Skip to content

Olympic Information in Marathi | Olympics History in Marathi, Games

olympics history in marathi

Olympic Information in Marathi

Olympics History in Marathi Language – ऑलिंपिक माहिती

ऑलिंपिक आणि त्याच्या कथा :

प्राचीन ग्रीक लोक धार्मिक होते आणि खेळाडू पण होते. ग्रीस मध्ये झियस ह्या देवाची पुजा म्हणून हेरक्लेस आणि त्याचे वडील झियास ह्यांनी खेळांना प्रोत्साहन दिले. हेरक्लेस हयानेच प्रथम खेळांना ऑलिंपिक हे नाव दिले. त्याने त्यासाठी स्टेडीयम बांधले. पहिले ऑलिंपिक ख्रिस्तपूर्व ७७६ साली सुरू झाले. त्यानंतर प्रत्येक चार वर्षानी हे खेळांचे सामने घेतले गेले. त्यात धावण्याची शर्यत, रथांची शर्यत, बॉक्सिंग, रेस्ट्लिंग, पंकरेशन आणि एकेस्टीयन हे खेळ होते.असे म्हणतात की, कोरेबस, एक एलिस शहरातील स्वयंपाकी हा पहिलं ऑलिंपिक चॅम्पियन ठरला. पण ग्रीस वर रोमन लोकाचे राज्य आले आणि थिओडस राजाने इसवी सन ३९३ साली हे खेळ बंद केले.

ब्रिटिश ऑलिंपिक :

इसवी सन १६१२ मध्ये कोट्स्वोल्डने ब्रिटिश ऑलिंपिक गेम सुरू केले. नंतर १७९६ ते १७९८ मध्ये फ्रांसने प्राचीन ऑलिंपिक खेळ सुरू केले. त्यानंतर १८५९, १५६२ आणि१८६७ मध्ये अमेचर गेम खेळले गेले. ग्रीक लोकांना हे सामने पुन्हा सुरू करायचे होते म्हणून ओट्टोमन राजापासून स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी हालचाल सुरू केली. इवागेलोस झप्पास ह्या श्रीमंत ग्रीक–रोमन वंशाच्या माणसाने ऑलिंपिक खेळांच्या पुरुज्जीवनसाठी देणगी देण्याची तयारी दाखवली. आणि १८५९ मध्ये अथेन्स येथे पहिले ऑलिंपिक खेळ सुरू झाले.

बेरोन पीएरी दी कौबेरतीन ह्याने international Olympic committee (IOC) ची स्थापना केली. त्याने पण अंतर देशीय दर चार वर्षानी खेळले जाणारे खेळ अशी संकल्पना राबवली. त्याप्रमाणे १८९६ मध्ये अथेन्स मध्ये खर्या अर्थाने IOC च्या नियमांप्रमाणे ऑलिंपिक खेळ सुरू झाले.ह्यामध्ये १४ देशांनी भाग घेतला. २४१ स्पर्धक आले होते. आणि ४३ खेळ झाले. झप्पास ने ग्रीक सरकार कडे पैसे जमा करून खेळांसाठी एक ट्रस्ट निर्माण केला. त्यातून ऑलिंपिकला अर्थ साहाय्य देण्याचे ठरविले आणि असे ठरले की दर चार वर्षानी खेळ खेळले जातील आणि यजमान पद दरवर्षी बदलत राहील

पुढे ऑलिंपिक मध्ये बरेच बदल घडत गेले. प्रथम समर म्हणजे उन्हाळी ऑलिंपिक होते. नंतर उन्हाळी आणि हिवाळी असे दोन प्रकार झाले. उन्हाळी ऑलिंपिक मध्ये बेसबॉल अथ्लेटिक्स शर्यती, कुस्ती इत्यादि खेळ होते आणि हिवाळी ऑलिंपिक मध्ये बर्फावरील सर्व खेळ उदा. स्कीइंग स्केटिंग, इत्यादि हिवाळी ऑलिंपिक पण दर चार वर्षानी खेळले जातात पण उन्हाळी ऑलिंपिक च्या दोन वर्षांनंतर खेळले जातात.१९४८ मध्ये सर लुडविग गट्टेमान ह्यांनी दुसर्या महा युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांची मानसिकता उंचावण्यासाठी पॅरालिंपिक सुरू केले. आता जग भरातील अपंग आणि विशेष लोकांसाठी हा खेळ सुरू झाला आहे. १९६० मध्ये रोम मध्ये ४०० खेळाडूंनी भाग घेतला होता.

आता चार प्रकारचे ऑलिंपिक खेळ आहेत :
१] उन्हाळी ऑलिंपिक
२] हिवाळी ऑलिंपिक
३] पॅरालिंपिक
४] यूथ ऑलिंपिक

युथ ऑलिंपिक मध्ये १४ ते १८ वयाच्या मुलांसाठी खेळ आहेत. ऑलिंपिक मध्ये स्विमिंग याट्चिंग, बॉक्सिंग टेबल टेनिस, बॅडमिंटन जिम, बेस बाल इ. खेळांच्या स्पर्धा होतात.

ओलिम्पिकचा खर्च US$ ५.२ बिलियन उन्हाळी ऑलिंपिकला आणि US $ ३.१ बिलियन हिवाळी ऑलिंपिकला होतो. ऑलिंपिक कमिटीने प्रायोजक घेण्यास सुरुवात केली. त्यांना कोडॅक कोंका कौला ओडल आणि ओकसो अशा कंपन्यांकडून प्रायोजकता मिळाली.

ऑलिंपिकचे बोध चिन्ह :

एक अतिशय सुंदर अर्थ पूर्ण चिन्ह आहे. वेगवेगळ्या रंगाच्या एकात एक गुंतलेल्या पाच कड्या पाच खंडांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते पाच खंड म्हणजे, अफ्रिका, अमेरिका, एशिया, ऑस्ट्रेलिया, आणि युरोप. पाच रंग म्हणजे नीला, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल. यापैकी एक तरी रंग प्रत्येक देशांच्या ध्वजात असतातच. हे चिन्ह १९२० पासून वापरत आले. ऑलिंपिकचे बोध वाक्य म्हणजे Aitius, Altlus, forties म्हणजे वेगवान, उंच, बळकट. हे ऑलिंपिक खेळातील खेळाडूंना लागू होणारे गुण आहेत.

ओलिम्पिकचा सोहळा :

दर चार वर्षानी ऑलिंपिकचा शानदार सोहळा होतो. दर ऑलिंपिकला नवीन देशाला यजमान पद दिलेले असते. खेळ सुरू होण्याच्या एक महिना आधी ओलिम्पिया शहरात शानदार सोहळ्यात ऑलिंपिक ची मशाल पेटवली जाते. महिला खेळाडू जोगिणीच्या वेषात एका parabolic परवलया सारख्या आरशाच्या वस्तु मध्ये ती मशाल ठेवते आणि ती मशाल एका कडून दुसरीकडे [relay] हस्तांतरण होत ती यजमान देशात पोहोचविली जाते. ही पद्धत १९३६ पासून सुरू झाली. ज्या देशाकडे यजमान पद असते त्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा एखादा प्राणी किंवा व्यक्तीचा पण गवगवा केला जातो.

उद्घाटन समारंभ :

ह्या सोहळ्याला जितकी जुनी परंपरा आहे तितक्याच थाटमाटात उद्घाटन सोहळा पार पडतो. स्टेडीयम मध्ये सर्व खेळाडू आणि पदाधिकारी, तसेच पाहुणे जमा झाले की प्रथम यजमान देशाच्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि त्यांचे राष्ट्रगीत वाजविले जाते. नंतर यजमान देशातील कलाकार पारंपरिक नाच गाणे संगीत इत्यादि कार्यक्रम करतात. नंतर पुढे यजमान देशातील मुलगी किंवा मुलगा ज्या देशापुढे आहे त्या देशाचा ध्वज घेऊन चालतात. पाठीमागे alphabetically एक एक देश चालत परेड करतात. पहिला मान ग्रीसला असतो कारण ऑलिंपिक त्यांनी सुरू केले आहे. नंतर इतर देश. यजमान देश सर्वात शेवटी असतो. त्यानंतर मशाल स्टेडीयम मध्ये आणून हस्तांतरण करीत करीत शेवटचा मशाल धारक ज्योत पेटवतो. ही ज्योत खेळ चालू असे पर्यंत तेवत राहते. ही ज्योत पेटवायला यजमान देशाचा यशस्वी खेळाडूला मान मिळतो.

समाप्तीचा सोहळा :

परत सर्व देशांची परेड होते. आणि तीन देशांच्या ध्वजांचे ध्वजारोहण होते. पहिला यजमान देश दूसरा ग्रीस आणि तिसरा पुढचे ऑलिंपिक ज्या देशात भरणार आहे तो देश. International Olympic committee चे अध्यक्ष आणि ज्या शहरात ऑलिंपिक सोहळा झाला त्या शहराचे मेयर ह्यांचे भाषण होते. पुढच्या ऑलिंपिकच्या यजमान देशाचा प्रतिनिधी त्या देशाची ओळख करून देतो. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पदकांचे वितरण खेळ संपल्यावर होते. तीन पदके असतात. सुवर्ण [gold] रजत [silver] आणि कांस्य [bronze}.तीन चौकोनी ठोकळ्यांवर जिंकलेल्या खेळाडूंना उभे करतात. आणि कमिटीचे पदाधिकारी पदक बहाल करतात. त्या तीन देशांचे ध्वज उंच करतात. आणि फक्त सुवर्ण पदक जिंकलेल्या देशाचे राष्ट्रगीत वाजवतात.

भारत आणि ऑलिंपिक :

भारताला ३० ऑलिंपिक मिळून २८ पदके मिळाली आहेत. त्यापैकी, ९ सुवर्ण, ६ रजत आणि ११ कांस्य पदक आहेत. भारतातून ह्या खेळला १९०० साला पासून सुरुवात झाली. सन १९०० ला फक्त एक खेळाडू गेला होता. १९२० ला एक टिम गेली होती. १९५२ ला खाशाबा जाधव ह्यांना कुस्तीत कांस्य पदक मिळाले होते तेही त्यांना मॅट वर कुस्तीची सवय नव्हती. ते मातीत कुस्ती करीत. २०१२ मध्ये आपल्याला बर्यापैकी यश मिळाले. त्यामध्ये ६ वैयक्तिक सुवर्ण पदके आहेत.

ऑलिंपिक बद्दल एक मजेची गोष्ट म्हणजे सन १९०० पर्यंत महिलांना बंदी होती. नंतर जिम आणि athletics च्या खेळांसाठी मुली यायल्या लागल्या. १९७२ मध्ये ऑलिंपिक वर दहशतवादाचा हल्ला झाला. म्यूनिक ऑलिंपिक ला पालेस्टनियन दहशत वाद्यांनी इस्त्राईल च्या ११ खेळाडूंचे अपहरण करून त्यांना ठार मारले. तसेच खेळांमध्ये राजकारण घुसले. आणि कामगिरी वाढविण्यासाठी उत्तेजक द्रव्याचा वापर व्हायला लागला. कोल्ड वॉर मुळे रशियातील ऑलिंपिक वर बहिष्कार टाकला गेला.

मागील ऑलिंपिकला (Rio Olympics २०१६) नावाप्रमाणेच वेगवान असलेल्या बोल्ट ने निवृती जाहीर केली. बोल्टला सगळ्यांनी दिलेली मानवंदना ही अविस्मरणीय बाब होती.

Information about Olympic Games / Rio Olympic 2016 Information in Marathi – Wikipedia Mahiti, Essay

8 thoughts on “Olympic Information in Marathi | Olympics History in Marathi, Games”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *