Skip to content
Home » Tips Information in Marathi » Zebra Information in Marathi, Animal Zebra Essay Nibandh झेब्रा माहिती

Zebra Information in Marathi, Animal Zebra Essay Nibandh झेब्रा माहिती

zebra animal information in marathi

Zebra Information in Marathi

झेब्रा माहिती

  • झेब्रा हा आफ्रिकेमध्ये आढळणारा चारपायी प्राणी आहे. हा प्राणी घोड्याच्या जातीत मोडतो. झेब्र्याच्या पाठीवर वैशिष्ठ्यपूर्ण काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. परंतु पट्ट्यांच्या खालची त्वचा मात्र काळी असते.
  • झेब्रा हा जंगली प्राणी आहे. त्याला गाढव व घोड्यासारखे पाळीव प्राणी म्हणून ठेवता येत नाही. झेब्रे जंगलात कळपाने राहतात.
  • झेब्रा हा शाकाहारी प्राणी आहे. झेब्रा प्रामुख्याने गवत खातात, तसेच ते फळे, पाने आणि भाज्याही खातात.
  • झेब्र्याच्या पाठीवर उभे आणि पायांवर आडवे पठ्ठे असतात आणि कोणत्याही दोन झेब्रांचे पट्टे समान नसतात. परंतु मादा मात्र आपल्या पिल्लांना पट्ट्यांच्या सहाय्याने शोधू शकतात.
  • झेब्रा वाळवंटी भागात राहण्यास पसंत करतो. ते सहसा कळपाने रहातात. एका कळपात एक आक्रमक नर, जवळपास सहा वयस्क मादा आणि लहान पिल्ले असतात. प्रत्येक मादीचे कळपातील स्थान ठरलेले असते. कळपाचे नेतृत्व नर करतो परंतु गरज पडल्यास पाठी राहून कळपाची रक्षा करतात.
  • झेब्रा भक्षकाला हुलकावणी देण्यासाठी नागमोडी वळणे घेत पळतो. काही वेळा झेब्रा फक्त एकत्र उभे रहातात आणि रंगांधळ्या शिकाऱ्यांना जसे की सिंह आणि चित्ता यांना गवत असल्याचा भास करवितात आणि स्वतःची रक्षा करतात.
  • झेब्राची उंची ३.५ ते ५ फूट इतकी असते. तो घोड्याप्रमाणेच पळण्यात वेगवान असतो. झेब्रा एका तासाला ६५ किलोमीटर पळू शकतो.
  • झेब्रा आपले कान कोणत्याही दिशेला फिरवू शकतो. त्यांची बघण्याची आणि ऐकण्याची क्षमता उच्च असते.
  • घोड्याप्रमाणेच झेब्रा देखील उभे राहूनच झोपतात. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कळपात झोपतात.
  • झेब्र्याच्या अंगावरील पट्ट्यांमुळे जवळपास 70 टक्के उष्णता परावर्तीत होते ज्यामुळे आफ्रिकेसारख्या उष्ण हवामानाचा त्यांना त्रास होत नाही. शिवाय या पट्ट्यांमुळे कीटकांपासूनही त्यांचे संरक्षण होते.
  • रोमन लोक पूर्वी झेब्रांचा उपयोग सर्कशीत करायचे व त्यांना वाघ-घोडा संबोधायचे.
  • मूळ अमेरिकन लोक झेब्राला संतुलन व सत्यतेचे प्रतिक मानतात.
  • कळपातील एखादा प्राणी जखमी झाल्यास बाकीचे झेब्रा त्याच्या भोवती गोल उभे राहून त्याचे रक्षण करतात.
  • ते खिंकाळतात किंवा भुंकतात आणि कधी कधी हसल्याचा सारखा आवाजही काढतात. जेव्हा ते डोळे मोठे करून दात दाखवितात त्याचा अर्थ ते हमल्याच्या पवित्र्यात आहेत.
  • पिल्लू जन्माला आल्यानंतर माता पिल्लाला तो पर्यंत इतरांपासून वेगळे ठेवते जो पर्यंत पिल्लू मातेचा वास, आवाज आणि रूप ओळखत नाही. पिल्ले जन्माला आल्यानंतर वीस मिनिटातच चालू शकतात.
  • झेब्रा नारिंगी रंग सोडून इतर सर्व रंग ओळखू शकतात.

Information of Zebras in Marathi / Few Lines

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *