Skip to content
Home » Tips Information in Marathi » Judo Information in Marathi | जुडो खेळाची माहिती

Judo Information in Marathi | जुडो खेळाची माहिती

Judo Marathi Mahiti

Judo Information in Marathi

Judo Information / जुडो माहिती

  • आजकालच्या दुनियेत जिथे कधी काय होईल याचा भरवसा नसतो तिथे स्वसंरक्षण करता येणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतेक पालक आपल्या मुलांना अनेक ठिकाणी एकटे जाऊ देतात परंतु मुलांना घरी येण्यास उशीर झाला की प्रत्येक आई-वडिलांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकतो. पण जर मुले स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असतील तर मात्र आपली काळजी काही प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणून बरेच पालक आपल्या मुलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देतात.
  • मार्शल आर्ट मध्ये अनेक प्रकार आहेत परंतु सर्वात प्रसिद्ध आहे जुडो – कराटे. अनेक लहान मूल-मुली जुडो शिकायला उत्साहाने जाताना आपल्याला आढळतात. जुडो ह्या प्रकारात तुम्ही कोणत्याही अस्त्र किंवा शस्त्राच्या मदतीशिवाय स्वतःची रक्षा करू शकतात.
  • जुडोला आता एका खेळाचे स्वरूप प्राप्त झाले असले तरीही त्याची सुरवात आत्मरक्षा करण्यासाठी एक उपाय म्हणून झाली होती.
  • जुडोच्या प्रसिद्धीचे एक कारण हे आहे की या साठी वयाचे बंधन नसते. तुम्ही कोणत्याही वयात जुडो शिकू शकतात आणि तुम्ही जुडो मध्ये पारंगत झाल्यानंतर आपल्या पेक्षा दुप्पट आकाराच्या व्यक्तीला देखील सहज हरवू शकता. जुडोचा सराव करणाऱ्या व्यक्तीला ‘जुडोका’ म्हणतात.

Judo History / जुडोचा इतिहास

  • जुडोची सुरवात १८८२ साली डॉ. जिगोरो कानो यांनी केली होती.
  • जुडोचे संस्थापक जिगोरो कानो यांचा जन्म एका संपन्न परिवारात झाला होता. त्यांचे आजोबा जपान मध्ये यशस्वी मद्य निर्माता होते. त्यांचे वडील एक पुजारी होते परंतु लग्नानंतर ते सरकारी अधिकारी बनले. जिगोरो कानो यांना लहानपणा पासूनच चांगले शिक्षण मिळाले. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांना इंग्रजी, जपानी लिपी शिकवण्यात आली होती.
  • चौदा वर्षाचे असताना कानो यांनी टोकियो मधील इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. कानो उंची व वजनाने कमी होते. यामुळे बऱ्याच वेळा शाळेतील दांडगट मुले त्यांना त्रास देत असत. म्हणून त्यांनी जुजुत्सु शिकवणारे कोणी भेटते का याचा शोध घेतला पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही कारण तेव्हा पाश्चिमात्यांच्या वाढत्या प्रभावामुळे ही कला नाहीशी होण्याच्या मार्गावर होती. लोकांच्या जुजुत्सु बाबतच्या अनासक्त्येमुळे ही कला शिकवणाऱ्या बऱ्याच लोकांना नोकरी गमवावी लागली होती अथवा त्यांचा ह्यावरचा विश्वास उडाला होता.
  • कानो यांना अनेक माणसे भेटली ज्यांना ही कला ज्ञात होती पण त्यांनी शिकवण्यास मात्र नकार दिला. बराच शोध घेतल्यानंतर त्यांना फुकुडा नावाचे शिक्षक भेटले ज्यांनी त्याला शिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी इसो मासातोमो व आयकुबो सुनेतोशी यांच्या द्वारे शिक्षण मिळवले. पुढे जाऊन त्यांनी शिकलेल्या अनेक कलांचे मिश्रण करून जुडो ह्या शाखेची सुरवात केली.

Judo – An Art / जुडो – एक कला

  • जुडो ही कला शारीरिक, मानसिक आणि नैतिक अध्यापनासाठी जपानमध्ये उदयास आली.
  • जुडो आधुनिक मार्शल आर्ट ह्या प्रकारात मोडतो. नंतर याचे रुपांतर सामना व ऑलिम्पिक खेळ यामध्ये झाले. याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे याचे स्पर्धात्मक घटक.
  • जुडोचे प्राथमिक लक्ष असते प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर फेकणे किंवा जमिनीवर आणणे, त्याला जागच्या जागी खिळवून ठेवणे, किंवा त्याच्यावर आपला भार टाकून ताबा मिळवणे किंवा त्याचे हातपाय अथवा गळा यावर ताबा मिळवून त्याला हार मानण्यास भाग पाडणे.
  • हाता-पायांचा किंवा शस्त्रांचा वापर करून वार करणे हा जुडोचाच भाग आहे पण याचा वापर केवळ पहिल्या पासून नियोजित केलेल्या प्रकारांमध्येच म्हणजे काता मध्येच होतो. जुडोच्या स्पर्धा किंवा सराव (रंदोरी) मध्ये याचा वापर करण्यास परवानगी नाही.
  • जुडोचा अर्थ आहे ‘हळुवारपणे करणे.’ जुडोमध्ये प्रतिस्पर्ध्याची ताकद त्याच्या विरुद्ध वापरली जाते, त्याचे संतुलन बिघडवून त्याच्यावर वर्चस्व मिळवले जाते. कानो यांनी जुजुत्सुच्या अनेक विसंगत चाली एकत्र करून जुडोची स्थापना केली.
  • प्राचीन काळातील मार्शल आर्टच्या उद्देश्य शत्रूला मारणे हा होता, परंतु जुडोचे उद्देश्य शारीरिक, मानसिक आणि नैतिक दृष्ट्या स्वतःवर नियंत्रण मिळवणे आणि स्वतःची रक्षा करणे हा होता.
  • जुडो ही कला शारीरिक, मानसिक आणि नैतिक अध्यापनासाठी जपानमध्ये उदयास आली.
  • जुडो आधुनिक मार्शल आर्ट ह्या प्रकारात मोडतो. नंतर याचे रुपांतर सामना व ऑलिम्पिक खेळ यामध्ये झाले. याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे याचे स्पर्धात्मक घटक.

Judo Rules / विविध नियम

  • जुडोचे अभ्यासक सफेद रंगाचा पोशाख घालतात ज्याला जुडोगी असे म्हणतात व कमरेवर एक पट्टा असतो ज्यास ओबी म्हणतात. ओबीच्या रंगावरून जुडोच्या अभ्यासक्रमातील दर्जा कळतो.
  • जुडोच्या मैदानाला चटई म्हणतात. ह्या क्षेत्राचा आकार १४ ते १६ मीटर लांबीचा असतो व याचे तीन विभाग केले जातात. स्पर्धा क्षेत्र – हे चटईच्या मध्यभागी असते व ८ ते १० मीटर आकाराचे असते. इथेच खेळाची सुरवात व समाप्ती होते. धोकादायक क्षेत्र हे स्पर्धा क्षेत्राच्या आजूबाजूस असते आणि १ मीटर लांबीचे असते. आबी सर्वात बाहेरचे सुरक्षा क्षेत्र जे ३ मीटर आकाराचे असते.
  • जुडोची स्पर्धा समान वजन गटाच्या व्यक्तींमध्ये होते. स्पर्धा पुरुषांसाठी ५ मिनिटे व महिलांसाठी ४ मिनिटे असते. स्पर्धेच्या सुरवातीला दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर ४ मीटरच्या अंतरावर उभे राहतात. स्पर्धेच्या प्रारंभी व शेवटी एकमेकांना वाकून प्रमाण करतात.
  • जुडोचा विजेता ठरवताना प्रतिस्पर्ध्याची पकड निष्फळ करण्याचे चातुर्य, पुन्हा उठून लढण्याची क्षमता या गोष्टी ध्यानात ठेवल्या जातात. जर एखादा खेळाडू त्याच्याच चुकीमुळे जखमी झाला तर त्याला हार स्वीकारावी लागते तसेच जर जाणूनबुजून कोणाला जखमी केले तरीही हार मानावी लागते.

Strategy and Competition / डावपेच व स्पर्धा

  • जुडोमध्ये साधारणपणे तीन प्रकारचे डावपेच असतात.
  • नागेवासा – प्रतिस्पर्ध्यास फेकण्यासाठी हाता पायांचा वापर करण्याचे डावपेच असतात.
  • काटेमेवाझा मध्ये प्रतिस्पर्ध्यास खिळवून ठेवले जाते किंवा त्याच्यावर ताबा मिळवला जातो.
  • आटेवाझा मध्ये प्रतिस्पर्ध्याला इजा पोहचवणारे डावपेच असतात.
  • या शिवाय निवासा, ताजीवाचा, तीवाझा, अशीवाझा, कोशिवाझा असे अनेक डावपेच असतात. या डावपेचांच्या आधारावर विजयी स्पर्धक निवडला जातो. याशिवाय काही खास प्रसंगी इपॉन हा गुण देण्यात येतो. हा गुण मिळणारा स्पर्धक थेट विजेता होतो. जुडोच्या प्रसिद्धीमुळे जगभरात अनेक ठिकाणी जुडोच्या स्पर्धा घेतल्या जातात.
  • ऑलिम्पिक स्पर्धेशिवाय जागतिक जुडो स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा आहे. त्याशिवाय युरोपियन चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप, पॅन अमेरिकन चॅम्पियनशिप, आफ्रिकन चॅम्पियनशिप, ओशनिया युनियन चॅम्पियनशिप अशा अनेक स्पर्धा जगभर घेतल्या जातात.
  • परंतु ह्या स्पर्धामध्ये विजय मिळवण्यासाठी नाही तर किमान स्वतःची व आपल्या प्रिय व्यक्तींची रक्षा करता यावी म्हणून प्रत्येकाने जुडो सारख्या संरक्षण कला शिकल्या पाहिजेत. पण याचा उपयोग केवळ स्वतःच्या रक्षणासाठीच करावा, इतरांना त्रास देण्यासाठी नव्हे, कारण हाच जुडोचा मूळ उद्देश्य आहे.

Wikipedia Information about Judo in Marathi / Few Lines

2 thoughts on “Judo Information in Marathi | जुडो खेळाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *