Home » Tips Information in Marathi » Crow Information in Marathi, Useful Bird Crow Essay

Crow Information in Marathi, Useful Bird Crow Essay

crow bird marathi information

Crow Information in Marathi

Kavla कावळा माहिती

 • चिमणी आणि कबुतरांप्रमाणेच कावळा हा सुद्धा मनुष्य वस्तीजवळ राहणे पसंद करतो आणि भारतात जवळजवळ सर्वत्र आढळतो.
 • कावळ्याच्या जगभरात जवळपास ३१ जाती आहेत. सर्वात छोटी जात मेक्सिकोतील ड्वार्फ जे आहे, या कावळ्याची लांबी २१ सेमी असून वजन ४० ग्राम असते. सर्वात मोठी थिक बिल्ड रेवन आहे ज्यांची लांबी ६५ सेमी पर्यंत असते आणि वजन जवळपास १५०० ग्राम असते.
 • कावळा मानेजवळचा राखाडी भाग वगळता पूर्णपणे काळा असतो आणि जो कावळा संपूर्ण काळा असतो त्याला डोमकावळा असे म्हणतात. डोमकावळा सामान्य कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो.
 • कावळ्याचा मेंदू शरीराच्या तुलनेत इतर पक्ष्यांपेक्षा मोठा आणि विकसित असतो. कावळ्याच्या मेंदूची रचना माणसाच्या मेंदूच्या रचनेशी मिळतीजुळती आहे.
 • त्यामुळे कावळे खूप हुशार आणि चलाख असतात. कावळे पोपटापेक्षा आणि अगदी बोनोबो चीम्पाजीपेक्षा सुद्धा हुशार असतात हे सिद्ध झाले आहे.
 • कावळ्यांच्या प्रत्येक थव्याची स्वतंत्र भाषा असते आणि त्यांची स्मरणशक्ती सुद्धा खूप चांगली असते. हल्ला केलेल्या व्यक्तीचा चेहरा कावळे कधीही विसरत नाहीत आणि आपल्या साथीदारांनाही याबाबत माहिती देतात.
 • कावळा सर्व प्रकारचे अन्न खातो. धान्य, शिजलेले अन्न, अंडी, मृत प्राणी हे सर्व खातो म्हणूनच कावळ्याला सर्वभक्षी म्हणतात.
 • कावळा झाडावर किंवा आडजागी, काड्या, काटक्या व जे काही मिळेल ते समान वापरून घरटे बांधतो. मादी एकावेळी चार ते पाच अंडी देते. अंडी फिक्या निळ्या किंवा हिरव्या रंगाची असतात व त्यावर तपकिरी रेषा असतात.
 • पिल्लांचे रक्षण आणि पालन पोषण नर आणि मादा दोघेही मिळून करतात. कधी कधी कोकिळा कावळ्याच्या घरट्यात स्वतःचे अंडे देते. या पिल्लांचे पालन पोषणही कावळे करतात. तसेच अंडे असलेल्या घरट्याची रक्षा इतर कावळे सुद्धा आक्रमकतेने करतात.
 • कावळ्यांच्या नर मादाची जोडी बरीच वर्षे एकत्रच असते. काही तर मरेपर्यंत एकमेकांची सोबत करतात.
 • कावळा इतर वेळी अपवित्र मानला गेला तरी हिंदू संस्कृतीत त्याला स्थान आहे. तेराव्याला व श्राद्धाला कावळ्याला जेवण देण्याची प्रथा आहे. तसेच अनेक हिंदू स्त्रिया पूर्वजांची आठवण म्हणून रोज कावळ्याला घास देतात.
 • कावळ्याचे आयुष्यमान ७ ते ८ वर्षे असते. जेव्हा एखादा कावळा मरत असेल तर इतर कावळे त्याच्या भोवती जमून त्याला टोचून टोचून लवकर मारतात. म्हणून कावळ्यांच्या थव्याला इंग्रजीमध्ये ‘मर्डर’ म्हणतात.

Information of Crow in Marathi

1 thought on “Crow Information in Marathi, Useful Bird Crow Essay”

 1. इट्स व्हेरी नाईस हेल्प मे टू फाईंड द इंफॉर्मेशन ऑफ द बर्ड अँड देयर पिक्चर्स इझी ली थॅंक्यु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *