Hen Information in Marathi

कोंबडी चविष्ट माणसाच्या तोंडाला पाणी सुटणारा प्राणी

काही वर्षापूर्वी जत्रा सिनेमातील भारत जाधव आणि क्रांती रेडकरने नाच केलेल्या जितेंद्र जोशी ने लिहिलेल्या ‘कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली’ गाण्याने सगळ्या महाराष्ट्रमध्ये धूम माजविली होती.त्या गाण्यात कोंबडी हि नायिका होती. असा हा प्राणी गाण्याचा ,खाण्याचा पण विषय होऊ शकतो. अजूनही मासाहारी लोक जर ते मासे खाणारे नसले तर त्यांची पहिली पसंती कोंबडीला असते.गावातील उत्सवापासून पंचतारांकित ओफिशियाल खाना खाण्यापर्यंत कोंबडीचे तऱ्हे तर्हेचे पदार्थ त्यांच्या रसनेला तृप्त करीत असतात. अशी हि कोंबडी कशी आहे, काय तिचा इतिहास आहे ते बघू.

कोंबडीची प्रजाती:

कोंबडी हि न उडू शकणाऱ्या पक्षी जातीतील पक्षी आहे.जसे शहामृग, मोर, आणि टर्की.हा मुख्यत: पाळीव प्राणी आहे.पण हिचा उगम रेड जंगल फाउल ह्या जंगली कोंबड्यांपासून झालेला आहे. हिला अंडी आणि चिकन साठी पाळतात. पण कोंबडीचे मूळ आपली हडप्पा संस्कृतीन, चीनच्या ख्रिस्तपुर्व 6000च्या संस्कृतीत आणि इस्राईल च्या ख्रिस्तपूर्व 4थ्या आणि 2 र्या शतकापुर्वी सापडते.ह्यांना पूर्वी झुंज लावण्यासाठी पाळत.तिचा प्रवास प्राचीन भारतापसून लिबिया सिरीया ग्रीस असा झालेला आहे. कोंबडी हि पक्षी वर्गातील फासिनिडी कुटुंबातील गॅलस जातीतील असून तिचे शास्त्रीय नाव गॅलस डोमॅस्टिकस आहे.

कोंबडीचा व्यवसाय :

कोंबडी पालन हा काही शेतकऱ्यांचा सहायक व्यवसाय आहे. तसेच काही पोल्ट्री वाल्यांचा हा मुख्य व्यवसाय आहे. तिथे शास्त्रशुद्ध रीतीने कोंबड्या पाळल्या जातात. त्यांची देखभाल केली जाते.अंडी हे एक मुख्य उत्पादन आहे. एकट्यां ब्रिटन मध्ये रोज 34 मिलियन अंडी खालली जातात. कोंबडी रोज एक अंडे देऊ शकते. इतर प्राण्यांप्रमाणे कोंबडीला अंडे देण्यासाठी नराची जरूर नसते. मानव प्राण्यांप्रमाणे अंडे तयार होतात आणि समजा कोंबडी आणि कोंबडा ह्यांचे मिलन झाले तर ती फलित होतात.

कोंबडीची माहिती :

कोंबडी 3 ते 4 वर्षापर्यंत अंडे देते. पोल्ट्री मध्ये कोंबड्यांचे, खाण्यासाठी (ब्रोयलर), अंडी देण्यासाठी असे वर्गीकरण केले असते. ब्रोयलर कोंबडी लठ्ठ केलेली असते त्यामुळे ती अंडे देऊ शकत नाही. कोंबडीचे आयुष्य फक्त 5 ते 10 वर्ष असते.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 16 वर्ष जगलेली कोंबडी आहे. आणि त्या नेहमी एकत्र राहतात. एक कोंबडा आणि 4,5 कोंबड्या असे गट असतात. कोंबड्या बारीक बिया,छोटे किडे, अळ्या ,छोटे साप, पाली, आणि लहान उंदीर खातात. शाकाहारामध्ये त्यांना अवकाडोचे आणि बटाट्याचे साल हे विष असते, तसेच कांदे, कच्च्या डाळी ह्या त्यांच्या अन्नमार्गात अडकून त्रास होऊ शकतो.

कोंबडीचे प्रकार :

कोंबड्या 4 प्रकारच्या असतात.

१. एशियाटिक:- ब्रह्मा,लोन्ग्सन,कोचीन,असील.
२. इंग्लिश :- ऑस्त्रोलोप,कॉर्निश, ओर्ल्चिंग
३. मेदितेरानियान:- लेगहोर्न मिनोरिया,अनाकॉना
४. अमेरिकन:- र्होड्स आयलंड रेड, न्यू हंपशायर, प्लायमोउथ

कोंबड्यांचे रंग विविध प्रकारचे असतात, काळ्या ज्यांना आपल्याकडे कडकनाथ (प्लुमेज) म्हणतात.,ब्लू,ब्लफ,आणि लव्हेंडर.

कोंबड्या तीन प्रकारचे आवाज काढतात. एक अन्न खाण्यासाठी बोलावण्यास आणि अंडी घातल्यानंतर , दोन, धोका असल्यास पिल्लांना बोलावण्यास आणि तीन, कापताना चीत्कारातांना. बोलावण्यासाठी त्या ‘कल्क’ असा आवाज काढतात.

कोंबडीचे प्रजनन:

कोंबडीने अंडी घातली की फलित अंड्यातून 21 दिवसात पिल्लू बाहेर येते. कोंबडी तेव्हडे 21 दिवस अंडी टाकत नाही. 12 दिवस ती अन्नपाण्यावाचून अंड्यांवर उबवायला बसते. आणि मधून मधून अंडी फिरवीत राहते. त्यावेळी ती अंड्यांसाठी ठराविक तापमान आणि आर्दता राखते. अंडे देण्याचे थांबणे ह्याला हेनोपॉज म्हंतात.

कोंबड्या कसे जगतात :

कोंबड्यांना शत्रूंपासून खूप धोका असतो. कोल्हा, लांडगा, बिबळ्या तसेच गरुड गिधाड सारखे शिकारी पक्षी आणि शेवटी माणूसपण त्यांचा शत्रूच आहे. त्यामुळे त्या जागरूक असतात. कोंबड्या झोप पण पूर्ण घेत नाही. झोपेत पण त्यांच्या अर्धा मेंदू जागा असतो. त्यांच्या मेंदूचे दोन भाग असतात. त्यापैकी एक जागा असतो आणि एक डोळा उघडा असतो. त्याला युनीहेमीस्फेरिक स्लो -वेव्ह स्लीप असे म्हणतात. जरा जरी आवाज झाला तर लगेच त्या किलकिलाट करतात. पण मालकांच्या बाबतीत त्या विशेष उदार असतात. इतरांना हात लावू देत नाही पण मालक खुशाल तिच्या पायाखालून अंडी काढतो तरी त्या काही करीत नाही. त्या त्यांच्या मालकाला ओळखतात. त्या अतिशय बुद्धिमान आणि स्मरणशक्ती असलेल्या आहेत. काही कोंबड्यांच्या जाती मनोरंजन पण करतात,उदा. सिल्कीज,बनतं इत्यादी.

कोंबडीचा रोग:

कोंबड्यांना रोगांपासून पण धोका आहे .आणि एका कोंबडीला जरी काही झाले तरी संपूर्ण पोल्ट्री ला धोका पोहोचतो. कोंबड्यांना बांडगुळ, उवा, टिक, माश्या, आतड्यात जाणारे जंत, ह्यामुळे आजार येतात.त्यात बर्ड फ्लू हा मोठा आजार आहे त्यामुळे 1990 मध्ये हा एव्हडा पसरला की लाखो कोंबड्या,मानां मुरगळून मारून टाकाव्या लागल्या. आता त्यांना ह्यावर औषधे आणि लस टोचण्या साठी औषध आहे. पण ह्या जंतूंमुळे कोंबड्यांना परालीसीस फ्लू ह्यासारखे रोग होत्त. त्यांच्या अंगात H5 N1 हा वायरस जातो आणि पटापट सर्व कोंबड्या मारतात. पण हा माणसांना तितका धोकादायक नाही आहे.

कोंबड्यांच्या मरणाची बरीच कारणे आहेत जसे,: हार्ट अटक,अन्नमार्गात परजीवी जंतू आल्याने, इंफेक्शास ब्रोंकायातीस ,मायोप्लाझ्मा, फाउल पौक्स,फाउल कॉलरा नेक्रोतिक इंतेरीतीस इत्यादी.

कोंबडी बद्दल बऱ्याच मजेदार गोष्टी आहेत. जसे ट्रिकी प्रश्न टाकला जातो”कोंबड्या रस्ता का क्रॉस करतात?” कठीण उत्तर देण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर मिळते. “ त्यांना दुसऱ्या बाजूला जायचे असते म्हणून” तसेच आजपर्यंत लाखो वेळा विचारला गेलेला प्रश्न “आधी कोंबडी की आधी अंड?” म्हणजे एखाद्या न उलगडणाऱ्या समस्येंवर हा प्रश्न विचारला जातो. कोंबडी हि चीनच्या राशींपैकी एक राशी आहे. चीन मध्ये प्राण्यांच्या वरून एखादे वर्षाचे नाव असते. त्यात कोंबडी हे पण एखाद्या वर्षाचे नाव असते. रोम मध्ये शकून अपशकून कोंबडीच्या खाण्यावरून ठरवतात जसे खाणे दिले असता, न खाता कोंबडी उडून गेली, आवाज केला किंवा पंख आपटले तर अपशकून आणि भराभर खाल्ले तर शुभशकून. इंडोनेशियामध्ये अन्त्यसंस्काराच्या वेळी कोंबडीला पाय बांधून ठेवतात, ज्यामुळे कोणी आत्मा त्यावेळी न येवो आणि सर्व झाल्यावर तिला मारून खातात. पर्शियन लोक हिला होली बर्ड म्हणजे पवित्र पशु समजत. ख्रीश्चननाम्ध्ये जिझस स्वत:ला कोंबडी समजून सर्व मानव जातीला आपल्या पंखाखाली घेत आहे असा एक चरण बायबल मध्ये आहे. अशी हि कोंबडी जन्माच्या आधीपासून म्हणजे अंडे ते कोंबडी पर्यंत आपल्या ताटातला एक चविष्ट पदार्थ आहे.

Wikipedia Essay, Information of Hen in Marathi Language