Home » Tips Information in Marathi » Kushti Information in Marathi, Game History & Rules

Kushti Information in Marathi, Game History & Rules

kushti game information in marathi

Kushti Information in Marathi

कुस्ती माहिती

Wrestling Game Information / खेळाची ओळख

 • ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून कुस्ती हा मराठी शब्द तयार आला आहे. कुस्ती म्हणजे मलयुद्ध, अंगयुद्ध, किंवा बाहुयुद्ध होय.
 • फार्सी भाषेत कुश्त शब्दाचा अर्थ ठार मारणे किंवा कत्तल करणे असा होतो. कुस्ती खेळण्याचा मुख्य हेतू तोच असतो.
 • प्राचीन काळी इराण देशात द्वंद्व युद्ध खेळले जात असे. द्वंद्व युद्ध खेळताना कंबरेला पट्टा किंवा दोरी बांधली जात असे. त्या पट्याला किंवा दोरीला कुश्त असे असे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्वयुद्ध खेळले जाई त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले, त्यावरूनच कुस्ती शब्दाचा उगम झाला.
 • कुस्ती शब्दाचा अर्थ प्रतिस्पर्धीला शक्तीने वा युक्तीने मात करून त्याला नामोहरम करणे हा आहे.
 • कुस्तीसाठी बलवान शरीरयष्ठी लागते. कुस्तीसाठी शरीर बलवान बनवुन त्या बलाचा युक्तीने आणि बुद्धीने वापर करावा लागतो.
 • कुस्तीसाठी पूर्वतयारी म्हणून व्यायामाच्या विविध प्रकारांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक आणि बलवान बनवावे लागते. कुस्तीसाठी आत्मविश्वासही खूप गरजेचा असतो.
 • बलसंवर्धनासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, सदाचार आणि ब्रह्मचार्याचे पालन करावे लागते.

Kushti History in Marathi / इतिहास

 • आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव चढाया, लढाया करत असे त्यातूनच कुस्तीच्या द्वंद्वयुद्धाचा उगम झाला.
 • इजिप्त देशातील नाईल नदीजवळील बेनिहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर इ.स. ३००० वर्षापूर्वी केलेल्या कोरीव कामात कुस्त्यांच्या डावपेचांचे शेकडो नमुने पाहायला मिळतात.
 • महाभारतातील वर्णनानुसार कृष्ण, बलराम, भीम हे मल्लविद्येत पारंगत होते, हे त्यांनी महायुद्धांत केलेल्या पराक्रमांवरून दिसून येते.
 • ग्रीक संस्कृतीत सुरु झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत मल्लयुद्धाचा समावेश केला गेला. ग्रीक लोकांत कुस्ती या क्रीडा प्रकारची बरीच प्रगती झाली. ग्रीकच्या कुस्तीत प्रतिस्पर्धीस ठोसे मारून, फेकून, जायबंद करून शरण यायला लावणे अशी पद्धत आहे हाच प्रकार ऑलिंपिकमध्ये रूढ आहे.
 • पुढे त्यात सुधारणा होऊन साधी निरुपद्रवी चीतपटीची कुस्ती क्रीडा तयार झाली.

खेळाचे मैदान

 • कुस्ती खेळण्याच्या मैदानास आखाडा म्हणतात.
 • भारतीय कुस्ती क्रीडा पद्धतीत ५ मीटर लांबी, ५ मीटर लांबी रुंदीचा व १ मीटर खोलीचा आखाडा लागतो.
 • त्यात ५० सेंटीमीटर जाडीची तांबडी माती व राख घातली जाते. त्यावर प्रथम पानी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ आणि निर्जंतुक करून घेतले जाते.
 • दररोज त्यावर पानी शिंपडून खोऱ्याने माती तोडून भुसभुशीत ठेवावी लागते.
 • विदेशी पद्धतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६ मीटर लांबीचा व रुंदीचा उंचावलेला आखाडा लागतो. त्यावर काथ्याची जाड व मऊ रजाई पसरलेली असते जेणेकरून खेळाडू खाली पडल्यास वा आपटल्यास त्याला दुखापत होत नाही.
 • खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून आखाड्याच्या चारही बाजूंनी जड दोरखंड बांधले जातात.
 • देशी पद्धतीत कुस्ती खेळात लंगोट घालतात व त्यावर घट्ट बसणारा जांघीया (किश्तक) घालतात. थंड हवामान असलेल्या ठिकाणी बनियान, चड्डी व बूट खालून कुस्ती खेळली जाते.
 • कुस्तीत सामन्याच्या वेळी खेळाडूस अंगावर तेल लावण्यास मनाई आहे त्याने हाताची पकड निसटू शकते.

Kushti Rules in Marathi / खेळाचे नियम

 • प्रत्येक कुस्तीचे स्वतंत्र नियम ठरवलेले असतात. खेळाडूने प्रत्येक नियम कटाक्षाने पाळणे हे प्रत्येक खेळाडूचे कर्तव्य असते.
 • खेळाडू खेळाचे नियम पळतो कि नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम पंचांचे असते.
 • कुस्ती चालू असताना पंच व सरपंच देखरेख ठेवत असतात, शेवटी कुस्ती निकाली न लागल्यास, पंच चांगल्या कुस्तीपटूस त्याच्या उत्कृष्ट डाव-पेच व पकड यावर आधारित गुण देऊन खेळाडूस विजेता घोषित केले जाते.
 • कुस्तीपुर्वी खेळाडूंचे वजन मापन केले जाते. व त्यांना त्याच्या वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात खेळवले जाते.
 • ऑलम्पिक सारख्या जागतिक सामन्यात कुस्तीगारांच्या वजनाचे आठ गट केलेले आहेत.
 • काही सामन्यात प्रत्येक गटात उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व शेवटी त्यात प्रत्येकाला खेळलेल्या सामन्यात मिळालेल्या गुणांची बेरीज करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातात.
 • काही पद्धतीत खेळाडूंच्या जोड्या बनवून फेऱ्यांच्या रुपात कुस्ती खेळवली जाते व शेवटच्या फेरीत जिंकणारा खेळाडू विजेता आणि हरणारा खेळाडू उपविजेता असे ठरवले जाते.
 • काही कुस्ती प्रकारात खेळाडूंचे दोष तसेच गुणही काढले जातात व त्यामुळे अनेकदा कमी गुण मिळालेला खेळाडूही विजेता ठरतो.
 • या खेळत पंचांनी दिलेला निकाल हा अंतिम असतो.

खेळाची पद्धत

 • कुश्ती नेहमी दोन खेळाडूंमध्ये खेळली जाते.
 • दोन्ही मल्लांचे नाव पुकारले गेल्यावर ते आखाड्यात येऊन उभे रहातात. एकाच्या पायात लाल व दुसऱ्याच्या पायात हिरवी पट्टी बांधलेली असते.
 • पंच मध्यभागी उभा राहून दोघांना पुढे बोलावतो. त्यांची नखे तपासतो.
 • मुक्त कुस्ती मध्ये मल्लांना लढण्यासाठी १२ मिनिटे दिली जातात. त्यात पहिल्या चार मिनिटात प्रत्येक पेहलवानाला दोन मिनिटासाठी खाली बसविले जाते व दुसरा त्याला वरून पकडतो आणि तसेच जखडून ठेवायचा प्रयत्न करतो.
 • नंतर दोन मिनिटे उभे राहून कुस्ती खेळतात. या सहा मिनिटांनंतर पंच सांगतात की कोणत्या पेहलावानाचे जास्त गुण आहेत. विजयी पेहलावानाला प्रतिस्पर्ध्यापेक्षा तीन गुण जास्त असावे लागतात.
 • विजयी पेहलवान ठरवितो की उरलेली सहा मिनिटे कोणत्या प्रकारची कुस्ती खेळायची.
 • विजयी पेहलवानाने प्रतिस्पर्ध्याला चित केल्यास त्याला शून्य पेनल्टी पॉइंट मिळतो व हरलेल्याला चार पेनल्टी पॉइंट. जर खांदा न लावता चित केले तर विजयी मल्लाला एक पेनल्टी पॉइंट व प्रतिस्पर्ध्याला तीन पेनल्टी पॉइंट मिळतात.
 • बरोबरी झाल्यास दोघांनाही दोन दोन पेनल्टी पॉइंट मिळतात.
 • जर १२ मिनिटांनंतर दोन्ही मल्लांचे गुण समान असतील किंवा दोघांनाही गुण मिळाले नसल्यास टाय मानला जातो.

Wikipedia Information about Kushti in Marathi

2 thoughts on “Kushti Information in Marathi, Game History & Rules”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *