Home » Tips Information in Marathi » Wolf Information in Marathi | Information About Wolf, Landga Mahiti

Wolf Information in Marathi | Information About Wolf, Landga Mahiti

wolf mahiti in marathi

Wolf Information in Marathi

वन्य प्राणी : लांडगा माहिती

  • प्राणी सृष्टीमधील खलनायक क्रूर प्राणी म्हणून ह्याची ओळख आहे. सगळे जण ह्याचा तिरस्कार करतात. गोष्टीत हा बकरे, कोंबड्या खातो असे लिहिले आहे. पण प्रत्यक्षात तसे नाही. हा प्राणी कधीही गरज नसताना शिकार करीत नाही.
  • लांडगा हा कॅनिडी कुळातील लुपूस जातीचा प्राणी आहे त्याचे प्राणी शास्त्रातील नाव आहे
  • कॅनिडी लुपूस हे आहे. करडे लांडगे जास्त प्रमाणात आढळतात. ते इथियापोवा, युक्रेन,क्रोशीया, बेला रूस, आणि रशिया, वाळवंटी प्रदेश, हिमाच्छादित प्रदेश, आर्क्टिक प्रदेश, उत्तर अमेरिका, कॅनडा, युरोप, आणि ऑस्ट्रेलिया [दिन्गो] ह्या भागांमध्ये आढळतो. तो -७० ते १२०F इतके तपमान सहन करू शकतो. त्याच्या तीन जाती आहेत, पांढरा, करडा आणि लाल. त्याचे वजन साधारण १३६ पौंड असते. आणि उंची १०५ ते १६० cm असते.
  • लांडगे मनुष्य वस्ती पासून दूर राहतात. ह्यांच्या कळपाला पेक असे म्हणतात. त्यात मुख्य एक नर व एक मादी असते. त्यांना अल्फा म्हणतात. बाकी लहान पिल्ले असतात. एका कुटुंबात ८ ते ९ सदस्य असतात. कधी कधी २० ते ३० पण असतात.

कुत्र्‍याशी साम्य :

  • लांडगे दिसायला जर्मन शेफर्ड कुत्र्‍या सारखे दिसतात. त्यांची हायब्रिड जात पण विकसित करून पाहीली आहे पण ते कुत्र्‍या सारखे काम करीत नाहीत. लांडगे पण त्यांची हद्द ठरवितात आणि तेथे दुसरे लांडगे येऊ देत नाहीत. हद्द ठरविणे कुत्र्‍या सारखेच एकतर मूत्र किंवा शौच ह्या तर्फे ठरवितात. एकमेकांना नाक घासून किंवा विव्हळून संदेश देतात. हा संदेश कधी शिकारीची सूचना किंवा धोक्याची सूचना असते.

शिकारीची पद्धत :

  • लांडगे उंदीर ते मोठा बैल काहीही खाऊ शकतात. त्यांचे जबडे खूप दणकट असतात. कितीही जाड कातडी असलेला प्राणी असो, ते त्याला फाडून खातात. हाडे तोडू शकतात. ते रानरेडा, बैल आणि ससे ह्यांच्यावर हल्ला चढवतात. त्यांची ऐकण्याची शक्ती वास घेण्याच्या शक्तीपेक्षा कमी असते. त्यामुळे ते झुडुपातील ससा पकडू शकत नाही. तसेच अति वेगवान प्राण्याला पकडू शकत नाही. ते १ ते २ किमी. पर्यंतच पाठलाग करू शकतात.
  • ते सगळे मिळून त्या प्राण्याला घेरतात आणि पाठी मागच्या बाजूने चावे घेतात. तेथे जखम झाली तर अति रक्तस्त्रावाने शिकार कोसळते आणि ते त्याचा फन्ना उडवतात. काही वेळा माने जवळील मोठ्या रोहिणीला चावे घेऊन भक्ष्याची शिकार करतात. शिकार झाल्यावर मुख्य नर आणि मादी प्रथम खातात आणि मग उरलेले मांस बाकीचे खातात.
  • लांडगे वसंत ऋतुत पिलांना जन्म देतात. नर आणि मादी दोघं पिलांचा सांभाळ करतात. एका वेळी ५ ते ६ पिल्ले होतात. ती ३०० ते ५०० ग्राम ची असतात. ३ आठवड्यांनंतर ते घराबाहेर पडतात. नर खाद्य गोळा करून आणतो. पिले मोठी झाली की स्वत:चा कळप तयार करतात. तरी मूळ कळपापासून फार दूर जात नाहीत. त्यांच्यात आपापसातच लढाई होऊनच ते मारतात.
  • त्यामुळे आता अगदी कमी लांडगे शिल्लक राहिले आहेत आणि पशु संग्रहालयात त्यांची वाढ करण्यात येत आहे.

Essay Composition / Information about Wolf in Marathi Language – Wikipedia

1 thought on “Wolf Information in Marathi | Information About Wolf, Landga Mahiti”

Leave a Reply

Your email address will not be published.