Skip to content
Home » Tips Information in Marathi » Giraffe Information in Marathi | जिराफ माहिती

Giraffe Information in Marathi | जिराफ माहिती

Giraffe Info Essay Nibandh

Giraffe Information in Marathi

वन्य प्राणी : जिराफ माहिती

  • जगातील सर्वात उंच प्राणी आणि मोठ्या प्राण्यांपैकी एक असा हा प्राणी दक्षिण आफ्रिकेची शान आहे. आफ्रिकन सफारी मध्ये मसाई माराला गेल्यावर ह्या अजस्त्र प्राण्याला टोपी खाली पडे पर्यंत डोके वर करून पाहतो. त्याची ती लांबच लांब मान आणि तिची लयीत हालचाल आपण बघतच बसतो. हा टांझानियाचा राष्ट्रीय पशू आहे.
  • जिराफ हा सस्तन प्राणी वर्गात आणि जिराफ कॅमेलोपरडालीस ह्या कुळातील आहे. ऊंटासारखे शरीर आणि लेपर्ड म्हणजे चित्त्यासारखे शरीरावर पट्टे म्हणून हे नाव पडले. जिराफा सारखाच दूसरा प्राणी असतो, ओकापी नावाचा. पण त्याची मान इतकी लांब नसते.
  • जिराफाची मान 2 ते 2.4 मीटर इतकी लांब असते. त्याचे मणके प्रत्येकी 28 cm इतके लांब होतात. अर्थात जन्मल्याबरोबर इतकी लांब मान नसते. मान वयाबरोबर वाढत जाते. गम्मत म्हणजे ही मान फक्त उंचावरची पाने खाण्यासाठी नसून जिराफ तिचा उपयोग एकमेकांशी लढण्यासाठी करतात.
  • पूर्ण वाढलेला जिराफ 4.3 ते 5.7 मीटर एवढा असतो आणि त्याचे वजन 1200 किलोग्राम इतके असते. मादीचे वजन 828 किलोग्राम असते. जिराफाचे डोळे भोकरे, मोठे असतात. डोक्यावर दोन शिंगांसारखे पण मऊ अवयव असतात. त्यामुळे उष्णतेचे नियमन होते. त्याला औसीकोन म्हणतात.
  • जिराफ वाळू आणि मुंग्यापासून वाचण्यासाठी नाकपुड्या बंद करू शकते. त्याची जीभ 45 cm लांब असते. पुढचे दात नसतात. आणि वरच्या ओठांवर पातळ पडदा असतो त्यामुळे काटेरी झाडांचे काटे लागत नाही. वयस्कर जिराफाला कल्शियमचे टेंगुळ येते. जिराफ नारंगी, तपकिरी, काळसर रंगाचे आणि पांढऱ्या रेषांचे चौकोन असलेले कातडे असते. हे कातडे खूप जड असते आणि केसाळ असते त्यामुळे गवतातून पळताना खरचटले जात नाही. त्याला एक प्रकारचा वास असतो ज्यामुळे कीटकांपासून बचाव होतो.
  • जिराफ चाड देशापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत आणि निगर देशापासून सोमालिया पर्यन्त सापडतात. तरीही इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्सर्व्हेशन ऑफ नेचर ह्या संस्थेने जिराफ हा नामशेष होण्याची भीती असलेला प्राणी म्हणून घोषित केले आहे. जगामध्ये सध्या फक्त 97,500 जिराफ [2016 ची गणना] शिल्लक आहेत. रंगाप्रमाणे जिराफ आठ जातीचे आहेत. लाल ते तपकिरी आणि काळा हे रंग शिकारी प्राण्यांपासून लपण्यासाठी असतात. सामान्यत: बछडे गवतात लपून राहतात. जिराफ कळप करून राहतात. पिल्लांची काळजी मादी जिराफ घेते. जिराफांना सिंह, चिता, तरस आणि जंगली कुत्रे ह्यांची भीती असते. तथापि कळपामध्ये त्यांना हात लावण्याची कोणाची हिम्मत होत नाही. जिराफ धोका असेल तर खूप जोरात पळू शकतात. ताशी 60 किमी वेगाने इतके मोठे वजन ते पेलवू शकतात. त्यासाठी त्यांच्या एक फूट खूरांची त्यांना मदत होते तसेच पायातील दणकट लिगामेंट ते वजन पेलतात.
  • जिराफ शाकाहारी आहे. त्याचे आवडते झाड म्हणजे बाभळी. बाकी ते झाडांची पाने, फुले, फळे खाऊ शकतात. खाण्याची पद्धत इतर शाकाहारी प्राण्यांप्रमाणे असते. एकदम भरपूर गवत अर्धे चावून गिळून नंतर शांतपणे रवंथ करीत राहणे. एका वेळी जिराफ ३४ किलो पाला खाऊ शकतो.
  • जिराफ ह्या प्राण्याचे खूप उपयोग आहेत. मांस खाण्यासाठी, शेपटीचे केस ब्रेसलेट, नेकलेस, धागे, शील्ड्स, चपला, ड्रम इत्यादी. तसेच तंतुवाद्यांच्या तारा बनविण्यासाठी होतो. बुगांडा जमातीचे लोक कातडी जाळून त्याचा धूर, नाकातून रक्त वाहत असेल तर उपाय म्हणून करतात. यकृतापासून सुदान नावाचे पेय बनवितात.
  • जिराफ फक्त २५ वर्षे जगतो. जंगलात तर फक्त १५च वर्षे जगतो. पाडस बरेच वेळा १ वर्षाच्या आतच शिकारीमुळे किंवा इतर कारणांनी मरतात. त्यामुळे आता खरच ह्या प्राण्याला वाचविण्याची गरज आहे.

Essay Composition / Information about Giraffe in Marathi Language – Wikipedia

1 thought on “Giraffe Information in Marathi | जिराफ माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published.