Skip to content

Badminton Information in Marathi बॅडमिंटन खेळाची माहिती

badminton games information in marathi

Badminton Information in Marathi

बॅडमिंटन माहिती

Badminton History / खेळाची ओळख :

 • बॅडमिंटनची सुरवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाली आणि याचा शोध ब्रिटीश अधिकाऱ्यांनी लावला होता.
 • पूणे येथील ब्रिटीश छावणीत हा खेळ थोड्याच कालावधीत खूप लोकप्रिय झाला म्हणूनच या खेळाला पूनाई असेही म्हणतात.
 • सर्वप्रथम या खेळात लोकरीचे गोळे वापरीले जात, शटलकॉकचा शोध नंतर लागला.

खेळाचे मैदान :

 • खेळाच्या मैदानाला कोर्ट म्हणतात. हे कोर्ट आयताकृती असते आणि मध्यभागी जाळीद्वारा विभागलेले असते.
 • हा खेळ सिंगल्स म्हणजे एका जोडीमध्ये किंवा डबल्स म्हणजे दोन जोडींमध्ये खेळला जातो. सिंगल्सचा कोर्ट डबल्सकोर्ट पेक्षा रुंदीने थोडा लहान असतो परंतु दोघांची लांबी मात्र सारखी असते.
 • डबल्स कोर्टची रुंदी ६.१ मीटर म्हणजे २० फुट असते आणि सिंगल्स कोर्टची रुंदी ५.१८ मीटर म्हणजे १७ फुट असते. दोन्ही कोर्टची लांबी १३.४ मीटर म्हणजे ४४ फुट असते.
 • कोर्टच्या मध्यभागी दोन खांबांवर एक जाळी बांधलेली असते जी कोर्टला दोन समान भागांमध्ये विभाजित करते, या जाळीपासून १.९८ मीटरवर (६ फुट ६ इंच) शॉर्ट सर्विस लाईन असते.
 • डबल्स मध्ये लाँग सर्विस लाईन सुद्धा असते जी शेवटच्या बाहेरील बाजूपासून ०.७८ मीटरवर (२ फुट ६ इंच) अंतरावर असते. सर्विस कोर्टच्या मध्यभागी सुद्धा लांबीच्या समांतर एक रेषा असते.
 • जाळी टोकाला १.५५ मीटर (५ फुट १ इंच) व मध्यभागी १.५२४ मीटर (पाच फुट) इंचावर असते. जाळीची रुंदी ०.७६ मीटर असते.
 • लांबीच्या दोन्ही बाजुंपासून आत ०.४६ मीटर (दीड फुट) आणि रुंदीच्या दोन्ही बाजुंपासून आत ०.७६ मीटर (अडीच फुट) लॉबी असतात.
 • शटलकॉकच्या तळाशी अर्धगोलाकार भाग असतो आणि त्याला १४ किंवा २६ पिसे लावलेली असतात.

Badminton Rules in Marathi / खेळाचे नियम :

 • जेव्हा सर्वर सर्विस करतो, तेव्हा शटलकॉक प्रतिस्पर्ध्याच्या शॉर्ट सर्विस लाईनच्या पुढे गेले पाहिजे नाहीतर तो फाऊल मानला जातो.
 • सुरवातीला प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे न रहाता, तिरपे रहातात. खेळ बराचसा टेनिस सारखा असला तरी काही नियम वेगळे आहेत.
 • डबल्स मध्ये कोर्टच्या उजव्या बाजूचा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या उजव्या बाजूच्या खेळाडूकडे शटलकॉक फेकतो.
 • सर्विस करताना शटलकॉक वरून न मारता कमरेच्या खालच्या अंतरावरून मारतात. हात वर गेल्यास ओवरहँड म्हणतात. या शिवाय सर्विस करताना रॅकेट अधोमुखी असले पाहिजे म्हणजे रॅकेटचा गोल भाग खाली असला पाहिजे.
 • आणि शटलकॉकचा टप्पा पडता कामा नये. तसेच खेळाडू सर्विस कोर्टच्या आतील बाजूस उभे रहातात.
 • सर्विस चुकली तर सिंगल्स मध्ये प्रतिस्पर्ध्याला आणि दुहेरी मध्ये साथीदाराला सर्विस करायची संधी मिळते.
 • सिंगल्स मध्ये जर खेळाडूचे गुण सम असतील तर सर्विस कोर्टच्या उजव्या बाजूला उभा राहतो व गुण विषम असल्यास कोर्टच्या डाव्या बाजूला उभा राहतो.
 • डबल्स मध्ये गुण सम असल्यास सर्विस कोर्टच्या उजव्या बाजूचा खेळाडू सर्विस करतो आणि विषम असल्यास कोर्टच्या डाव्या बाजूचा खेळाडू सर्विस करतो.

खेळाची पद्धत :

 • खेळाची सुरवात दोनदा नाणेफेक करून होते. प्रथम जिंकणारा स्पर्धक सर्विस करायची की नाही ते ठरवितो. दुसऱ्यांदा जिंकणारा स्पर्धक कोर्टच्या कोणत्या बाजूला खेळायचे ते ठरवितो.
 • फुल रॅकेटच्या सहाय्याने एकमेकांकडे फेकत राहायचे असते.
 • सर्वात प्रथम फुल मारणे याला सर्विस करणे असे म्हणतात.
 • या खेळात शटलकॉक अशा पद्धतीने मारायचे असते की, प्रतिस्पर्धी ते शटलकॉक आपल्याकडे परत मारू शकणार नाही.
 • प्रतिस्पर्धी शटलकॉक परतवू शकला नाही तर एक गुण प्राप्त होतो.
 • शटलकॉक जाळीवरून जाणे गरजेचे असते. त्याच बरोबर आपल्या भागात आलेले फुल परतविणे देखील गरजेचे असते नाहीतर प्रतिस्पर्ध्याला तो गुण प्राप्त होतो.
 • फुल जर जाळीत अडकले किंवा मैदानाच्या बाहेर गेले तरी सुद्धा प्रतिस्पर्ध्याला गुण मिळतो.
 • बॅडमिंटनच्या प्रत्येक सामन्यात तीन गेम्स असतात व प्रत्येक सामना २१ गुणांसाठी खेळला जातो. जो स्पर्धक सर्वात जास्त गेम जिंकतो तो विजेता ठरतो.
 • ज्या स्पर्धकाला सर्वात प्रथम २१ गुण मिळतात तो गेम जिंकतो आणि जिंकण्यासाठी कमीतकमी दोन गुण जास्त असावे लागतात. जर एखाद्या स्पर्धकाला २० गुण प्राप्त झाले असतील तर जिंकण्यासाठी त्याला २४-२२ चा स्कोर करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त ३० गुणांपर्यंत गेम खेळला जातो. २९-२९ वर बरोबरी झाल्यास पुढील एक गुण मिळवणारा स्पर्धक विजेता असतो.
 • प्रत्येक गुणाची सुरवात सर्विस केल्यानंतरच होते. त्याने जर गुण नाही कमावला प्रतिस्पर्ध्याला गुण कमावण्याची संधी मिळते.
 • या खेळात फोरहँड व बॅकहँड या दोन पध्दती अवलंबिल्या जातात. क्लीअर, स्मॅश, ड्रॉप व ड्राइव्ह हे फटक्यांचे चार प्रकार आहेत.
 • क्लीअरमध्ये फुल खूप उंच जाऊन प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावरून जाऊन पाठीमागे पडते.
 • स्मॅश म्हणजे खूप जोराने फटका मारणे व हा फटका उंचावरून खालच्या दिशेला असतो.
 • ड्रॉपमध्ये फुल जाळीला लागून जाळीच्या नजीकच खाली पडते.
 • ड्राइव्ह म्हणजे कमी उंचीवरून जोराने आडवा फटका मारणे.

Wikipedia Information about Badminton in Marathi / Few Lines

12 thoughts on “Badminton Information in Marathi बॅडमिंटन खेळाची माहिती”

 1. THIS INFORMATION IS VERY YUSEFUL FOR BADMINTON PLAYERS AND ALSO FOR PROJECT THANK YOU SO MUCH SIR FOR GIVING US THIS INFORMATION……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *