच आपण हा संपूर्ण सेट अतिशय उत्तम पद्धतीने वाजवू शकतो.

वर्णन / Description :

  • अनेक ड्रमचा आणि पॅडचा समावेश असणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक ड्रम सेटमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतात. हे ड्रम वाजवण्यासाठी ड्रमर काड्यांचा किंवा हाताचा आणि पायाचा देखील वापर करू शकतो.
  • ड्रम पॅड हे एखाद्या डिस्क सारखे असतात किंवा कमी खोलीचे गोलाकार असतात जे सिलिकॉन किंवा तत्सम मटेरियल पासून बनवलेले असतात. हे ड्रम पॅड गोल, चौकोन किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही आकारामध्ये उपलब्ध असतात, विविध रंग देखील उपलब्ध असतात.
  • इलेक्ट्रिकल झान्ज देखील या संचामध्ये दिलेली असते जिला एखाद्या काठीच्या साहाय्याने वाजवले जाते. सर्व संचामध्ये सेन्सर जोडले गेलेले असतात जे विद्युत कंपनी निर्माण करतात. हा संपूर्ण सेट विदुत उपकरणाला जोडला गेलेला असतो जसे सिंथेसायझर किंवा स्पीकर. म्हणूनच मोठ्या मोठ्या संगीत कॉन्सर्ट मध्ये या ड्रमचा वापर केला जातो.
  • इलेक्ट्रॉनिक ड्रमचे संपूर्ण स्टॅन्ड हे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असते. हा बँड सेट वाजवण्यासाठी सोपे जावे यासाठी या स्टॅण्डमध्येच स्टूलची देखील रचना केलेली असते त्याला सिंहासन असे देखील म्हटले जाते. यामुळे ड्रमरला हा सेट वाजवण्यासाठी अत्यंत सुलभता येते.
  • ड्रम वाजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काड्याना ड्रमस्टिक असे म्हटले जाते, ड्रम वाजवण्यासाठी या ड्रमस्टिक योग्य पद्धतीने पकडणे गरजेचे असते. ज्यामुळे हवी असलेली ताल मिळणे सोपे जाते आणि संपूर्ण ड्रम सेट वापरणे सोपे होते.

वर्गीकरण / Classification :

  • साधारणपणे या पूर्ण किटचे ४ प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते.
    १. ब्रेककेबल – ज्यामध्ये स्टूल किंवा सिंहासन, झाँज, ड्रम यांचा समावेश होतो.
    २. शेल्स – बास ड्रम आणि टॉमस.
    ३. एक्सटेंशन – ज्यामध्ये काही अधिक जोडलेल्या गोष्टींचा समावेश होतो ज्या मूळ सेंटचा भाग नाहीत.
    ४. हार्डवेअर – यामध्ये ड्रम स्टॅन्ड, पेडल यांचा समावेश आहे.

Information about Electronic Drum in Marathi – Wikipedia Language

Lessons : Learn Electronic Drum Notations & Notes in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *