Skip to content
Home » Tips Information in Marathi » Crab Information in Marathi Language | खेकडा माहिती

Crab Information in Marathi Language | खेकडा माहिती

Crab Mahiti Marathi

Crab Information in Marathi

खेकडा – निसर्गाचे एक आश्चर्य

तुम्ही कधी समुद्र किनारी गेला आहात का? तुम्हाला एक विचित्र प्राणी दिसला असेल जो ….वाळूवर, दगडांच्या खाचखळग्यांमध्ये बसलेला असतो. दहा पायाचा आहे पण आडवा चालतो आणि ज्याला काटेरी कडक कवच असते, कात्रीसारख्या नांग्या असतात. लाट आली की तो पटकन पाण्याखाली जातो व जमिनीवरपण सहज फिरतो. त्याला बोली भाषेत “खेकडा” म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव आहे “ब्रॅकीयुरा”! खेकडा हा पाठीचा कणा नसलेल्या (इन्व्हर्टिब्रेट) प्राण्यांच्या जातीच्या क्रस्टेशिअन फॅमिलीमधील प्राणी आहे.

खेकडा माहिती :

  • खेकड्याच्या जवळजवळ ४५०० रंगीबेरंगी प्रजाती आहेत. रंगाचा उपयोग आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते होण्यासाठी होतो जेणेकरून त्यांचा समुद्री प्राण्यांपासून, पक्षी, तसेच माशांपासून बचाव होतो.
  • काही प्रजाती कळपामध्ये राहतात तर काही एकट्या असतात. समुद्रकिनाऱ्यावर वाळूवर, दगडाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आयुष्य जगतो.
  • खेकडा कल्ल्याने श्वास घेतो म्हणून त्याला पाण्याच्या जवळ राहावे लागते.
  • त्याचे डोळे गोगलगायीसारखे दांडीसारखे असतात आणि तो वाकडा चालतो व पोहतो. खेकडे एकमेकांशी त्यांचे पाय आणि नांगी आपटून ड्रम किंवा टाळ्यासारखा आवाज करून संवाद साधतात.
  • खेकडे हे शाकाहारी तसेच मांसाहारी असतात. ते सूक्ष्म समुद्री वनस्पती शेवाळं किंवा समुद्री बारीक किडे वगैरे खाऊन जगतात.
  • खाण्यासाठी खेकडे भरतीची वाट पाहतात आणि मग त्यात पोहत अन्न खातात.
  • खेकडा साधारणपणे ३ ते ४ वर्षे जगतो.
  • खेकड्याचे काटेरी टणक कवच “काइटिन” या पदार्थाचे बनलेले असते आणि त्याच्या आत खेकड्याचे मुलायम अवयव झाकलेले असतात.
  • ह्या कवच व मुलायम अवयवांमध्ये खूप पौष्टिकत्व रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील लोकांचा खेकडा हा उपयुक्त स्वादिष्ट व पौष्टिक मांसाहार आहे.
  • कर्करोगाच्या उपचारात आहार म्हणून खेकडा उपयुक्त असतो.
  • तसेच खेकडा शेती हा समुद्रकिनाऱ्याजवळील लोकांचा एक प्रमुख व्यवसायपण आहे.

शास्त्रीय दृष्ट्या खेकड्याची रचना :

  • खेकड्याचे संपूर्ण शरीर टणक कवचाने झाकलेले असते ज्याला “एक्झोस्केलेटन” म्हणतात.
  • डोके व शरीर जुळलेले असते ज्याला “कॅरापेस” म्हणतात.
  • खेकड्याला सांधे व जोड असलेले ४ पायांचे जोड असतात जे चालण्यासाठी वापरले जातात.
  • पाचवी जोडी म्हणजे नांगी असते जी संरक्षणासाठी वापरली जाते.
  • खेकड्याचे तोंड म्हणजे एक किचकट संरचना असते ज्यामध्ये अनेक हलणारे भाग असतात.
  • अँटीनाचा वापर आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी केला जातो.

खेकड्याची जीवन साखळी:

  • नर-मादी खेकड्यांचे मिलन झाल्यानंतर मादी खेकडा अंडी टाकते. साधारणपणे १-३ कोटी अंडी टाकली जातात. ती अनेक दिवस आपल्या पोटामध्ये अंडी साठवून ठेवू शकते. बऱ्याच प्रजातींमध्ये दोन आठवडे पर्यंत मादी अंड्यांचे पोषण करते.
  • अंड्यांच्या पिवळ्या पुंजक्याचा रंग चॉकलेटी झाला की अंडे फुटायला सुरवात होते. अंड्याची पूर्ण वाढ झाल्यावर अळ्यांच्या रूपात मादी त्यांना पाण्यामध्ये सोडते. त्यांना झिया अळ्या म्हणतात. सहसा भरती-ओहोटीच्या वेळा बघून त्यांना पाण्यात सोडले जाते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्या अळ्या तरंगत फिरत राहतात व वाढतात. त्या छोटे समुद्रीकिडे व वनस्पती खातात.
  • प्रत्येक प्रजातीच्या झिया अळ्यांच्या रूपाचा कालावधी निश्चित व वेगवेगळा असतो. ही अवस्था साधारणपणे ४० दिवसाची असते.
  • अळ्या ४ ते ५ वेळा कवच टाकतात व त्यांचे मोठ्या अळ्यांमध्ये सारखे रूपांतर होत असते. मोठ्या अळ्यांना मेगॅलोप म्हणतात व सर्वात शेवटी मेगॅलोपचे छोट्या खेकड्यात रूपांतर होते.
  • छोटे खेकडेसुद्धा अनेकवेळा कवच टाकतात, जोपर्यंत टणक कवच तयार होत नाही. जुने कवच टाकून नवीन कवच येईपर्यंत खेकडा अतिशय मुलायम असतो आणि तो कानाकोपऱ्यात लपून बसतो. नवीन कवच तयार करत तो वाढतो व सर्वात शेवटी पूर्ण मोठ्या प्रौढ खेकड्यात रूपांतर होते. ही अवस्था साधारणपणे १२ ते १८ महिन्यांची असते.
  • पूर्व अमेरिकेच्या किनाऱ्यावर अंगावर पट्ट्या असलेला खेकडा पाहायला मिळतो. तो किडे तसेच सूक्ष्म वनस्पतीसुद्धा खातो.
  • इंग्लंडच्या किनाऱ्यावर खाण्यायोग्य खेकडा पाण्याच्या पातळीपेक्षा १०० मीटर खाली आढळतो.
  • पॅसिफिक महासागरात दोन प्रकारचे खेकडे पाहायला मिळतात, तपकिरी व निळा खेकडा. हे खेकडे आपला रंग बदलून आपले संरक्षण करू शकतात.
  • अलास्का व उत्तर पॅसिफिक मध्ये रेड किंग क्रॅब (लाल मोठा खेकडा) आढळतो जे तेथील लोकांचा अन्नाचा एक प्रमुख पर्याय आहे.
  • काही खेकडे तर जमिनीवर राहणारे पण असतात. त्यापैकी काही प्रजननासाठी समुद्रात जातात. तर काही जात नाहीत.
  • कॅरिबियन देशात तर समुद्रात परत जाणाऱ्या खेकड्यांचा एक विशेष अनुभव असतो. हजारो-करोडो खेकडे संपूर्ण रस्ते, बागा, जंगले व्याप्त करून एखाद्या सैन्य तुकडीप्रमाणे समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात.
  • कोकोनट क्रॅब (नारळ खेकडा) हा एक प्रकारचा खेकडा मांजरीच्या आकाराएवढा असतो जो नारळसुद्धा खाऊ शकतो. म्हणून त्याचे तसे नाव.
  • खेकड्यांच्या विविधतेवर अजूनही संशोधन चालूच आहे.
  • खेकड्यांच्या विविध प्रकारांमुळे मानवाला ते एक आकर्षणच आहे. इतकं आकर्षण आहे की माणसाने एका राशिग्रह समूहाला “वृश्चिक” राशी नाव दिलं आहे.
  • ज्यामध्ये मानवाने खेकड्याची तुलना मनुष्य स्वभाव, वागणं, इ.साठी केली आहे. यापुढे जेव्हा तुम्ही खेकडे पाहाल तेव्हा त्यांना थोडा वेळ निरखून, त्यांच्या निरीक्षणाचा आनंद घ्यायला विसरू नका!

Information of Crab in Marathi / Crab Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *